शिवभोजन थाळीच्या योजनेमध्ये अटीच अटी
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Jan 2020 11:16 PM
खातेवाटप निश्चित, उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होईल
शिवभोजन थाळीच्या योजनेमध्ये अटीच अटी, योजनेमध्ये थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी भात आणि एक वाटी वरण एवढं जेवण मिळेल. जेवण दुपारी 12 ते 2 एवढ्याच कालावधीमध्ये मर्यादित उपलब्ध असेल, प्रायोगिक तत्त्वावर जास्तीत जास्त १५० जणांना जेवण मिळेल . कोणत्याच प्रवर्गातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जेवण घेता येणार नाही. जिथे भोजनालय सुरू आहे तिथलेही कर्मचारी जेवण करू शकणार नाहीत. तीस ग्रॅमच्या दोन चपात्या , शंभर ग्राम वाटीतली भाजी, शंभर ग्राम वाटी वरण, दीडशे ग्राम वाटीचा भात
तुटेपर्यंत कधी ताणू नये, मागणी करण्याचं काम कार्यकर्ते करतात, निर्णय मुख्यमंत्री घेतील : उपमुख्यमंत्री अजित पवार
सरकारी कामात अडथळा आणला तर कलम ३५३ नुसार सर्वसामान्य नागरिकावर कारवाई होते, मग कामात दिरंगाई करणाऱ्यांवरही सेवा हमी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी
- बच्चू कडू
भिवंडी : यंत्रमाग कारखान्याला अचानक लागलेल्या आगीत कापड आणि यंत्रमाग जाळल्याची घटना भिवंडीतील खोखा कंपाउंड येथे बुधवारी सायंकाळी घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचा कापड, यंत्रमाग यंत्र जाळून खाक झाले आहेत. दरम्यान भिवंडी अग्निशन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
खातेवाटपावर चार तास खलबतं, मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस नेत्यांची बैठक संपली, खातेवाटपात प्रमुख खात्यांसाठी काँग्रेस आग्रही
खातेवाटपासंदर्भात कुठलेही मतभेद नाही : जयंत पाटील
कुणी काय मागावा हा ज्याचा त्याचा अधिकार : अजित पवार
विना अनुदानित एलपीजीच्या किंमतीत वाढ; प्रत्येक सिलिंडरमध्ये 19 रुपयांची वाढ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात खातेवाटपासंदर्भात बैठक सुरु, अशोक चव्हाण आणि आदित्य ठाकरेही बैठकीला उपस्थित
नवी दिल्ली : इस्रोच्या चांद्रयान- 3 मोहिमेला केंद्र सरकारची परवानगी, इस्रोचे चेअरमन के. सिवन यांची माहिती, गगनयान मोहिमेसाठी 4 अंतरिक्ष यात्रींची निवडही झाली
मुंबई : कर्जबुडव्या विजय माल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश, मुंबईच्या पीएमएलए कोर्टाकडून परवानगी
मुंबई : कर्जबुडव्या विजय माल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश, मुंबईच्या पीएमएलए कोर्टाकडून परवानगी
पुणे : ताडीवाला रस्त्यावरील हॉटेल पंचरत्नसमोरील एका तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावरील ऑफिसला आग; अग्निशमन दलाच्या चार गाङ्या घडनास्थळी दाखल
जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भारताचे दोन जवान शहीद, दहशतवाद्यांशी लढताना जवानांना वीरमरण, नौशेरा भागात दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये धुमश्चक्री सुरु
जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भारताचे दोन जवान शहीद, दहशतवाद्यांशी लढताना जवानांना वीरमरण, नौशेरा भागात दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये धुमश्चक्री सुरु
औरंगाबाद : दौलताबाद किल्ल्यासमोर अपघात, कार विहिरीत पडून दोन ठार तर 3 जखमी, रात्री 2 वाजताची घटना, थर्टीफस्ट पार्टी करुन घरी निघताना अपघात
पुणे : कोरेगाव-भीमामध्ये अभिवादन सोहळ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त, उपमुख्यमंत्री अजित पवार कोरेगाव भीमामध्ये दाखल, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील शाळा, महाविद्यालये बंद
सांगली : सांगलीत 100 फुटी रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास 10 हून अधिक वाहनांची तोडफोड, एक स्कॉर्पिओ गाडी जाळली, घटनास्थळचे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले, चार जणांविरोधात गुन्हा दाखल, दोघे ताब्यात, गाड्याची तोडफोड, जाळपोळ करण्याचं कारण अस्पष्ट
पार्श्वभूमी
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा...
1. एबीपी माझाच्या वतीने सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या शुभेच्छा.. देशभरात नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत, मुंबईकरांचं गेटवेवर सेलिब्रेशन, गोव्यातले हॉटेल्स कसिनो, पब हाऊसफुल्ल
2. न्यूझीलंड ,ऑस्ट्रेलियासह अनेक देशात 2020चं जल्लोषात स्वागत, डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या विद्युत रोषणाईसह फटक्यांची आतषबाजी..
3. भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्यानं समर्थक आक्रमक, पुण्यातल्या काँग्रेस भवनाची तोडफोड, तर प्रणिती समर्थकांचं सोनियांना रक्तानं पत्र
4. शिवसेनेच्या खिशातल्या कृषी खात्यावर काँग्रेसचा डोळा, तर महसूल खात्यासाठी थोरात आणि चव्हाण शर्यतीत, विचारसरणीशी तडजोड न करण्याचा हायकमांडचा सल्ला
5. औरंगाबाद उपमहापौर निवडणुकीत सेनेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या एमआयएमच्या 6 नगरसेवकांचं निलंबन, सेनेच्या राजेंद्र जंजाळांचा विजय, भाजपला धक्का
6. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागपूरला पावसानं झोडपलं, तर विदर्भातल्या इतर जिल्ह्यात कडाक्याची थंडी, 3 जानेवारीनंतर पारा आणखी घसरणार