उसतोड मजूर महिलांना मासिक पाळीच्या चार दिवसात वेतन साखर कारखानदारांनी द्यावं, नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Dec 2019 10:39 PM
ऊस तोडीचं काम करणाऱ्या मजूर महिलांना मासिक पाळीच्या चार दिवसात वेतन साखर कारखानदारांनी द्यावं... जेणेकरून गर्भाशय काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये... नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतक-यांना सरसकट २ लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी, जनतेला १० रूपयांत जेवण देण्याच्या योजनांची घोषणा केली होती.
आज मंत्रीमंडळ बैठकीत या दोन्ही निर्णयांना मंजूरी
शेतकरी कर्जमाफीचा फायदा सुमारे 39 लाख शेतकरी यांना होणार,

प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 29,800 कोटी चा भार सरकारवर पडणार
शेतकरी कर्जमाफीचा फायदा सुमारे 39 लाख शेतकरी यांना होणार,

प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 29,800 कोटी चा भार सरकारवर पडणार
डिटेन्शन सेंटर अवैध वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी : अमित शाह
हिंसक आंदोलनादरम्यान संवाद साधण्यास कमी पडलो : अमित शाह
जनगणना, एनपीआरचा एनआरसीसोबत काहीही संबंध नाही : : अमित शाह
कायद्याला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार : अमित शाह
आंदोलकांनी चिथावणीला बळी पडू नये : अमित शाह
एनपीआरच्या माहितीचा एनआरसीसाठी वापर नाही : अमित शाह
एनपीआरच्या माहितीचा एनआरसीसाठी वापर नाही : अमित शाह
नालासोपा-यात वसई विरार महानगरपालिकेच्या कचरा उचलणा-या वाहनाने दोन तरुणाच्या मोटारसायकलला टक्कर दिल्याने भीषण अपघात झाला होता. यामध्ये मोटारसायकल वरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघात करणारा वाहनचालक फरार झाला आहे. नितेशकुमार दिवेदी आणि अभिषेक हरिकेत सिंग असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव असून, दोघेही 20 वर्षाचे आहेत. नालासोपारा पूर्व तुलिंज येथील वसई विरार महापालिकेच्या रुग्णालया समोर रात्री अडीच वाजता हा अपघात झाला आहे. या बाबत वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे. यात नितेशकुमार दिवेदी हा हाॅटेल मॅनेजमेंटच शिक्षण घेत होता.
नालासोपा-यात वसई विरार महानगरपालिकेच्या कचरा उचलणा-या वाहनाने दोन तरुणाच्या मोटारसायकलला टक्कर दिल्याने भीषण अपघात झाला होता. यामध्ये मोटारसायकल वरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघात करणारा वाहनचालक फरार झाला आहे. नितेशकुमार दिवेदी आणि अभिषेक हरिकेत सिंग असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव असून, दोघेही 20 वर्षाचे आहेत. नालासोपारा पूर्व तुलिंज येथील वसई विरार महापालिकेच्या रुग्णालया समोर रात्री अडीच वाजता हा अपघात झाला आहे. या बाबत वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे. यात नितेशकुमार दिवेदी हा हाॅटेल मॅनेजमेंटच शिक्षण घेत होता.
बीड : एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघातात चार जण ठार, 15 जण जखमी, केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथील घटना
पुण्यात विमाननगर भागात लिफ्ट मागितलेल्या परदेशी महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबद्दल 28 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलिस स्टेशला फिर्याद दिली आहे. काल मध्यरात्री बारा ते पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडीत तरुणी रात्री बाराच्या दरम्यान मुंढवा येथील हॉटेलमधून बाहेर पडली. त्यावेळी मोबाईलवरून घरी जाण्यासाठी कॅब बुक करता असताना पांढऱ्या रंगाच्या बाईकवरून एक तरुण आला. त्याने तिला लिफ्ट दिली आणि फोन करून मित्रालाही बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी तिला बाईकवर मध्यभागी बसवून प्रवासाला सुरुवात केली. संबंधित तरुणीला संशय आल्याने तिने फोनवर तिच्या घराचे लोकेशन टाकून बघितले मात्र ते विरुद्ध दिशेने जात होते. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला मारहाण करून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर तरुणीच्या विनंतीनंतर त्यांनी तिला मुख्य रस्त्यापर्यंत सोडण्यासाठी पुन्हा लिफ्ट दिली. रस्त्याजवळ आल्यावर तिने आजूबाजूला उभी असलेली मुले बघून ओरडण्याचा प्रयत्न केला. ते मुले त्यांच्याकडे येत असल्याचे बघून त्यापैकी बाईक चालवणाऱ्याचा तोल गेला आणि ते तिघेही पडले. या अपघातात महिलेला दुखापत झाली मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. या संबंधी अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना मेरठमध्ये दाखल होण्यापूर्वी पोलिसांनी अडवलं,राहुल आणि प्रियांका मेरठमधील आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या परिवाराला भेटण्यासाठी जात होते
लातूर जिल्ह्यातील धनेगाव इथल्या तलावात सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह कोणाचा हे अद्याप समोर आलेलं नाही. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक दाखल झालंय. पोलीस पुढील तपास करत आहेत.
बदलापुरात आजपासून हॉट एअर बलूनची हवाई सफर, बलूनमध्ये बसून बदलापूर शहर हवेतून पाहता येणार, अॅडव्हेंचर कॅम्पमध्ये पहिल्यांदाच हॉट एअर बलून सफर
शिर्डी : कोपरगावात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनात नागरिकांनी काढली महारॅली, भारतीय नागरिकत्व कायद्याचं समर्थन, विविध क्षेत्रातील नागरिक महारॅलीत सहभागी
शिर्डी : कोपरगावात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनात नागरिकांनी काढली महारॅली, भारतीय नागरिकत्व कायद्याचं समर्थन, विविध क्षेत्रातील नागरिक महारॅलीत सहभागी
रायगड : मुबंई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूरजवळ ट्रॅव्हल्सची ट्रेलरला मागून धडक, अपघातात जीवितहानी नाही, बसमधील सर्व 45 प्रवासी सुखरुप
पालघर : छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एनआरसी व सीएए विरुद्ध मूक मोर्चाचं आयोजन, सकाळपासूनच परिसरात चोख पोलीस बंदोबस्त, छत्रपती शिवाजी महाराज चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त

हर्षवर्धन शृंगला भारताचे नवे परराष्ट्र सचिव, सध्या ते अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहतात, 1984 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी असलेले शृंगला भारताच्या शेजारील देशांबाबतचे तज्ज्ञ मानले जातात

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....


 


1. ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त, वेळ खाणाऱ्या काँग्रेसला शरद पवारांचा टोला


 


2. मंत्रिमंडळासाठी हायकमांडची अशोक चव्हाणांना पसंती तर पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर फुल्ली, सूत्रांची माहिती, अजित पवारांच्या मंत्रिपदाची उत्सुकता शिगेला


 


3. महाराष्ट्रानंतर भाजपचं झारखंडमध्येही पानिपत, काँग्रेस-जेएमएम आघाडीला स्पष्ट बहुमत, दीड वर्षांत भाजपने 5 राज्ये गमावली


 


4. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना पुण्यात जिल्हाबंदी, शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी, भीमा कोरेगावमध्ये प्रशासनाची जय्यत तयारी


 


5. नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर जेवणाच्या ताटातून मासळी गायब, राज्यातील 22 टक्के मत्स्योत्पादन घटलं, खवय्यांची निराशा


 


6. विकी कौशल, आयुषमान खुरानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, हिंदीत पॅडमॅन तर मराठीत भोंगा ठरला सर्वोत्कृष्ठ सिनेमा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.