अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jan 2020 08:49 PM
एस टी मध्ये जसा संकटकाळी दरवाजा असतो तसे शरद पवार आहेत : संजय राऊत
शरद पवार यांची सुरक्षा काढली यावर सरकारने स्ट्रांग प्रत्तिक्रिया द्यायला हवी, उद्धव ठाकरे बोलले होते की आम्ही दिल्लीपुढे झुकलो नाही. हे आता दाखवायला हवे, महाराष्ट्रातुन भाजपची सत्ता जाणे हाच मोठा धक्का : संजय राऊत
अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर
अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर
शिर्डी : शिल्पा शेट्टीनं घेतलं साईदर्शन, पती राज कुंद्रा आणि परिवारासह शिल्पाची साईमंदिरात हजेरी, द्वारकामाई मंदिरातही शिल्पाने घेतलं परीवारासह दर्शन
जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
विधानसभा आणि जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही, दोन्ही ठिकाणी आपल्याला सत्ता स्थापन करता आली नाही, विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला 105 जागा जिंकून शिवसेनासोबत मिळून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पूर्ण बहुमत मिळालं, त्यामुळे विधानसभेत आपण पराभूत झालो हे मला मान्य होणार नाही, नंतर शिवसेनेने धोका दिल्यामुळे आता आपल्याला जनतेच्या प्रश्नांसाठी लढा द्यायचा आहे, मला वाटते निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतो, कधी यश मिळते कधी मिळत नाही, नागपुरात आपली ताकद आहे. कार्यकर्त्यानी आत्मविश्वासाने सामोरे जायला पाहिजे; असं नितीन गडकरी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलताना म्हणाले.
अन्यायाविरोधी बोलणं म्हणजे नक्षलवाग नाही : शरद पवार
सत्य बाहेर येईल या भितीने एनआयएकडे तपास : शरद पवार
कायदा-सुव्यवस्था राज्य सरकराचा अधिकार : शरद पवार
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राज्य सरकारकडून एनआयएकडे देण्याच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय, तसेच केंद्राचा निर्णय संविधानाच्या विरोधातला असल्याचं आव्हाड म्हणाले
गृहमंत्री अनिल देशमुख यांचं टीकास्त्र, केंद्र सरकारला काही लोकांना वाचवायचंय, एनआयएकडे तपास सोपवणं चुकीचं : गृहमंत्री अनिल देशमुख
26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात जनरल अलर्ट, महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त
अमरसिंह पाटील यांचं दीर्घ आजारानं निधन, अमरसिंह पाटील उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मेहुणे, रूबी हॉल रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास, इस्मानाबादच्या तेर या मूळ गावी अत्यंसंस्कार होणार
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ एसटी पुलावरुन कोसळून अपघात झालाय, मुंबईहून दापोलीकडे जाताना पहाटे साडे पाच वाजता कळमजे पुलावरील घटना, अपघातात 20 प्रवासी जखमी, तर 2 प्रवासी गंभीर, अपघातातील जखमींना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.
छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीनं तणाव आणि नैराश्यामुळं आपलं आयुष्य संपवलं आहे. अभिनेत्री सेजल शर्मानं मीरारोड रॉयल नेस्ट या इमारतीत गळफास घेत आत्महत्या केली. स्टार प्लसवरील दिल तो हॅप्पी है मालिकेत तिनं काम केलं होतं.

कुर्ला येथील एस जी बर्वे मार्गावर असलेल्या मेहता इमारतीत लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. इमारतीमधून स्फोटाचे आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
दैनिक सामनातून राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्यात आलंय. मराठी प्रश्नावर राज ठाकरेंना काही करता आलं नाही. त्यामुळे ते हिंदुत्वावादी मुद्द्याकडे वळले आहेत. पण हिंदुत्व पेलणं हे येरागबाळ्याचा खेळ नाही. असं म्हणत थेट राज ठाकरेंवर टीका कऱण्यात आली आहे. एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे भाजप असल्याचा टोलाही सामनाच्या अग्रलेखातून हाणल आहे. एका महिन्यापूर्वी राज ठाकरेंनी सीएएला विरोध केल्याची आठवणही सामनातून करुन दिली आहे. तसेच अमित शाहांच्या खेळीचे राज ठाकरे बळी ठरल्याचा आरोपही सामनाच्या आग्रलेखातून करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...


 


1. प्रजासत्ताक दिनी हवाई हल्लाच्या धोका, गृहमंत्रालयाचे सुरक्षा यंत्रणांना सावधगिरीच्या सूचना, ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता व्यक्त


 



2. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे, राज्य आणि केंद्रामध्ये ठिणगी, काँग्रेस-राष्ट्रवादीची केंद्रावर टीका


 



3. मनसेचे दोन झेंडे म्हणजे घसरलेल्या गाडीचं लक्षण, सामनातून टीकास्त्र, राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे भाजप असल्याचाही आरोप


 



4. मुंबईच्या नाईटलाईफमध्ये रात्री दीडनंतर मद्यविक्रीस बंदी, जुहू, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, नरिमन पॉइंटवर उपहारगृह चालवण्यास परवानगी


 



5. महाराष्ट्रातल्या कृषी विकासासाठी सरकारचा जागतिक बँकेसोबत 1500 कोटीचा करार, ग्रामीण भागाचा कायापालट करण्यावर भर देणार


 



6. अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येनं बॉलिवूड हादरलं, आत्महत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून अधिक तपास सुरु


 


एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.