LIVE UPDATES | नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथे ब्लँकेट न दिल्याने हॉटेल चालकाची वेटरकडून हत्या
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
25 Feb 2020 11:58 PM
नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथे पांघरायला ब्लँकेट न दिल्याने वेटरने हॉटेल मालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. प्रकाश बालगोविंद जयस्वाल यांचे वडंबा शिवारात धाबा/हॉटेल आहे. त्यांच्याकडे आरोपी कारा हा वेटर म्हणून काम करायचा. तो थोडा रागीट आणि लहरी स्वभावाचा होतात. आज सकाळी तो झोपला असताना थंडी वाजत असल्याने त्याने मालक प्रकाशला ब्लँकेट मागीतले, मात्र, प्रकाश यांनी ते न दिल्याने कारा याने त्यांना लाकडी काठीने मारून गंभीर जखमी केले. दुपारी प्रकाश जयस्वाल यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी वेटरला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
बीड : घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. यानंतर अत्याचार झाल्याच्या घटनेने मनस्ताप झाल्यामुळे पीडित महिलेने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची तक्रार मयत महिलेच्या पतीने दिलीय. या तक्रारीवरुन आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी राम नवघरे वय 32 वर्षे हा फरार आहे.
औंढा नागनाथ येथे रथोस्थवाला 10 वाजता होणार सुरुवात. एक लाखाच्या वर भाविक औंढा नगरीत दाखल. मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या जाणार.
उमरी तालुक्यातील शिरूर येथे 85 वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरुन हत्या. अंगावरील सर्व दागिने काढून घेऊन हत्या करण्यात आली असून राहत्या घरातच ही घटना घडली. या घटनेमुळे उमरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक, 26 मार्चलाच लागणार निकाल, राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपतोय
धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची बदली, विश्वास पांढरे यांची बदली नेमकी कुठे आणि कोणत्या पदावर याचा उल्लेख बदली आदेशात नाही, धुळ्याचे पोलीस अधीक्षकपदी नागपूरचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांची नियुक्ती
नुकत्यात हाती आलेल्या एका सर्व्हेनुसार भारतीय आजकल त्यांच्या आहारात डाळी आणि दुधाचं कमी सेवन करत असल्याची माहिती समोर आलीय. अंड्याप्रमाणे ब्रँडींग करण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्याचं मुख्य कारण असल्याचं बोलंलं जातंय. मात्र, भारतीयांच्या आहारातून डाळीचं प्रमाण कमी झाल्याबाबत इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे उपाध्यक्ष बिमल कोठारी यांनी नकार दिलाय. मात्र, डाळीचं ब्रँडींग करून त्याचं पोषक आहारातील महत्त्व पटवून देण्यात आम्ही कमी पडलो ही गोष्ट त्यांनी मान्य केली. तसेच येत्या काळात ही कमी भरून काढू असं आश्वासन त्यांनी दिलंय.
नाशिक : सराफा व्यावसायिकांची बुधवारी शहर बंदची हाक, सराफा व्यावसायिक विजय बिरारीच्या मृत्यू प्रकरणी पुकारला बंद. हैदराबाद पोलीस सोने चोरीच्या घटनेची चौकशी करत असताना शासकीय विश्राम गृहाच्या चौथ्या मजल्यावरून पडून झाला मृत्यू. मृत्यू संशयास्पद असल्याचा कुटुंबियांचा आरोप. नाशिक पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची बदली, विश्वास पांढरे यांची बदली नेमकी कुठे आणि कोणत्या पदावर याचा उल्लेख बदली आदेशात नाही, धुळ्याचे पोलीस अधीक्षकपदी नागपूरचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांची नियुक्ती
नाशिक : शहरात आजपासून दोन दिवसीय चिकन फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. नाशिक पोल्ट्री फार्म अँड ब्रीडर्स असोसिएशन मार्फत डोंगरे वसतीगृहावर या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. आज संध्याकाळी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एरव्ही किमान दीडशे रुपयांना मिळणारी चिकन बिर्याणी या फेस्टिव्हलमध्ये फक्त 30 रुपयात उपलबध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासोबत चिकन फ्राय आणि बॉईल अंडीही देण्यात येतेय त्यातही महिला आणि विद्यार्थ्याना पाच रुपये सवलत दिली जाते आहे. खरं तर चिकन खाल्ल्यामुळे कोरोना वायरसची लागण होत असल्याची अफवा सोशल मीडियात पसरल्याने त्याचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला असून तब्बल 600 कोटी रुपयांचा त्यांना तोटा झालाय. त्यामुळे कोरोना आणि चिकनचा काहीही संबंध नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये हे आवाहन या फेस्टिव्हलच्या माध्यमातून केले जाते आहे.
अमरावती : दर्यापूर येथील जुन्या शहरात एका 55 वर्षीय व्यक्तीने सात वर्षीय चिमुकल्या मुलीवर चॉकलेटचे आमिष देऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली. दर्यापूर पोलिसांनी आरोपी शेख नजीम शेख अनु याला अटक केली आहे.
हातकणंगले तालुक्यातील आळते इथं दोन गटात हाणामारी. दोन्ही गटाकडून हातकणंगले पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल. हाणामारीत सर्फराज मुल्लाणी जखमी झाल्याची माहिती.
परभणी : रेल्वे स्थानकाच्या जवळच एका रेल्वे रुळावर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून मालगाडी गेली, सुदैवानं हा मनुष्य पडून राहिल्याने त्याचा जीव वाचला. परंतु हा व्यक्ती कोण होता आणि त्याने कशामुळे हे कृत्य केले हे मात्र समजू शकले नाही. बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या रेल्वे मधून एका प्रवाशाने हा व्हिडीओ घेतलाय.
LIVE | राज्यपालांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लाईव्ह
- ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी
- सरपंच निवडीचा कायदाही नियमबाह्य पद्धतीने मंजूर करुन घेतला
- राज्यपालांना यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती
चंद्रपूर : जिल्ह्यातील दारुबंदी समिक्षा समितीला निवेदन देण्याची मुदत आज संध्याकाळी 6 वाजता संपली. संध्याकाळी 6 पर्यंत समितीला मिळाली 2 लाख 82 हजार 412 निवेदने. धक्कादायक म्हणजे यातील जवळपास 20 हजार 800 दारुबंदीच्या समर्थनार्थ, तर 2 लाख 62 हजार निवेदनं दारुबंदीच्या विरोधात.
पुणे : शेजारणीकडे घराची चावी ठेवणे पडले महागात; बनावट चावी तयार करून लाखो रुपये चोरले. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. शहरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
शिवभोजन योजनेसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पाच कोटी देण्याचा निर्णय
शिवसेनेचे नेते मुख्य सचिवांवर नाराज आहे. सचिवांनी नियुक्त्या करण्याआधी या त्रूटी का कळवल्या नाही?, असा सवाल शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्य सचिवांकडे व्यक्त या विषयी नाराजी व्यक्त केली आहे.
नांदगांव-बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद. कांद्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहून शेतकरी संतप्त. आज कांद्याला मिळाला प्रति क्विंटल सरासरी 1400 ते 1600 रुपये इतका भाव मिळालाय तर, काल 1851 रुपये भाव होता.
खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीचे अध्यक्ष, तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरची नियुक्ती रद्द. दोन लाभाची पदं असल्याचा होत होता आरोप. तसेच अधिवेशनात विरोधकांकडून या मुद्द्यावर कोंडी होणार त्याआधीच नियुक्त्या रद्द करण्याचा सरकारचा निर्णय.
धुळे : - महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज राज्यात भाजपचं एल्गार आंदोलन झालं. मात्र, धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन आगळ्यावेगळ्या पध्दतीने केलं. आंदोलनात नंदीबैल आणून त्याची पूजा करून त्याला या महाविकास आघाडीने केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी विचारले असता नंदीबैलाने नाही, अशी इशारा करत मान डोलावली. भाजपचे हे आंदोलन धुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतंय.
मनमाड : बागलाणच्या वायगाव येथील सरपंचासह संतप्त शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकले. तलाठी गायकवाड यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यावर त्याची माहिती शासनाकडे पाठविली नाही, त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले, असा आरोप शेतकऱ्यांनी करून तलाठ्याला निलंबित करून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.
आझाद मैदानात भाजपचं आदोलन सुरु, आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे बडे नेते सहभागी
दिल्ली मध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाच्या विरोधात मुंबई च्या मरीन ड्राईव्ह मध्ये काल रात्री काही विना परवानगी प्रदर्शन करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी यावर कडक कारवाई करत 22 ते 25 आदोलकांवर गुन्हा दाखल केला असून 10 लोकांची ओळख पटवून पुढील तपास सुरू केलं आहे
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा टोल महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. एसएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. तसंच या टोलसाठी नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कारसाठी सध्या 230 रुपये मोजावे लागतात. नव्या दरानुसार 1 एप्रिलपासून 270 रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा टोल महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. एसएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. तसंच या टोलसाठी नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कारसाठी सध्या 230 रुपये मोजावे लागतात. नव्या दरानुसार 1 एप्रिलपासून 270 रुपये मोजावे लागणार आहेत.
विरोधकांच्या स्थगन प्रस्तावावर विचार सुरू - नाना पटोले
विरोधकांच्या स्थगन प्रस्तावावर विचार सुरू - नाना पटोले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. सकाळी 10 वाजता डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचं राष्ट्रपती भवनात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. भारतीय सैन्यदलाकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देखील देण्यात येणार आहे. यादरम्यान भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.
अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, सातबारा कोरा कधी करणार, सरकारने उत्तर द्यावं, विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची मागणी
अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, सातबारा कोरा कधी करणार, सरकारने उत्तर द्यावं, विरोधीपक्ष नेते फडणवीस यांची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्जमुक्तीचं दिलेलं वचन पूर्ण करावं या मागणीसाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरुद्धही भाजपनं प्रश्न उपस्थित केले आहेत. नवी मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार आज भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सर्व पदाधिकारीही आझाद मैदानात आंदोलनाला बसणार आहेत.
दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईतही पाहायला मिळत आहेत. संध्याकाळच्या सुमारास सीएएविरोधात आंदोलक गेट वे ऑफ इंडिया परिसरात जमायला सुरुवात होताच पोलिसांनी तिथून त्याना हाकलून लावलं. त्यानंतर या आंदोलकांनी आपला मोर्चा मरिन ड्राईव्हकडे वळवला. तर तिथेही मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. त्यांनी आंदोलकांना इथूनही पिटाळून लावलं. जवळपास 100 ते 150 च्या संख्येनं आंदोलक मुंबईत आंदोलनाच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांनी हातात मेणबत्त्याही धरल्या होत्या. मात्र, दिल्लीतील आंदोलनाची खबरदारी घेत मुंबई पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यात दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. दहशतवाद, सुरक्षा आणि व्यवहारासह अनेक मुद्दयांवर दोन्ही नेते बातचित करणार असल्याची माहिती मिळत आहे. तरी, त्याआधी राष्ट्रपती भवनात ट्रम्प यांचं स्वागत होईल. त्यानंतर ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादनही करतील.
महात्मा गांधींच्या भूमीवर हिंसाचाराला कुठलीही जागा नाही, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला आहे. शिवाय दिल्लीतील जनतेनंही सद्भावना ठेवत आणि देशाला धर्माच्या आधारावर भडकवणाऱ्या शक्तींपासून सावध होत शांत राहण्याचं आवाहन देखील केलं आहे.
दिल्लीच्या जाफराबाद आणि मौजपूर भागात सीएए विरोधक आणि समर्थक यांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारात एका पोलिसासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 37 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. कालचा हिंसाचार पाहता दिल्लीतील अनेक भागात आज जमावबंदी लागू करण्यात आली आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील शाळांना सुट्टी जाहीर केली असून काही मेट्रो स्टेशनही बंद ठेवण्यात आलेत. हिंसाचारातील आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांच्या कांड्याही फोडल्या. जमावाने एक पेट्रोल पंपही पेटवून टाकला. दरम्यान ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच आंदोलनाला हिंसक वळण लागलंय का?, असा संशय व्यक्त केला जातोय. याबाबत गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिला अत्याचाराविरोधात भाजप आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसिलदार कार्यालयावर ही आंदोलनं होणार आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.
दिल्लीच्या जाफराबाद आणि मौजपूर भागात सीएए विरोधक आणि समर्थक यांनी एकमेकांवर दगडफेक केली आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारात एका पोलिसासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 37 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलच वादळी होण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ठाकरे सरकारनं कर्जमाफीची पहिली यादी काल जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यातल्या या यादीत 68 गावातल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे सरकारनं वचनपूर्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आहे. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ती दुसऱ्या यादीची विरोधकांनी मात्र शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका केली आहे.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. दिल्लीत सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये हिंसाचार, एका पोलिसासह पाच नागरिकांचा मृत्यू, उत्तरपूर्व दिल्लीत शाळांना सुट्टी जाहीर
2. दिल्लीतल्या आंदोलनाचे मुंबईतही पडसाद, गेटवे परिसरात आंदोलनाचा प्रयत्न, मात्र पोलिसांनी सुरक्षा वाढवत आंदोलकांना हाकललं
3. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस, हैदराबाद हाऊसमध्ये ट्रम्प आणि मोदीत द्विपक्षीय चर्चा, दहशतवाद, सुरक्षेसह व्यापारावर चर्चा
4. ठाकरे सरकारकडून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची विरोधकांची टीका
5. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकासआघाडीची महत्वपूर्ण बैठक, सरकार 5 वर्षे चालण्याचा विश्वास, विरोधकांच्या वक्तव्याकडं लक्ष न देण्याची सूचना
6. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, भारताची बांगलादेशवर 18 धावांनी मात, पूनम यादवची फिरकी पुन्हा प्रभावी
एबीपी माझा वेब टीम