LIVE UPDATES | एल्गार प्रकरणाची कागदपत्रं एनआयएच्या ताब्यात, पुणे पोलिसांकडून कागदपत्र एनआयएकडे सुपूर्द
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
19 Feb 2020 11:21 PM
चंद्रपूर : मूल तालुक्यातील केसलाघाट येथे भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती, भरधाव स्कॉर्पिओ गाडीने मार्गावर बंद असलेल्या ट्रकला दिली मागून धडक, गोंदिया येथे देवदर्शनाला गेले होते चंद्रपुरातील काही लोक, येतांना झाला अपघात, पोलिस घटनास्थळी रवाना, जखमींना मूल येथील रुग्णालयात दाखल केले
औरंगाबाद : मिसारवाडीजवळील तलावात दोन मुलं बुडाली, साहेबखान मुमताज खान, संदेश कापसे अशी मृत मुलांची नावं
एल्गार प्रकरणाची कागदपत्र एनआयएच्या ताब्यात, पुणे पोलिसांनी आज एल्गार प्रकरणाची कागदपत्र एनआयएकडे सुपूर्द केली, एल्गार प्रकरणाचे कागदपत्र घेऊन एनआयए पथक मुंबईला रवाना, एल्गार प्रकरणी सलग चार दिवस एनआयए पथक पोलीस आयुक्तालयात, एल्गार प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करुन कागदपत्र ताब्यात घेतले, तपासाची कागदपत्र, पुरावे आणि हार्ड डिस्क सह आरोप पात्रांचे दस्तावेज ताब्यात घेतले
राज्यातील 9 लाख 75 हजार विद्यार्थ्यांना चष्मे वाटणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, भविष्यात त्यांच्या नंबरात बदल झाल्यास त्याचादेखील खर्च सरकार उचलणार अशी तरतूद करण्यात आली
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 10 हजार कोटी आकस्मिकता निधीतून घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, 5 मार्चपर्यंत या योजनेसाठी 10 हजार कोटींची आवश्यकता असल्याने आकस्मिकता निधी अग्रीम घेण्याचा निर्णय घेण्यात आला
औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी 150 कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, औरंगाबाद महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे ही कामे होणार
पुणे : जुन्नरजवळील हडसर किल्ल्यावरुन पडून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू, मुंबईतील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी या किल्ल्यावर आला होता, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल, तरुणीच्या कुटुंबियांना माहिती दिली असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला
औरंगाबादमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शहरातील आणि जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, अमोल कोल्हे शिवनेरीवर दाखल. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर पारंपारिक खेळांच सादरीकरण
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना सातारमधील हॉस्पिटलमधे भरती करण्यात आलं होतं. आता त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत
फडणवीस सरकारच्या काळातल्या 50 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची आदेश दिल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी माहिती दिली. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्याने चौकशीचे आदेश दिले आहे.
पुण्याच्या बारावीची विद्यार्थिनी मोमिना बेग हिने महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे 14 फेबुवारीला ई मेल केला होता. त्यामध्ये बुरखा परिधान करून परीक्षा देण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार मंडळाने बुरखा परिधान करून परीक्षा देण्यास परवानगी दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांची कॉपी तपासत असताना कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार याचीही काळजी घेण्याची सूचना मंडळाने दक्षता पथकाला केली आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर गजानन बारवाल आणि माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह आठ ते दहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज हे सर्व जण 'मातोश्री'वर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत. दरम्यान किशचंद तनवाणी हे याआधी शिवसेनेतच होते. ते शिवसेनेचे आमदार आहेत.
कन्नड -औरंगाबाद - शिरपूर बसच्या चालकास कन्नड शहरात दहा ते पंधरा जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. साईड देण्याच्या वादावरून मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याने चालक आणि वाहक जखमी आहेत. शिरपूर आगाराचे बस चालक सुधाकर शामराव शिरसाट आपल्या ताब्यातील बस कन्नडहून चाळीसगावकडे जात असताना अष्टविनायक हॉटेल समोर दहा ते पंधरा जणांनी मारहाण करत बसच्या काचा फोडल्या .कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतले आहे तर आठ ते दहा जण फरार आहेत.
शिवजयंतीनिमित्त कोल्हापूरच्या पेठवडगावमध्ये 400 विद्यार्थी 1 लाख 4 हजार 444 सूर्यनमस्कार घालणार आहेत. त्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या न्यूयार्कमधील भारतीय दूतावासातही काल शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी 'जय शिवाजी, जय भवानी' या घोषणांनी भारतीय दूतावास अक्षरशः दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, उद्योगपती मनोज शिंदे, भारतीय वाणिज्य दुतावासातील अधिकारी ए.के. विजयकृष्णन उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. तिथे ते शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होणार आहेत. खरंतर शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. तरी राज्याचे मुख्यमंत्री असल्याने पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आज शिवजयंती साजरी करतील
मध्य महाराष्ट्र, विदर्भातील कमाल तापमान बुधवारपासून किंचित वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कमाल तापमानाचा पारा 35 अंशांवर जाण्याचा अंदाजही वर्तविला गेला आहे.उत्तर भारतात राज्याच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव ओसरला असून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे सोबतबाष्प घेऊन येत आहेत. परिणामी कमाल तापमान पुढील दोन-तीन दिवस सरासरीपेक्षा 3-4अंशांनी अधिक नोंदविले जाईल.
पार्श्वभूमी
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, सोलापूर, मनमाडमध्ये मध्यरात्री शिवजन्मोत्सव साजरा, मुख्यमंत्री ठाकरे आज शिवनेरीवर जाणार
2. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नोटीसीला उत्तर देण्यासाठी इंदोरिकरांकडे उरले काही तास, महाराजांकडून दिलगीरी व्यक्त, संभाजी भिडेंचा इंदोरीकारांना पाठिंबा जाहीर
3. एल्गारसंदर्भातल्या आढावा बैठकीतली माहिती केंद्राला कुणी दिली, पवारांचा सवाल, अधिकाऱ्यांकडे संशयाची सुई, भिडे आणि एकबोटेंवरही गंभीर आरोप
4. तब्बल 16 तासानंतरही डोंबिवलीतली आग धुमसतीच, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न, घाबरलेल्या काही स्थानिकांचा तात्पुरता घरातून पळ
5. चीनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार ''सी 17 ग्लोबमास्टर'' विमान पाठवणार, चीनमध्ये कोरोना विषाणूचं थैमान
6. गुजरातच्या कांडला बंदरात चीनमधून पाकच्या दिशेनं निघालेलं जहाज पकडलं, क्षेपणास्त्रासाठी वापरली जाणारी सामुग्री सापडल्यानं खळबळ, वैज्ञानिकांकडून तपासणी
एबीपी माझा वेब टीम