LIVE UPDATE | फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याची कॅबिनेटमध्ये चर्चा, अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा ठपका, सूत्रांची माहिती

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Feb 2020 10:33 PM
कीर्तनकार इंदोरीकर महाराज उद्या कोल्हापुरात, अंनिस आणि पुरोगामी संघटनांचा इंदोरीकर यांना विरोध, शिवाजी विद्यापीठात इंदोरीकर यांच्या कार्यक्रमाचं आयोजन, स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा विद्यापीठात कार्यक्रम नको, कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका
फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याची कॅबिनेटमध्ये चर्चा, सिडकोवर कॅगचे ताशेरे, 2018 साली सिडकोमध्ये अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा कॅगचा ठपका, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा एकदा कालवा फुटला आहे. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झालं आहे. आंबेगाव तालुक्यातील चास येथे ही घटना आज दुपारी घडली. डिंभे धरणाचा हा डावा कालवा आहे. कालवा फुटल्यानंतर जवळपास पंधरा शेतकऱ्यांच्या शेतात आणि तीन घरात पाणी शिरले. गेल्या वर्षभरापासून या कालव्यातून गळती सुरू होती, तर मार्चमध्ये एका ठिकाणी कालवा फुटला होता.
ग्रामविकास खात्यातर्फे राज्यात स्वच्छता स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येते. त्याचे नाव बदलून आर.आर. आबा पाटील सुंदर गाव योजना असे नामकरण करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महाविद्यालयात विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्या प्रकरणी तीन जण निलंबित, दुसरीकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीचं कॉलेजबाहेर आंदोलन, तिघांचं निलंबन मागे घ्या, अशी मुलींची भूमिका, कॉलेजला टाळा ठोकण्याचा इशारा
वाशिम : वाशिम येथील पोलीस शिपायानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीस आली. सुरज भेंडेकर( 28 ) असं पोलीस शिपायाचं नाव असून त्यांनी वाशिम तालुक्यातील चिखली रोडवरील गिटीखदान परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नेमकी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. सूरज वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील धामणी गावचा रहिवासी आहे.
नांदेड : 5 वर्षीय मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ लोहा तालुक्यात कडकडीत बंद. सोनखेड येथील मुलीचे अपहरण करुण अज्ञात आरोपीने निर्जनस्थळी चिमुरडीवर केले होते अत्याचार. बेपत्ता मुलगी काल सकाळी नग्न अवस्थेत सापडली होती. वैद्यकीय चाचणीत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय.
अहमदनगर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस. इंदोरीकर महाराजांवर 15 दिवसात गुन्हे दाखल करण्याची केली मागणी. जिल्हा शल्य चिकित्सकांनी तपास करण्यात कसूर केल्याचा अंनिस चा आरोप. जर कारवाई नाही केली तर कोर्टात जाणार असल्याचा दिला इशारा.
बऱ्याच दिवसानंतर मी विधान भवनात आलो होतो. आत येताना खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून मला सुरक्षा रक्षक गेटवरून आतमध्ये सोडत होते. पण माझ्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना त्यांनी आतमध्ये जाऊ शकत नाही असे सांगितले. त्यावेळी मी त्यांना विनंती केली की मला या इथले काही जास्त माहीत नाही. त्यामुळे माझ्यासोबत यांना आतमध्ये सोडा पण त्यांनी सांगितले पास असल्याशिवाय तुमच्या सहकार्यांना सोडणार नाही. मग त्यानी त्यांच्या वरिष्ठांना बोलावलं त्यावेळी ते आतमध्ये सोडत होते. पण नंतर मी त्यांना म्हणालो की आता पास आल्याशिवाय मी आतमध्ये जाणार नाही. मला खरच या गोष्टीचा आनंद आहे की राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने चांगली सिस्टीम उभारली आहे. सर्व आमदारानी ही सिस्टीम पाळली पाहिजे असे संभाजी राजे म्हणाले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विधानभवनाच्या गेटवरच अडवले. अडवल्यानंतर संभाजीराजे भडकले. पास नसल्याने अडवल्याची प्राथमिक माहिती. सारथीच्या कामासाठी गेले होते विधानभवनात.
गोवा : भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी आज 18 उमेदवारांची घोषणा केली. यात 14 उत्तर गोव्याचे तर, 4 दक्षिण गोव्यातील आहेत. यातील 6 विद्यमान सदस्यांना पुन्हा संघी मिळालीय. राज्य निवडणूक समितीची बैठक झाल्यानंतर प्रदेसाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी ही यादी जाहीर केलीय. उर्वरीत उमेदवार 29 फेब्रुवारीपर्यंत जाहीर केले जाणार आहेत.
रेणा नदीवरील भांडारवाडी मध्यम प्रकल्पातून 52 गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यात सध्या 28 टक्के पाणी शिलकक राहिले आहे. असे असताना पाट बंधारे विभाग शेतीला त्यात उसाच्या शेतीला पाणी सोडणार आहे, याची माहिती कळताच रेणापूर कामखेडा पानगाव येथील ग्रामस्थांनी याचा विरोध केला आहे. यासाठी आज रेणापूर बंदची हाक देण्यात आली होती. धरणावर काल रात्रीपासून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याची माहिती कळताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धरणावर धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. जोपर्यंत पाणी सोडणार नाहीत असे लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील भगवान बाबा गडावर चोरी. भगवान बाबांच्या वापरातील वस्तू ठेवलेल्या वस्तू संग्रहालयात चोरी. संग्रहालयात असलेल्या रायफलचा सांगडा आणि 1 तलवार चोरीला. पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल. मात्र, या चोरीमुळे पाथर्डी तालुक्यात उडाली खळबळ.
सोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रबाबत वेगळीच माहिती समोर. प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची पोलिसात तक्रार. जात वैधता पडताळणी समितीने दाखला अवैध असल्याचा निर्णय देण्याआधीच पोलिसात तक्रार. 9 तारखेला प्रवासादरम्यान दाखला हरवला, 14 तारखेला पोलिसात खासदारांच्या नावाने तक्रार अर्ज. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारीला या जात प्रमाणपत्र बाबत अंतिम सुनावणी पार पडली. त्यावेळी दाखला उच्च न्यायालयात असल्याची माहिती खासदारांच्या वकिलांनी दिली होती.
केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी उठविन्याचे जाहीर करताच कांद्याच्या भावात आज लासलगाव बाजार समितीत बाजार भावात सुधारणा झाल्याचे पहावयास मिळाले. मंगळवारच्या तुलनेत आज लासलगाव बाजार समितीत जास्तीतजास्त भावात क्विंटल मागे 391 रुपये, सरासरी भावात 350 रुपयांची तर कमीत कमी भावात 100 रुपयाची झाली वाढ. मंगळवारी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 900 रुपये, जास्तीतजास्त 1961 रुपये तर सरासरी 1650 भाव मिळाला होता. आज कमीत कमी 1000 रुपये, जास्तीतजास्त 2352 रुपये तर सरासरी 2000 रुपये इतका भाव मिळाला आहे. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यात देखील भावात सुधारणा होत असल्याचे पाहून शेतकऱ्यांना मध्ये समाधानाचे वातावरण असून निर्यात बंदी उठवल्याचे स्वागत शेतकऱ्यानी केलय.
मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम आहे, म्हणून सदन 2 पर्यंत स्थगित

दिल्लीतील हिंसा व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे भडकवल्याची माहिती तपास यंत्रणेतील सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीतील हिंसाचारात मोठ्या प्रमाणात गावठी कठ्ठ्यांचा वापर झाल्याचंही कळत आहे. आतापर्यंत 130 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात, तर अनेकांचे फोन जप्त केले आहेत. दोन्ही समुदायांकडून कुठल्या भागात दगडफेक करायची, दगडं कुठून आणायचे, दगडांशिवाय लाठ्या-काठ्यांचा बंदोबस्त करण्याबाबत माहिती शेअर करण्यात आली होती. स्थानिकांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या सीमेलगतच्या भागातील नागरिकांनाही हिंसाचारासाठी बोलावल्याची माहिती मिळत आहे.
नाट्य संमेलन लोगो अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलताना म्हणाले, संमेलन आपण करतो तेव्हा तो नाट्य उत्सव असतो. यंदा राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत. त्याची सुरुवात सांगलीतुन हे योग्यच. तंजावरमध्ये मराठी जतन होते. तिथे सरस्वती ग्रंथालय आहे. तिथे 300 वर्षांपूर्वीच मराठी साहित्य आहे. त्या ग्रंथालयाच्या पुनउभारणीच काम महाराष्ट्राने केलं आहे. त्यासाठी मोडी लिपीचं शिक्षण आपण काहींना दिलं. तिथल्या साहित्याच पुनर्लेखन केलं गेलं आणि साहित्य जतन झालं.
हिंगोली : शहरातील जुने ग्रामीण रुग्णालय रोडवरील नगरपालिकेची शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पाईपलाईन फुटल्याने पाण्याच्या दबावामुळे उंचच उंच फवारे उडत होते. सध्या पालिकेकडून वाया जात असलेले पाणी थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातायेत.
मुंबई : जुन्या सरकारच्या कल्पनेची नव्या सरकारकडून अंमलबजावणी. सुमारे सात कोटी रुपये खर्चून खासगी कंपनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री हेल्पलाइनचा प्रयोग
यवतमाळ : येथील दारव्हा रोडवरील एका हॉटेलमध्ये लग्न समारंभ होता. या लग्नात सहभागी होण्यासाठी आपल्या आई-वडिलांसोबत एक 10 वर्षांची चिमुरडी या समारंभात सहभागी होण्यासाठी आली होती. याच हॉटेलमधील एका सफाई कामगाराने या चिमुकलीला पकडून विनयभंग केला. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. अक्षय चांदेकर असं या नराधमाच्या नाव आहे. पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेतले आहे. अक्षय हा काही दिवसांपासून या हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतोय.
सिंधुदुर्ग : तळकोकणच्या किनारपट्टीवर अचानक सुटलेल्या मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारीला ब्रेक लागला आहे. मासेमारीसाठी गेलेल्या काही नौकांनी समुद्रातच नांगर टाकून ठेवला आहे. मासळी कमी मिळत असल्याने मच्छीमार त्रस्त आहेत. ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर सहा छोटी-मोठी वादळे येऊन गेली. त्याचा परिणाम मासेमारीवर झाला. 31 डिसेंबरला पर्ससिननेट मासेमारी बंद झाली. त्यानंतर फिशिंग, ट्रॉलिंगसह गिलनेटद्वारे मासेमारी सुरू आहे. जानेवारी महिन्यात बऱ्यापैकी मासळी मिळते. यंदा ती परिस्थिती नसल्याचे मच्छीमारांचे मत आहे. फेब्रुवारी महिनाही यथातथाच आहे. यंदा हंगामात मासेमारी व्यवसाय सर्वाधिक अडचणीत सापडला आहे. गेले आठ ते दहा दिवस मच्छीमार समुद्रात जात आहेत पण त्यांना म्हणावी तशी मासळी मिळत नाही. पहाटेपासून अचानक वारे वाहू लागले असल्यामुळे नौकांनी सुरक्षित बंदरांचा आसरा घेतला. पाण्याला प्रचंड करंट असल्यामुळे जाळी स्थिर राहत नव्हती. काही नौका समुद्रात नांगर टाकून उभ्या आहेत.
सरोगसीच्या कायद्यात केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. पतीचा मृत्यू आणि घटस्फोटानंतरही महिलांना सरोगसी करता येणार आहे. आतापर्यंत लग्नानंतरच्या 5 वर्षानंतरच सरोगसी करता येत होती. मात्र केंद्र सरकारने आता ती अटही रद्द केली आहे.
एटीएममध्ये यापुढे दोन हजारांच्या नोटा मिळणार नाही, इंडियन बँकपाठोपाठ आता सर्वच बँकांच्या एटीएममधून दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बंद होणार आहे. त्याऐवजी 100 रुपये, 200 रुपये 500 रुपये मूल्याच्या नोटा एटीएममध्ये मिळतील. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोल्हापूर : सलमान खानने कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव दत्तक घेतले आहे. खिद्रापूर हे 100 टक्के पूरबाधित झालेलं गाव आहे. सलमान खान फिल्म आणि एलान फाऊंडेशनने यासंबदर्भात जिल्हा परिषद सोबत करार केलाय. खिद्रापूरमधील 70 घरं सलमान खान बांधून देणार आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. 'वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा' या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत फडणवीसांनी लिहिलेल्या दोन पत्रांचं काय झालं? या पत्राची केंद्रान दखल न घेणे हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचा अपमान आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे. याच अग्रलेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यात आलं आहे. 2002 पर्यंत संघाने तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज का मानला नाही? असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
दिल्लीतील हिंसाचार हा गुप्तचर यंत्रणांचा आणि गृहमंत्रालयाचा पराभव असल्याची टीका प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी केली आहे. शिवाय, आंदोलनं हिंसक नव्हे तर शांततेतही करता येतात. पण जर हिंसा होत असेल तर त्यावर पौलादी हातांनी नियंत्रण मिळवायला हवं, अशी टीकाही रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
कांद्यावर लावण्यात आलेली निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा कांद्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मार्चमध्ये जवळपास 40 लाख टन कांदा बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.
आज दुपारी 12 वाजता मार्च काढून सोनिया गांधी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपतींना भेटणार आहेत. तसेच तीन दिवस गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कुठे होते? असा सवाल करत सोनिया गांधींनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या 27 वर गेली असून 100 जणांना अटक करण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...



1. दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या 27 वर, 100 जणांना अटक, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज राष्ट्रपतींना भेटणार
2. कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकार उठवणार, यंदा कांद्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता असल्यानं निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
3. हरभरा, तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची जात विचारल्यानं संताप, मराठवाड्यातला धक्कादायक प्रकार उजेडात, जातीचा रकाना हटवण्याची मागणी
4. मराठी विषय न शिकवल्यास शाळेचा परवाना रद्द तर संचालकांना 1 लाखाच्या दंडाची तरतूद, मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला विधानपरिषदेत विधेयक मंजूर
5. कोरोनाची औषधं घेऊन भारतीय विमान चीनमध्ये, परतीच्या प्रवासात 80 भारतीयांसह मित्र देशाच्या 40 नागरिकांना घेऊन येणार
6. सरोगसीच्या कायद्यात केंद्र सरकारकडून मोठा बदल, पतीचा मृत्यू आणि घटस्फोटानंतरही महिलांना सरोगसीचा अधिकार

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.