मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाेलावली मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांची बैठक
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
26 Dec 2019 09:23 PM
DIG निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल, तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार, अल्पवयीन मुलीच्या वाढदिवशी विनयभंग केल्याचा तक्रार दाखल
गोंदिया जिल्याच्या तिरोडा तुमसर मार्गावर आज संध्याकाळी पाऊणे सात वाजे दरम्यान ट्रक आणि दुचाकी मध्ये भीषण धडक झाली. या धडकेत 40 वर्षीय सेवक बदने यांचा घटना स्थळीच मृत्यू झाला असून संतापलेल्या गावकऱ्यांनी ट्रकला आग लावली . मागील एका वर्षा पासून तुमसर गोंदिया राज्य महामार्गाचे काम संथ गतीने सुरु असून कधी डोळ्यात धूळ गेल्याने तर कधी रस्त्याचा काम सुरु असून वाहन चालकाने साईड न दिल्याने अपघात होतात . मात्र प्रशासन तरीदेखील दखल घेत नसलायने गावकऱ्यांनी याचा रोष व्यक्त करत ट्रकला आग लावली.
चिपळूण : माकडांना खाऊ घालण्याची हौस आली जीवावर, चिपळूणच्या कुंभार्ली घाटातल्या दरीत कोसळून युवक मृत, पाटण येथील सुरेश विभूते दुर्दैवी तरुणाचे नाव, माकडांना खाऊ घालण्यासाठी कठड्यावर बसला, तोल जाऊन 200 फूट खाली पडून झाला मृत्यू, संध्याकाळची घटना, तासभर शोधल्यानंतर मिळाला मृतदेह
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर आता अभिषेक होणार नाहीत, विश्वास्तांच्या बैठकीत ठराव मंजूर, वाद होण्याची चिन्हं
कल्याण : अंबरनाथमध्ये रस्त्याचं काम सुरू असताना दुकान कोसळलं, अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर चौकातील घटना, सुदैवानं दुकानात कुणीही नसल्यानं कुणाला इजा नाही, जेसीबीमुळे धक्के बसल्यानं दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप
निर्माणाधीन असलेला पूल कोसळून पुण्यात दोन जवानांचा मृत्यू, तर पाच जण जखमी, पुण्याच्या सैन्य महाविद्यालयातील घटना
पालघर : खारेकुरण येथे मोटरसायकलच्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी, नितेश कराटे असं मृत तरुणांचं नाव
पुण्यातील कर्वे रोडवरच्या फर्निचर दुकानाला आग.
अग्निशमनदलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बाेलवली मुंबई महापालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवकांची बैठक, प्रभागात राज्य सरकारशी निगडीत रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी बैठकीचे आयाेजन
,
बैठकीला मंत्रालयातील संबंधित अधिकारीही उपस्थित राहणार
विद्यार्थ्यांच्या नाश्त्यामध्ये सापडल्या अळ्या, जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार : - विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या नाश्त्यामध्ये अळ्या निघाल्याचा संतापजनक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत हा प्रकार घडला आहे. ही विज्ञान प्रदर्शनी 23 ते 25 डिसेंबरदरम्यान चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली होती. 23 तारखेला सकाळी नाश्ता करत असताना सिंदेवाही तालुक्यातील देवयानी शाळेतील एका मुलाच्या नाश्त्यात अळी आढळून आली. याची तक्रार शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मात्र या संबंधात शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात काय कारवाई करण्यात आलेली आहे या बाबत काहीही माहिती दिलेली नाही.
पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अभिषेक दळवी असे या 29 वर्षीय मुलाचे नाव होते. पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. अभिषेक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. अभिषेकचे वडील अजित दळवी हे पोलीस निरीक्षक आहेत. सध्या ते सांगली जिल्ह्यात कार्यरत असून त्यांचं कुटुंबीय हे पिंपरी चिंचवडमध्ये आहे. अभिषेकचे वर्षभरापूर्वी लग्न झाले आहे. तो आई आणि पत्नीसोबत पिंपरीत राहत होता. काल मध्यरात्री बेडरूमचे दार लाऊन तो दारू प्यायला आणि नंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ग्रहण काळात सिद्धिविनायकाचे लांबून दर्शन : -
ग्रहण कालावधीत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात पहाटे 5 झाली आहे. सकाळी 6 ते 7.30 दरम्यान श्रींचे दर्शन सुरु होते. परंतु ग्रहण कालावधीत भाविकांना श्रींचे दुरून दर्शन दिले जाईल. तसेच सकाळी 8 ते 10.55 पर्यंत श्रींवर जलाभिषेक होईल. ग्रहण समाप्तीनंतर सकाळी 11.30 ते दुपारी 12.05 वाजता पूजा आणि त्यानंतर गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन दुपारी 12.30 वाजल्यापासून सुरू होईल.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. अमृता फडणवीस अधिकारी असलेल्या अॅक्सिस बँकेच्या हातून पोलिसांची खाती जाण्याची चिन्हं, लवकरच निर्णयाची शक्यता
2. गृहमंत्र्यांच्या खुर्चीवरुन राष्ट्रवादीत रस्सीखेच, सूत्रांची माहिती, अजित पवार, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील शर्यतीत
3. कर्जमाफीच्या धोरणात बदल करा, नाहीतर वेगळ्या भाषेत सांगू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा
4. जनतेनं राज्य दिलं आहे, तर किमान मंत्रीमंडळाचा विस्तार तरी करा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला टोला
5. मी राष्ट्रवादीतच, पुण्यातल्या कार्यक्रमात शरद पवारांशी खलबतं केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांचं विधान, तर अजित पवारांच्या हर्षवर्धन पाटलांशी कानगोष्टी