Live Updates | अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा, धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला निर्देश
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Mar 2020 11:19 PM
पार्श्वभूमी
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in1. मुंबईत आजपासून प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी होणार, आदित्य ठाकरेंच्या निर्देशानंतर पालिका सज्ज, 2020 पर्यंत महाराष्ट्र प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार2. राज्य सरकारकडून कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, 2 लाख 97 हजार 907 शेतकरी ठरले लाभार्थी, उद्यापासून खात्यात पैसे जमा होणार3. राज ठाकरेंची मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार, शिवजयंतीसाठी 12 मार्चला राज ठाकरे औरंगाबादेत, निवडणुकीच्या तोंडावर सेनेला शह देण्याचा प्रयत्न4. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आज भूमिका स्पष्ट करणार, विनायक राऊत, उदय सामंत उपस्थित राहणार, तर उद्या नाणार समर्थकांची राजापुरात सभा5. गिरणी कामगारांच्या 3 हजार 894 घरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज सोडत, तीन मिलमधील 17 हजार गिरणी कामगारांचा सोडतीत समावेश6. मुंबई महापालिका आयुक्तांना परवानगीशिवाय एकही झाड तोडता येणार नाही, शिवसेनेकडून आयुक्तांच्या अधिकारावर कुऱ्हाड, एकमतानं ठराव मंजूर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नांदेड : हत्या प्रकरणात बालग्रहात शिक्षा भोगत असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यसभेसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्वपूर्ण बैठक, राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक, राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपणार, संख्याबळानुसार ७ व्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच

वर्धा : पंधरा वर्षाच्या मुलाचा साडेचार वर्षाच्या मुलीवर अत्याचार , समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद , बालकाची बालसुधारगृहात रवानगी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा, धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला निर्देश
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Majha Impact | भिवंडी : घाण पाण्यात धुवून भाजीपाला विकण्याचा किळसवाणा प्रकरण, भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल, हाशिम बचकू अन्सारी असं भाजी विक्रेत्याचे नाव,
भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अयोग्य व अपायकारक भाजी विक्री केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल
भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अयोग्य व अपायकारक भाजी विक्री केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Raj Thackeray Live | 14 वर्षात अख्खं रामायण घडलं, आपल्याकडं मात्र केवळ 14 वर्षात बांद्रा-वरळी सी लिंक बांधला गेला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंगोली : हिंगोली शहरात वादळी वाऱ्यासह कोसळल्या वीस मिनिटे अवकाळी पावसाच्या सरी, अचानक पावसाने हजेरी लावल्याने उडाली तारांबळ, अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंढरपूर व माळशिरस तालुक्यात पावसाची हजेरी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोलापूर : दिवसभराच्या विश्रांतीनंतर सोलापुरात पून्हा एकदा पावसाला सुरुवात, काल रात्री नंतर आता पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
,
सोलापुर शहरातील सर्व भागात मुसळधार पावसाची हजेरी
,
सोलापुर शहरातील सर्व भागात मुसळधार पावसाची हजेरी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Raj Thackeray Live | राज्यातलं सध्याचं सरकार दुर्देवी, सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात बसलाय : मनसे अध्यक्ष राज ठाकरे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गोवा:उत्तर गोव्यातील मोरजी येथे पकडले १.६५ कोटींचे अमली पदार्थ, रशियन पर्यटक वारसिली रखमानोव्ह याला अटक,त्याच्याकडून कॅनबीजची 33 किलो झाडे जप्त, पेडणे पोलिसांची कारवाई
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक : कोरोना सदृश्य रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह, घाबरण्याचे कारण नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या एका प्रवाशाचे कोरोनासाठीचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. राज्यात सध्या सात जण निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जालना : जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात अनेक गावात जोरदार पाऊस
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर - जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाऊस, गडहिंग्लज, आजरा शहरात पावसाची हजेरी, पावसाचा आठवडी बाजारावर परिणाम, ज्वारी, बटाटा पिकांवर परिणाम होणार, आंबा, काजूच्या उत्पादनावरही परिणाम होणार, सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात अर्धा तास धुवाधार पाऊस, ऐन उकाड्यात पावसाच्या सरींनी नागरिक आनंदात तर गहू आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना धडकी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वाशिम जिल्ह्यात शेलू बाजार परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन रब्बी हंगामाच्या पीक काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकाला मोठा धोका निर्माण झालाय. गहू, बीजवाई, कांदा, हरभरा, अंबा, संत्रा या पिकाला मोठा फटका
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या आडगाव बोरी, आंबेटाकळी परिसरात अवकाळी पाऊस अर्धा तास बरसला, शेतकऱ्यांच्या शेतात असलेले गहू , हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता , शेतकरी चिंतेत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अहमदनगर : अहमदनगरमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात, शहरासह पाथर्डी तालुक्यात पावसाने लावली हजेरी, पाथर्डी तालुक्यात काही ठिकाणी गारपीट
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सांगली : सांगली शहर परिसरात पावसास सुरुवात
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीड शहरामध्ये पुन्हा जोरदार वादळासह पावसाला सुरुवात. कालरात्री बीडमध्ये पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचे वातावरण आज पुन्हा पाहायला मिळतंय. बीड शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीडच्या माजलगाव शहरांमधली थरकाप उडवणारी घटना आहे. एका गाईने शहरांमध्ये असा काही हैदोस घातला की वेगवेगळ्या ठिकाणी या गाईने चार महिलांना आपले लक्ष बनवले. या गाईने प्रभाग एक मधील चार महिलांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून एकीची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हालवण्यात आले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : खोड्या करतो म्हणून एक 15 वर्षाच्या मुलाला त्याच्या आत्त्याच्या पतीने गळा दाबून मारल्याची घटना शनिवारी घाटकोपरच्या अल्ताफ नगर येथे रात्री घडली आहे. शिव पवार असे, मृत मुलाचे नाव आहे. तर हिंमत ज्ञानी गोहिल असे त्याची हत्या करणाऱ्या आत्याच्या पतीचे नाव आहे. शिव हा नेहमी खोड्या करतो आणि शनिवारी संध्याकाळी शिवने हिंमतची चप्पल कुठे तरी ठेवली या रागातून हिंमतने शिवचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर स्वतःच घाटकोपर पोलीस ठाण्यात हजर झाला. घाटकोपर पोलिसांनी त्याला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाणार रिफायनरीला समर्थन करणाऱ्या शिवसैनिकालाही झोडून काढा, खासदार विनायक राऊतांचं वक्तव्य, नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ससून डाॅक मधील मासळी बाजार धोक्यात, गाळे खाली करण्याचे मत्सविभागाचे आदेश, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असणारी एकूण 22 गोडाऊन येथे आहेत, येथील मासळी परदेशात, देशभरात पाठवण्यात येते
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोलापूर : आई आणि मुलाचा पाणी भरताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू, शशिकला गणेश गंजी आणि अजय गंजी अशी मृतांची नावं, सोलापुरातील रविवार पेठ येथील दुर्दैवी घटना
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अहमदनगर : विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाथर्डीत भारजवाडीतील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी आत्महत्या केलेल्या मल्हारी बटुळे यांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च भाजप करेल, असे सांगत पक्षाकडून एक लाख रुपयांची मदत केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
इमारतींच्या छपरांवर किंवा मोकळ्या मैदानात पॅनेल बसवून सौरऊर्जेची निर्मिती सर्वत्र केली जाते. पण उंच इमारतीच्या काचेच्या भिंतीद्वारेही सौरऊर्जेची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान भारतात प्रथमच आले असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रायोगिक केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लातूरमध्ये एका हॉटेल कामगाराने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्या मुलीने आईकडे याची माहिती दिली. त्या पीडित मुलीच्या आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम पित्यास अटक केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंगोली : वसमत शहरातील बुधवार पेठ स्टेशन परिसरात एक सहा वर्षीय मुलगा कार्तिकेय अग्रवाल व त्याच्यासह अन्य दोन महिलांना मोकाट कुत्र्याने चावा घेतला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कार्तिकेय याला नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्याच्या बुधवार पेठेत 70 ते 80 वर्ष जुन्या वाड्याचा काही भाग आज सकाळी कोसळला. यावेळी अंगावर दगड माती कोसळल्याने दोघे थोडक्यात बचावले. तर दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका वृद्ध महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुणे : राज्यातील ग्रामिण भागात कृषिविकास, जलव्यवस्थापन आणि उपजीविका निर्मिती क्षेत्रांत 50 वर्ष कार्यरत असलेल्या अॅक्शन फॉर अग्रिकल्चरल रिन्युअर इन महाराष्ट्र ही संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. या निमित्ताने ग्रामीण विकासात स्वयंसेवी शेताची भूमिका या विषयावर राज्यस्तरीय परिषदचे आयोजन ही करण्यात आले. या समारंभासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार श्रीनिवासराव पाटील उपस्थित.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जालना : तालुक्यातील जामवाडी गावाजवळ पहाटे दोनच्या सुमारास बस आणि बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक. अपघातात दोन ठार, 13 जखमी. जखमींवर जालन्यातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंधू शेवाळे (वय 45)आणि निर्मलाबाई जोशी (वय 50), अशी मृतांची नावे आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अहमदनगर : जवळ असलेल्या आरणगाव येथे बायपास रोडवर आग पेटीचा ट्रक पेटला. सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली. तामिळनाडू येथून आगपेट्या घेऊन जाणारा ट्रक सोलापूर नगर मार्गे गुजरातला जात होता. अरणगावजवळ एक कंटेनर या ट्रकला घासून गेल्याने आग लागली. ट्रकमध्ये आग पेट्या असल्यामुळे काही वेळेतच अख्खा ट्रक पेटला. नगर शहराच्या जवळच ही घटना घडल्यामुळे शहरातील अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी पोहचली असून आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांपैकी एकाची प्रकृती बिघडली, गेल्या 34 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या संपादकपदी आजपासून रश्मी ठाकरे, संपादकपद लाभाचं असल्यानं उद्धव ठाकरेंनी संपादकपद सोडलं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अहमदनगर जवळ असलेल्या आरणगाव येथे बायपास रोडवर आग पेटीचा ट्रक पेटला. सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली. तामिळनाडू येथून अगपेट्या घेऊन जाणार ट्रक सोलापूर नगर मार्गे गुजरातला जात होता. अरणगाव जवळ एक कंटेनर या ट्रकला घासून गेल्याने आग लागली. ट्रक मध्ये आग पेट्या असल्यामुळे काही वेळेतच अख्खा ट्रक पेटला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सोलापूर : माढा मोहोळ बार्शी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पुर्व भागातील काही गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अचानक झालेल्या पावसाने डॉक्टरवाडी, जळगाव-बुद्रुक. पोखरीसह काही गावांमध्ये गारपीट आणि जोरदार पावसाने शेतातील उभे गहू, हरभ-याच पिक आडवी पडली तर उन्हाळी कांद्याला गारपीटीच्या तडाखा बसल्याने शेतातील कांद्याच नुकसान झाल्याने या परिसरातील शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावत मोठे आर्थिक नुकसान झालय.दरम्यान नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पिकांचे तातडीन पंचनामे करण्याची विनंती शेतक-यांनी पालकमंत्री, आमदारांकडे केलीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणी जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले असून पावसाची शक्यता निर्माण झालीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पणजी : शनिवारी दुपारपासून उत्तर आणि दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. शनिवारी सकाळपासून वातावरणातील उकडा वाढला होता. दक्षिण गोव्याबरोबरच उत्तर गोव्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी गडगडाटासह पुढील 3 तासात हलक्या सरी कोसळतील अशी शक्यता पणजी वेधशाळेने वर्तवली आहे. वेधशाळेने पावणे बारा वाजता वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण गोव्यातील केपे आणि काणकोण तालुक्यात पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर सांगे, शेळपे, मळकर्णे, साळावली, केवोणा, जांबावली, रीवण, दाभाळ, कुळे, किर्लपाल आदि भागात पावसाला सुरुवात झाली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ठाणे : निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी जातीवाचक, जातीचा अपमान होईल अन् चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केले असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चर्मकार समाजाचा तसेच संविधानाचा अवमान झाला असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली आहे. या संदर्भात चौकशी करुन दोन दिवसात अॅट्रोसिटी, संविधानाचा अवमान आणि मराठा समाजाला दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त अंबोरे यांनी दिले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लातूर : जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण असून निटूर, लातूर ग्रामीण आणि लातूर शहर परिसरात पहाटे चार वाजता पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. परिणामी वातावरणात गारवा वाढलाय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Live Updates | अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करा, धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला निर्देश