LIVE UPDATES | या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : विरोधी पक्षनेते फडणवीस
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
21 Dec 2019 06:09 PM
विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद...
दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर विरोधकांचा सभात्याग, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न झाल्याने निषेध
या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : विरोधी पक्षनेते फडणवीस
शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करणार : मुख्यमंत्री
सरसकट कर्जमाफी हवी, राजू शेट्टींची मागणी
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज सीबीआय कोर्टानं पुन्हा एकदा फेटाळला
7/12 कोरा करण्याच्या शब्दाचं काय? : देवेंद्र फडणवीस
मी विदर्भाचा नातू, बाळासाहेबांची आई अमरावती मधली..मला विदर्भात आजोळ सारखं प्रेम मिळालं..आजोळचे आशीर्वाद माझ्यासाठी ठेवा : मुख्यमंत्री
पालघर : बोईसर - चिल्हार महामार्गावर नागझरी येथे भीषण अपघात, अज्ञात वाहनाची बाईकस्वारांना जोरदार धडक, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, नितीन भोये (22) आणि शैलेश भोये (23) या बऱ्हाणपूर येथील दोघांचा जागीच मृत्यू, धडक देऊन अज्ञात वाहन फरार, दोघेही मृत बोईसर येथील लुपिन कंपनीतील कामगार, पहाटे कंपनीत कामावर जात असताना घडला अपघात
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून गृहखातं राष्ट्रावादीकडे जाण्याची शक्यता आहे तर गृहनिर्माण किंवा नगरविकास दोघांपैकी एक खातं शिवसेनेकडे राहणार आहे. म्हणजेच राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री, गृहखातं आणि गृहनिर्माण किंवा नगरविकास खातं राहण्याची चिन्ह आहेत. खरंतर गृहखातं आपल्याकडेच राहावं यासाठी शिवसेना आग्रही होती.
हिंगोली - कळमनुरी येथे दगडफेक प्रकरणी 150 जनांवर गुन्हे दाखल, 20 जण पोलिसांनी घेतलं ताब्यात, एसटी बस, अग्निशमन दलाचं वाहन, खाजगी वाहने व दुकानावर दगडफेक आणि पोलिसांवर दगडफेक करुन सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईसह राज्यात आणखी 24 तास ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. अशी माहिती, हवामान खात्याचे अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. तर पुणे, कोल्हापूर, गगनबावडा, सातारा, सिंधुदुर्ग, गोवा या परिसरात तुरळक पाऊस पडल्याची नोंद झाल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईतील तापमान शुक्रवारी कमाल 28 अंश तर किमान 25 अंश इतके खाली आले होते. असेच वातावरण आजही राहणार असल्याची शक्यता होसाळीकर यांनी वर्तवली आहे.
औरंगाबाद : भाजपकडून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव, भाजप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी मांडला प्रस्ताव, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा भाजपाचा प्रस्ताव, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याची मागणी, प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवून मान्य करण्याची मागणी
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा
1. नागरिकत्त्व कायद्याविरोधातल्या हिंसक आंदोलनात यूपीत 6 जणांचा मृत्यू, 50 पोलीस जखमी, ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक
2. महाराष्ट्रातही मुस्लिम समाज रस्त्यावर, पुणे, औरंगाबाद, भिवंडीत विराट मोर्चे, तर बीड, हिंगोली, परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांचं शांततेतं आवाहन
3. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, विरोधक आजही शेतकरी कर्जमाफीचा मुद्द्यावरुन आंदोलन करण्याची शक्यता
4. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीन चिट, एसीबीच्या शपथपत्रावर फडणवीसांचा तीव्र आक्षेप, तर अजितदादांच्या उपमुख्यमंत्रिपदाचे राऊतांकडून संकेत
5. फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी, नारायण राणेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादी टॅक्स फ्री असल्याचं म्हणत पवारांवर टीकास्त्र
6. झारखंडमध्ये भाजपला दणका तर काँग्रेस आघाडीला फायदा होण्याची शक्यता, एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हे, सोमवारी झारखंड विधानसभेचा निकाल