LIVE UPDATES | धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीमधून लाखो लिटर पिण्याचं पाणी वाया
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
20 Mar 2020 08:01 PM
हिंगोली जिल्ह्यातील घरफोड्यांचे वाढते प्रमाण पाहता हिंगोलीचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार ताब्यात घेतले आहेत. ईश्वर पवार, राहुल पवार अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून आज पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम देखील जप्त केली.
भाईंदर : भाईंदर पश्चिमच्या मॅक्सेस मॉल मध्ये सुरू असलेल्या कॉल सेंटर मध्ये तरुण तरुणी काम करत असल्याची बातमी एबीपी माझा वर प्रसिद्ध करण्यात आली होती. आज मीरा भाईंदर मनपाचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी कॉल सेंटर मध्ये जाऊन पाहणी केली. कॉल सेंटर संपूर्ण पणे बंद करण्यात आली आहेत. आयुक्त चंद्रकांत डांगे स्वत: कॉल सेंटर मध्ये जाऊन त्यांनी पाहिणी दौरा केला आहे. मीरा भाईंदर मधील सर्व कॉल सेंटर बंद करण्यासाठी म्हटले आहे. त्यांना घरी काम करण्यास ही सांगितले आहे.
धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह मधून लाखो लिटर शुद्ध पिण्याचं पाणी वाया जातंय. गेल्या दोन तासांपासून हे पाणी वाहत आहे. एअर व्हॉल्व्हचे हे पाणी पांझरा नदी पात्रात जात असल्यानं नदी पात्राला तलावाचे स्वरूप आलं . एकीकडे धुळे शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असतांना दुसरीकडे अश्याप्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा, जिवती तालुक्यातील टेका मांडवा येथे विज पडून माय-लेकीचा मृत्य, प्रेमकला सोलंकर (52) आणि राधाबाई नरोटे (24) यांचा मृत्यू तर केशव सोलंकर जखमी, सावली तालुक्यात गारपिटीमुळे उन्हाळी धान, चना आणि गव्हाचे नुकसान
कोरोनावरून राजकारण करणा-या भाजप नेत्यांना प्रबोधिनी म्हाळगीमघ्ये क्वारोंन्टीन करा. आम्ही अशा संकटात मोदीचं पंतप्रधान म्हणून पाहिजे असं म्हणतो, ही राजकारण करण्याची वेळ नाही. महाराष्ट्रात मतभेद विसरून काम करणं गरजेचं, राजकारण करत असेल तर भाजपला विरोधात बसण्याचाही अधिकार नाही. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि आमदारांना प्रलोभनं दाखवली जात आहेत ते या देशाला शोभणारं नाही, संजय राऊत यांची टीका.
त यांचा भाजपवर हल्लाबोल; कमलनाथ यांनी स्वत;हून राजीनामा दिला. त्याचं अभिनंदन, पण कोरोनाच्या संकटावेळी फोडाफोडी योग्य नाही. महाराष्ट्रातलं सरकार पाडायला कोणाच्या “बापामध्ये” हिम्मत नाही, संजय राऊत आक्रमक
गेल्या 15 महिन्यांत मध्यप्रदेशच्या विकास कामांवर भर दिला आहे, शेतकरी, तरूणांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत : कमलनाथ
भाजपनं मध्यप्रदेशचा गळा घोटला, तर आमच्या सरकारने विकास कामांवर भर दिला : कमलनाथ
लोकांनी मला 5 वर्षांसाठी बहुमत दिलं होतं, भाजपला जनता माफ करणार नाही : कमलनाथ
भाजपनं जनतेला धोका दिला आहे, काँग्रेसला धोका देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : कमलनाथ
मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार धोक्यात, आज 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करायचं आहे
दिल्ली येथील निर्भया प्रकरणातील आरोपींना आज फाशी देण्यात आली आहे. आरोपींना फाशी दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेले मौन व्रत आंदोलन मागे घेतले आहे. राळेगण सिद्धी येथील यादवबाब मंदिरात दर्शन घेऊन अण्णांनी आपले मौन व्रत सोडले आहे. दिल्ली निर्भयातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावून 7 वर्ष झाली मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने 20 डिसेंबरला अण्णांनी मौन व्रत धरले होते. आज तब्बल 92 दिवसानंतर अण्णांनी आपले मौन व्रत सोडले आहे. आरोपींना फाशी दिल्याने न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी बोलताना दिली आहे. मात्र शिक्षेची अंमलबजावणी व्हायला 7 वर्षे लागल्याने हा विलंब का झाला याचा अभ्यास करून कायदे अजून कठोर करावे अशी मागणी देखील अण्णा हजारे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधे हॉटेल-मेस बंद होत असल्याने बाहेरून आलेल्या विद्यार्थी आणि नोकरदारांची जेवणाची भ्रांत मिटवण्यासाठी एका दांपत्त्यांचा पुढाकार, जोशी कुटुंबाची मदत
पिंपरी-चिंचवडमधे हॉटेल-मेस बंद होत असल्याने बाहेरून आलेल्या विद्यार्थी आणि नोकरदारांची जेवणाची भ्रांत मिटवण्यासाठी एका दांपत्त्यांचा पुढाकार, जोशी कुटुंबाची मदत
शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार जाहीर झाले असून जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील रणजितसिंह डीसले यांचा समावेश आहे. लंडन येथील वाकी फाऊंडेशनच्यावतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....
7 वर्ष 3 महिने आणि 3 दिवसांनी निर्भयाला न्याय, दिल्लीच्या तिहार जेलमध्ये पहाटे साडेपाच वाजता चारही नराधमांना फासावर लटकवलं
अखेर न्याय मिळाला, आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींना समर्पित, दोषींना फासावर लटकवल्यानंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया
देशात 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू', कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
कोरोना व्हायरसमुळे देशात चौथा बळी, पंजाबमधील 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, देशात 173 जण कोरोनाबाधित, सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील जमावबंदी डावलून थाटामाटात लग्न, बीडमध्ये आई-वडिलांसह भटजी, फोटोग्राफरला जेलची हवा
सर्वोच्च न्यायालयाचा मध्य प्रदेशातील 'कमलनाथ' सरकारला झटका, बहुमत चाचणी घेण्याचे आदेश, संध्याकाळी 5 वाजता फ्लोअर टेस्ट होणार
एबीपी माझा वेब टीम