Sanjay Raut | शरद पवारांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही : संजय राऊत

आज दिवसभरात... या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Nov 2019 10:24 PM
सातारा : आईने मोबाईलवर गेम खेळायला दिला नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाने बाथरुममध्ये जाऊन गळफास घेतला, कल्याण येथील दुर्गामातानगर येथील घटना, साहिल मांढरे असे या मुलाचे नाव. साहिल हा मुळचा साताऱ्यातील वाई अभेपुरी गावचा
नाशिक : कॉंग्रेसचे 6 नगरसेवक 3 इनोव्हा कारने अज्ञातस्थळी रवाना
Sanjay Raut LIVE | ते दोन मोठे नेते, त्यांच्यात काय चर्चा झाली हे मी कसं विचारु : संजय राऊत
Sanjay Raut LIVE | ते दोन मोठे नेते, त्यांच्यात काय चर्चा झाली हे मी कसं विचारु : संजय राऊत
नाशिकमधिल भाजपच्या नगरसेवकांना देवगडहून हलवले ,
नगरसेवकांची बस गोव्याच्या दिशेने रवाना ,
थोड्याच वेळात गाठणार गोवा ,
भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाची भिती
नाशिकमधिल भाजपच्या नगरसेवकांना देवगडहून हलवले ,
नगरसेवकांची बस गोव्याच्या दिशेने रवाना ,
थोड्याच वेळात गाठणार गोवा ,
भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाची भिती
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी संजय राऊत पोहोचले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी संजय राऊत पोहोचले
आघाडीतल्या मित्र पक्षांना नाराज करू शकत नाही : शरद पवार
शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील बैठक संपली, बैठकीत 45 मिनिटं चर्चा
सेनेला पाठिंबा देण्याबाबात अजूनही ठोस निर्णय नाही : शरद पवार
आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करू शकत नाही : शरद पवार
सोनिया गांधींच्या भेटीसाठी शरद पवार 10 जनपथकडे रवाना, भेटीत राज्यातील सत्ता स्थापनेबाबत चर्चा होण्याची शक्यता
मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं. महापौरपदाच्या शर्यतीत यशवंत जाधव यांचं नाव पिछाडीवर पडलं आहे. किशोरी पेडणेकर थोड्याच वेळात महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अद्याप अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. तर भाजपने यापूर्वीच महापौरपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मुंबईचं महापौर वरळीकडे गेल्याचं चित्र आहे.
सोलापूर : येणाऱ्या काळात भाजप-सेना युती पुन्हा होण्याची शक्यता, सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचे वक्तव्य, भाजपच्या तीन दिवस झालेल्या बैठकीत शिवसेनेसोबत राहण्याची मागणी करण्यात आली, मात्र शिवसेनेने वेगळा मार्ग स्वीकारल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या, येत्या काळात भाजपा शिवसेना एकत्रित येण्याची शक्यता
अकोला : अकोट मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करा म्हणून प्रहार कार्यकर्त्यांचा तेल्हारा तहसीलला घेराव, तहसील कार्यालयासमोर जाळली ज्वारीची कणसं
गावठी पिस्टल बाळगणारा महाविद्यालयीन विद्यार्थी जेरबंद, पिस्टलचे फोटो काढून सोशल मीडियावर केले होते व्हायरल, ऋषिकेश जऊळकर असं या विद्यार्थ्याचं नाव, काही दिवसांपूर्वी ऋषिकेशनं या पिस्टलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. पोलिसांच्या दोन पथकांनी सापळा रचून ऋषिकेशला बदनापूरच्या खाटीक गल्लीतून ताब्यात घेतलं, या प्रकरणी ऋषिकेशवर पोलिसांकडून गुन्हा दाखल, या प्रकरणी चांगली कामगिरी बजावल्यानं पोलिस अधीक्षक एस चैतन्या यांनी एडीएसच्या पथकातल्या प्रत्येकी दहा हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 5 दिवसांपासून पुण्यातील वाकडेवाडी भागातील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीसमोर आंदोलन करत आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. गेले सहा महिने हे शेतकरी त्यांच्या हक्काचे पिकविम्याचे पैसे मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण पिकविम्याचे पैसे तर जमा झालेच नाहीत पण त्यांना काही ना काही त्रुटी दाखवली जात होती आणि यामुळे शेतकऱ्यांना पुण्याच्या ऑफिसमध्ये हेलपाटे घालावे लागत होते. याने त्रस्त होऊन हे शेतकरी आता कंपनीच्या दारातच आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत बीड जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. अखिल भारतीय किसान सभेकडून या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
नागपूर महानगर पालिकेतील पुढील अडीच वर्षांसाठी महापौर पद सव्वा - सव्वा वर्षासाठी विभागले, पहिले सव्वा वर्ष संदीप जोशी तर नंतरचे सव्वा वर्ष दयाशंकर तिवारी हे महापौर असतील. आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सांगली-कोल्हापूरातल्या महापुरासंदर्भात याचिकेवर उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला फटकारलं. ऑगस्ट महिन्यातच यासंदर्भात याचिकेवर उत्तर देण्यास कोर्टाने सांगितलं होतं. पण आजवर कुठलंही उत्तर दोन्ही राज्यांकडून आलं नाही. पुढच्या चार आठवड्यांच्या आत कुठलं उत्तर आलं नाही तर दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहावं लागेल असंही कोर्टाने संतप्त होत म्हटलं. या दोन राज्यांमध्ये पाण्याचं व्यवस्थित नियोजन नसल्यानेच सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसला. त्यामुळे त्यासंदर्भात एक धोरण आखलं जावं, तसंच पूरग्रस्तांना जाहीर झालेली मदत अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचंही याचिकेत म्हटलं आहे. सांगलीतले अमोल पवार यांनी ही याचिका दाखल केली आहे.

मुंबई महापौरपदासाठी एमआयएमदेखील शर्यतीत असल्याची चर्चा आहे. एमआयएमचे नगरसेवक शहानवाझ शेख यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे, मात्र अजून महापालिका चिटणीसांकडे अर्ज दाखल केलेला नाही. एमआयएमचे नगरसेवक शहनवाझ शेख यांच्या म्हणण्यानुसार, एमआयएमचे नगरसेवक म्हणून आम्ही अर्ज घेऊन तो भरुन ठेवला आहे, वरिष्ठ नेत्यांचा आदेश आला तर एमईयएमकडून महापौरपदाचा अर्ज दाखल केला जाईल. एकीकडे भाजपने महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. काँग्रेसची उमेदवारीबाबत स्पष्टता नाही. मात्र, एमआयएमने उमेदवारी अर्ज दाखल केल्यास त्यांना काँग्रेसकडून पाठिंबा दिला जातोय का हे बघणं महत्त्वाचं आहे.
महाशिवआघाडीच्या सरकारच्या दिशेने वाटचाल, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची किमान समान कार्यक्रमावर सहमती, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
महाशिवआघाडीचं सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल, किमान समान कार्यक्रमावर सहमती झाली, संजय राऊतांचं वक्तव्य
टिकटॉक मोबाईल अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिना दरवेश या मुंबईतील गृहिणीने टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात, देशात जातीयवाद भडकू शकतो, देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन होत असल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. लवकरच या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. वारंवार कोर्टातील सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल ठाणे दंडाधिकारी कोर्टाने तिला 1 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. मालिकेच्या सेटवर आपल्याच ड्रेस डिझायनरसोबत मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दंडाधिकारी कोर्टातील खटल्याविरोधात प्राजक्ता माळीने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

फोडाफोडीच्या भीतीने अज्ञातस्थळी रवाना झालेले नाशिक महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आज पहाटेच्या सुमारास सिंधुदुर्गमधील देवगडमध्ये पोहोचले आहेत. वेदा हॉलिडे रिसॉर्टमध्ये सर्व नगरसेवकांचा मुक्काम असेल. सिंधुदुर्गातील निसर्गाचा आनंद घेतील. मात्र त्यांना आजच दुसरीकडे हलवणार असल्याची माहिती, भाजपच्या गोटातून मिळाली आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. गूळ सौदे बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन सुरु केलं. बाजार समितीचे सर्व गेट बंद करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये हमालांची संख्या 500 आहे. तर 150 गूळ खरेदीदार व्यापारी आहे. बाजार समितीमध्ये दिवसाला 20 ते 25 हजार रव्याची आवक होते. गूळ सौदे बंद राहिल्याने दिवसाला 1 ते 1.5 कोटींची उलाढाल ठप्प आहे.
मुंबई महापौर पदासाठी भाजप उमेदवार देणार नाही, सूत्रांची माहिती, आज महापौर पदासाठी निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम मुदत, मात्र मुंबई महानगरपालिकेत भाजप पहारेकरीच्या भूमिकेत कायम राहणार, राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाचे पडसाद तूर्तास तरी मुंबई महापालिकेत उमटणार नाही
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आज गुळाचे सौदे बंद राहणार, ऐन हंगामात हमालांचं आंदोलन, 10 टक्के हमालीत वाढ मिळावी यासाठी हमालांचं काम बंद आंदोलन, गुळ खरेदीदार व्यापारांचा हमाली दरवाढीला विरोध
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 24 नोव्हेंबरचा अयोध्या दौरा पुढे ढकलला, राज्यात सत्तास्थापनेस उशीर होत असल्याने दौऱ्याची पुढील तारीख निश्चित नाही
लोअर परळ उड्डाणपूल कामासाठी 40 दिवसांचा ब्लॉक
सकाळच्या सत्रात चर्चगेट, बोरिवली लोकल रद्द; काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

पार्श्वभूमी

आज दिवसभरात...  या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. महाशिवआघाडीबाबत चर्चेसाठी आज शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट निश्चित, मंगळवारी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची चर्चा, तर संजय राऊतंही सोनियांना भेटणार

2. एनडीए कुणाची जहागीरी नाही, शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याच्या भाजपच्या घोषणेनंतर संजय राऊत आक्रमक, मनमानी सुरु असल्याचा आरोप

3. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीसांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, मी पुन्हा येईनच्या घोषणांनी फडणवीसांवर रोष व्यक्त

4. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, 13 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचा कार्यकाळ, 27 महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चेची शक्यता

5. अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणार, ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाचा निर्णय, साध्य काही होणार नाही, केके मोहम्मद यांचा दावा

6. मुंबई मनपात शिवसेनेला रोखण्याचे भाजपचे प्रयत्न, भाजपने काँग्रेसला संपर्क केल्याचा रवी राजा यांचा दावा, तर महापौरपदासाठी शिवसेनेकडून यशवंत जाधवांचं नाव निश्चित झाल्याची माहिती

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.