LIVE UPDATES | काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायाचा आदर करतो. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी आम्ही तयार आहोत. विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवणारच : चंद्रकांत पाटील
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्टात अंतिम फैसला, बहुमताच्या चाचणीचा दिवस ठरण्याची शक्यता
2. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एकजुटीचं दर्शन, ओळख परेडसह 162 आमदारांना शपथ, तर शक्तिप्रदर्शनावेळी फक्त 130 आमदार हजर, नारायण राणेंचा दावा
3. व्हिपचा अधिकार निलंबित नेत्याला नसतो, शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा, तर अजित पवारांशी संबंध नाही, धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती
4. सत्तेचं फोटोफीनिश' फडणवीस-अजित पवारच करणार असल्याचा आशिष शेलारांचा विश्वास, तर आदित्यने सोनियांच्या नावाची शपथ घेणं हा मोठा अपमान असल्याचा टोला
5. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या बाजूची खुर्ची रिकामी, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांसाठी जागा रिकामी ठेवल्याची चर्चा
6. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला आज 11 वर्ष पूर्ण, राज्यात ठिकठिकाणी शहीद पोलिसांना आदरांजली, तर मुख्यमंत्री मुंबई पोलिस जिमखान्यात शहीदांना श्रद्धांजली वाहणार
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -