LIVE UPDATE | लातूर : पुलाच्या कठड्यावर कार आदळून दोन ठार, तीन जखमी

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Feb 2020 09:25 PM
लातूर : जिल्ह्यातील काजळा हिप्परगा गावा जवळील पुलाच्या कठड्यावर भरधाव वेगातील कार धडकल्याने जोरदार अपघात झाला. या अपघातात दोनजण जागेवरच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात राजाराम मारोती डिगोळे, सिकंदर गौस शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर उत्तम बालाजी देवदे, माधव भागवत देवदे व अन्य एक हे गंभीर जखमी झाले असून या तिघांना पुढील उपचारासाठी लातूर येथे नेण्यात आले आहे.  
औरंगाबाद : बजाजनगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्याठिकाणी शिवआरती ठेवण्यात आली होती. आरती झाल्यानंतर याठिकाणी कोणतंही राजकीय भाषण होणार नाही आणि करू नये अस जाहीर करण्यात आलं होतं. आरतीनंतर आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे कार्यक्रमस्थळी पोहचले. त्यानंतर एक खैरे भाषणं करतील, असं जाहीर केलं. त्यानंतर गोंधळ आणि धक्काबुकी झाली.
अमरावती : जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथील एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वर्धा नदीच्या पात्रात पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत 20 फेब्रुवारीला आढळला होता. गळा आवळून हा खून केल्याचे समोर येताच स्थानिक गुन्हे शाखा आणि मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी मृतकाच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराने हा कट रचला असून, मृताच्या पत्नीच्या प्रियकराने 50 हजार रुपयांत सुपारी देऊन हा खून करून घेतल्याची धक्कादायक बाब आज पोलीस तपासात समोर आली आहे. हनुमंत साखरकर यांच्या पत्नीचे मागील एक वर्षापासून संबंध असल्याचे पतीला कळल्यावर पती-पत्नीमध्ये वाद झाले आणि पत्नीने अखेर आपल्या प्रियकराला सांगितले की, मला माझ्या पतीपासून सुटका करून दे आणि प्रियकर आणि पत्नीने 50 हजारांत पतीला मारण्याची सुपारी दिली. 20 तारखेला हनुमंत यांचा गळा आवळून त्याचा खून केला आणि मृतदेह वर्धा नदीपात्रात एका पोत्यात मृतदेह टाकून दिला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीड : चित्रपटगृहासमोर अभिनेता, दिग्दर्शकास बेदम मारहाण, बायको देता का बायको, या चित्रपटातील कलाकारांवर जीवघेणा हल्ला. आशा टॉकीज परिसरात हल्लेखोरांकडून तोडफोड. हल्ला करून हल्लेखोर पसार.
अकोला : प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, पक्षाच्या दोन माजी आमदारांचा वंचित बहूजन आघाडीला रामराम. अकोल्यातील माजी आमदार हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कारांचा पक्षाचा राजीनामा. राज्यभरातील 48 प्रमुख आजी-माजी पदाधिकाऱ्यांचाही राजीनामा देणाऱ्यांत समावेश. पक्षाचा विश्वास संपला असल्याची आंबेडकरांना लिहिलेल्या राजीनामापत्रात टीका.
शिर्डी : थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करणे चुकिचं असल्याचे सांगत नवीन नेतृत्व तयार होवू द्यायचं नाही ही सरकारमधील लोकांची मानसिकता असल्याची टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलीय.
जालना : परतूर येथील लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयातील प्रकार, प्रश्नपत्रिकेचे मोबाईलमध्ये फोटो काढून उत्तरांचे झेरॉक्स पुरवणाऱ्या शिक्षकासह सात जणांवर पोलिसांची कारवाई, परतूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक, झेरॉक्स चालकासह 7 जणांवर गुन्हे दाखल, पोलिसांकडून झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर आणि मोबाईल जप्त. आज बारावीच्या हिंदी विषयाची पेपरला कॉपी पुरवल्यावरून कारवाई.
मागील वेळी मी जेव्हा नागपुरात आलो होतो, तेव्हा तीन दिवस मला हॉटेलच्या बाहेर जाऊ दिले नव्हते. तेव्हा ही मला न्यायालयाचे दार ठोठावे लागले होते. महाराष्ट्रात सरकार बदल्याने असं होणार नाही, असं वाटलं होतं. मात्र, पुन्हा अडवण्याचे प्रयत्न झाले : चंद्रशेख आझाद
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर चर्चा सुरू
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर चर्चा सुरू
चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा
सात मार्च रोजी मुख्यमंत्री शिवसैनिकांसह भेट देणार अयोध्येला
संजय राऊत यांची ट्वीट करत माहिती
चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा
सात मार्च रोजी मुख्यमंत्री शिवसैनिकांसह भेट देणार अयोध्येला
संजय राऊत यांची ट्वीट करत माहिती
चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा
सात मार्च रोजी मुख्यमंत्री शिवसैनिकांसह भेट देणार अयोध्येला
संजय राऊत यांची ट्वीट करत माहिती
जालना : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील संभाजी महाराजांच्या हत्येचे भाग वगळणार, डॉ अमोल कोल्हे यांचं आश्वासन, अर्जुन खोतकर यांची माहिती
मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान भेटीवर टीकेचा अधिकार भाजपला नाही- बाळासाहेब थोरात


देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्याला पंतप्रधानांना भेटावं लागतं - थोरात
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर : शरद पवार
शेतीवरचा भार कमी करायला हवा, शेतीवरील अवलंबून लोकसंख्या कमी झाली तर शेतीक्षेत्राचा विकास होईल, विकसित देशांचं हेच सूत्र आहे : शरद पवार
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | शेतीवर अवलंबून कुटुंब चालवणं आता कमी व्हायला हवं : शरद पवार
देवेंद्र फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री रहाणार नाहीत, असं वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. ते नागपुरात बोलत होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद मिळणार की, ते राज्यातील सत्ताकेंद्रात पुनरागमन करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
माझा महाराष्ट्र माझं व्हिजन! शरद पवार लाईव्ह

पहिल्या सत्रात शरद पवारांसोबत चर्चा येत्या दहा वर्षाच्या व्हिजनची
क्रिकेट टुर्नामेंटमध्ये भाजपनेत्याची हवेत खुलेआम फायरिंग, नवी मुंबईतील विहिंगर गावातील प्रकार, खारघर पोलीस ठाण्यात फडकेविरुध्द गुन्हा दाखल असून पोलीसांकडून पंढरीनाथ फडकेला अटक करण्यात आली आहे
क्रिकेट टुर्नामेंटमध्ये भाजपनेत्याची हवेत खुलेआम फायरिंग, नवी मुंबईतील विहिंगर गावातील प्रकार, खारघर पोलीस ठाण्यात फडकेविरुध्द गुन्हा दाखल असून पोलीसांकडून पंढरीनाथ फडकेला अटक करण्यात आली आहे
क्रिकेट टुर्नामेंटमध्ये भाजपनेत्याची हवेत खुलेआम फायरिंग, नवी मुंबईतील विहिंगर गावातील प्रकार, खारघर पोलीस ठाण्यात फडकेविरुध्द गुन्हा दाखल असून पोलीसांकडून पंढरीनाथ फडकेला अटक करण्यात आली आहे
अकोल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा उपचारादरन्यान म्रूत्यू, काल रात्री दहाच्या सुमारास तुषार पूंडकर यांच्यावर अकोटमधील कबूतरी मैदानावर दोन अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या
लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या मसीना बर्न रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री 12.30 च्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला आहे.
सरपंच निवडीबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाल्यानंतर राज्यपालांनी सही केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तरी, मंत्रिमंडळ हे अंतिम असतं, हे सांगायलाही देशमुख विसरले नाहीत.
काही वर्षांपासून रेडिरेकनरचे दर एक एप्रिलला जाहीर होतात. राज्यात अनेक ठिकाणी जमिनींचे, प्लॉटचे प्रत्यक्ष बाजार भाव हे रेडिरेकनरपेक्षा कमी असल्याच्या तक्रारी येत आहेत. स्थानिकांनी जर अशा प्रकारे बाजार भाव कमी असल्याचे सिद्ध केल्यास रेडिरेकनरचे दरही कमी करण्याचा निर्णय सरकार घेईन,' अशी भूमिका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली. तर गेल्या दोन वर्षांत रेडीरेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, काही भागांमध्ये जमिनींच्या दरात वाढ झाल्याने या वेळी रेडिरेकनरमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे ही सांगितले.
भाजपकडून उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजे पक्षात आले आणि पडले, त्यांचं योगदान काय? असा सवाल विचारला आहे. तसेच पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं काकडेंनी काल पत्रकार परिषद घेऊन म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. शिवसैनिकांना 'यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी' असं वाटत असलं तरी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचं ब्लड प्रेशर, शुगर वाढली असेल असा टोला मुनगंटीवारांनी लगावला. आणि त्यांची शुगर बॅलन्स करण्यासाठीचं मुख्यमंत्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना भेटल्याची कोपरखळी सुधीर मुनगंटीवार यांनी मारली आहे.
उद्धव ठाकरेंनी काल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली, याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. सोनिया गांधींच्या निवासस्थानी ही भेट झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये काल तासभर चर्चा झाली. केंद्रानं रखडवलेला महाराष्ट्राचा निधी, सीएए, एनआरसी आणि एनआरपी हे कायदे आणि याशिवाय इतर महत्त्वाच्या विषयांवर मोदी आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाली. भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सीएएला पुन्हा समर्थन दिलं आहे. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अमित शाह यांचीही भेट घेतली आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


 


महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...


 


1. दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंची मोदी, शाह, सोनिया गांधी आणि अडवाणींसोबत खलबतं, सीएएला समर्थनाची भूमिका कायम, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष


 



2. वारिस पठाणांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी, मुस्लिमांना चिथावणाऱ्या वक्तव्यानंतर ओवेसींची कारवाई, औरंगाबाद, बीड आणि पुण्यात पठाणांविरोधात आंदोलन


 



3. उदयनराजेंचं पक्षातलं योगदान काय? राज्यसभेसाठी भाजपची अधिकृत उमेदवारी मागताना संजय काकडेंचा सवाल, प्रदेशाध्यक्षांचं सूचक मौन


 



4. लासलगाव जळीतकांड प्रकरणातील पीडितेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू, आठवड्याभरापासून सुरू होते मुंबईत उपचार


 



5. क्रिकेट टुर्नामेंटमध्ये भाजपनेत्याची हवेत खुलेआम फायरिंग, नवी मुंबईतला प्रकार, भाजपनेता पंढरीनाथ फडकेला अटक


 



6. आज संघाच्या अंगणात भीम आर्मीचा मेळावा, अटी-शर्थींसह चंद्रशेखर आझाद उर्फ रावणाच्या सभेला न्यायालयाची परवानगी



एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.