ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं निधन
दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा...
सबनीस यांनी त्यांच्या व्यंगचित्र कारकिर्दीला १९६८ साली सुरु केली होती.
आर. के. लक्ष्मण यांचे टाईम्स ऑफ इंडियातील तर बाळासाहेब ठाकरे यांचे मार्मिकमधील व्यंगचित्रांमधून प्रेरणा घेत, सबनीस व्यंगचित्रकारितेकडे वळाले होते.
त्यांच्या व्यंगचित्र कारकिर्दीला यंदा ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल फेब्रुवारी २०१९ मध्ये 'रेषा विकासची भाषा ५० वर्षांची' या संकल्पनेखाली त्यांचा गौरव करण्यात आला. मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील सरकारचं डोक ठिकाणावर आहे का? : फडणवीस
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना भर चौकात उभे करून गोळ्या घालाव्यात, अशा प्रकारचे भाष्य कर्नाटकातील कनसे या पक्षाचा नेता भीमाशंकर पाटील याने केले आहे. त्यानंतर आज त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कनसेचा जाहीर निषेध करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर म्हणाले की, सीमा प्रश्न गेली कित्येक वर्षे लोकशाहीच्या मार्गाने शांततापूर्वक आंदोलने प्रसंगी सत्याग्रह करून सुरु आहे. कर्नाटक राज्यात साडे तीन लाख मराठी बांधव दाबले गेले आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी हा लढा सुरू आहे. हा लढा निवाड्यासाठी कोर्टात गेला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वर्षा बंगल्यावर सीमा भागातील सर्व नेत्यांची बैठक घेऊन महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या वकिलांना जलदरित्या कोर्टात केस चालावी, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. कर्नाटकातील भाजप सरकारने अशा वाचाळवीरांना वेळीच आवर घालावा अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी दिला आहे.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा...
1. एकनाथ खडसेंच्या तक्रारीची भाजप नेतृत्वाकडून दखल, फडणवीसांसह राज्यातील भाजप नेत्यांना दिल्लीत बोलावणं, जेपी नड्डांकडून खडसेंना कारवाईचं आश्वासन
2. मिसेस फडणवीस आणि शिवसेनेतला वाद टोकाला, अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळवण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय
3. नागरिकत्त्व दुरुस्ती कायदा 40 टक्के हिंदूंविरोधात, मुंबईत भव्य मोर्चा काढणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, काँग्रेस, राष्ट्रवादीवरही हल्लाबोल
4. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, तर दिल्लीत जामियाचे विद्यार्थी यूपी पोलिसांना घेराव घालण्याच्या तयारीत
5. अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक, एसटीतील ४ प्रवाशांचा मृत्यू तर १५ जण जखमी, एसटीचाही चक्काचूर
6. भारतीय हवाईदलातील मिग २७ चं युग आज संपणार, ४ दशकांहून अधिक काळ पराक्रम गाजवणारं मिग २७ लढाऊ विमान आज निवृत्त होणार, जोधपूर एअरबेसवर खास सोहळा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -