LIVE BLOG | औरंगाबाद-जालना महामार्गावर ऑटो-रिक्षा आणि कारमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Dec 2019 07:02 PM
औरंगाबाद-जालना महामार्गावर ऑटो-रिक्षा आणि कारमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश, चार जण जखमी
शिर्डीत अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा वाढला, पावसाच्या सरी बरसल्याने साईभक्तांची धावपळ
शिर्डीत अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा वाढला, पावसाच्या सरी बरसल्याने साईभक्तांची धावपळ

मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकला सुरूवात, डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईसाठी अद्याप एकही लोकल नाही, लोकल नसल्यानं प्रवाशांची स्टेशनमध्ये मोठी गर्दी, वैतागलेले प्रवासी स्टेशन मास्तरांच्या ऑफिसवर धडकले, लवकरात लवकर लोकल सोडण्याची प्रवाशांची मागणी, मुंबई कडे जाणाऱ्या स्लो लोकल नसल्याने प्रवाश्यांचा गोंधळ
पुण्यातील वसंत बारमध्ये बाऊन्सरचा हवेत गोळीबार, 13 जणांविरोधात गुन्हा दाखल ; -

पुण्यात शहराच्या मध्यवस्तीत वसंत बार मध्ये बाऊन्सरने हवेत गोळीबार केला आहे. बिलावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांत वाद झाला होता. मद्यपान आणि जेवणाचं बिल ग्राहक देत नसल्याने हा वाद वाढत गेला. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांत बाचाबाची सुरू झाल्याने बाऊन्सरने पिस्तुलाद्वारे हवेत गोळीबार केला. मध्यरात्री मंगळवार पेठेतील वसंत बारमध्ये हा गोळीबार झाला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात ग्राहक आणि गोळीबार करणाऱ्या बाउन्सरसह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय काळोखे, संतोष बोराटे आणि सागर आगलावे या तिघांनी वसंत बारमध्ये जेवण आणि मद्यपान केलं होतं. मात्र बिलावरून वाद झाल्याने बाऊन्सर महिमा शंकर तिवारीने गोळीबार केला. वसंत बार हा सदानंद शेट्टी या राजकीय नेत्याच्या मालकीचा आहे. नुकताच त्यांनी काँग्रेसमधून भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवा, मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाला उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
सहलीहून परतणाऱ्या शाळेच्या बसचा अपघात, 15 विद्यार्थी, 3 शिक्षक जखमी : -

जुना पुणे-मुंबई महामार्ग अर्थात एनएच 4 वर शालेय सहलीहून परतणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला आहे. अपघातात 15 विद्यार्थी, 3 शिक्षक तसेच चालक ही जखमी झाला आहे. उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर महामार्गाच्या मधोमध बंद पडल्याने ही घटना घडली. तळेगाव दाभाडे येथील खिंडीत पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी विद्यार्थी भयभीत झाले आहेत.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एनपीआर आणि एनआरसीचा एकमेकांशी संबध नाही, गृहमंत्री अमित शाहांकडून स्पष्ट, हिंसक आंदोलनांदरम्यान लोकांशी संवाद साधण्यात कमी पडल्याची गृहमंत्र्यांची कबुली

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी आणि शिवभोजन योजनेला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी, दोन्ही योजनांसंदर्भातली नियमावली जाहीर

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र, सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित मागणीच्या पूर्ततेसाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेण्याची विनंती

ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करा, मुंडन घटनेनंतर आदित्य ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन, तर जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांना अमृता फडणवीसांचं ट्विटरद्वारे प्रत्युत्तर

'खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा' योजनेतील बक्षीस घेण्यास मुंबईकरांचा नकार, 155 तक्रारदारांपैकी 80 जणांनी बक्षीसाचे पैसे नाकारले

राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत हिंदू नपुंसक आहेत, संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, NRC च्या समर्थनार्थ 30 डिसेंबरला रस्त्यावर उतरणार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.