LIVE UPDATES | साईबाबा जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्याची संबंधितांशी सोमवारी मंत्रालयात चर्चा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jan 2020 11:09 PM
डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरात गॅरेजला आग, संजय अपार्टमेंटमधील गॅरेजला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
साई जन्मभूमीवरून वाद चिघळला, शिर्डीत आज रात्री 12 वाजेपासून बेमुदत बंदला प्रारंभ, ग्रामसभेत घोषणा, साईबाबा जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्याची संबंधितांशी सोमवारी मंत्रालयात चर्चा
साईबाबा जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्याची संबंधितांशी सोमवारी मंत्रालयात चर्चा, सोमवारी मंत्रालयात बैठक
औरंगाबाद : शिवसेना कार्यकर्ता आणि आमदार संजय शिरसाठ यांच्यात रस्त्याच्या टेंडरवरून मारहाण, माजी नगरसेवक सुशील खेडकर यांना आमदार संजय शिरसाठ यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या सह कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ अपघात, अपघातात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी जखमी, काहीवेळा पूर्वीची घटना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी चाळीच्या जागेवर राष्ट्रीय स्मारक उभारणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आज याबाबत निर्णय घेण्याची शक्यता
संजय राऊत यांच्या कार्यक्रमाला अटीशर्तींसह परवानगी दिल्याची राऊत यांची एबीपी माझा माहिती. राऊत यांच्या विश्रामाची कर्नाटक पोलीसांकडून व्यवस्था..
संजय राऊत थोड्याच वेळात बेळगावातील मॅरिएट हॉटेलवर पोहचणार, कार्यक्रमस्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. राऊतांच्या बेळगाव दौऱ्यामुळे तणाव वाढलाय...
संजय राऊत बेळगाव विमानतळावरुन शहराच्या दिशेने रवाना, शिवसेना कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत, पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न, तर राऊत बेळगावात येऊ नका, कर्नाटक संघटनांचा इशारा
शिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव विमानतळावर दाखल झालेत. मात्र, गेल्या 15 मिनिटांपासून पोलिसांनी त्यांनी विमानतळावरच रोखलंय
शिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव विमानतळावर दाखल, राऊत बेळगावात येऊ नका, कर्नाटक संघटनांचा इशारा, संजय राऊत यांना विमानतळावरच रोखण्याचा प्रयत्न...
रेती वाहतूक होणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर टोल लावणार, फक्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतल्या परेलमधील ज्या बीआयटी चाळीमध्ये आपल्या आयुष्यातील 22 वर्षांचा कालखंड घालवला, त्याजागी राष्ट्रीय स्मारक होणार आहे. इथे राष्ट्रीय स्मारक करुन तिथल्या स्थानिकांचं जवळच पुनर्वसन करणार आहे. गृहनिर्माण विभाग याबाबत आज याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. या चाळीमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते.
शिवसेना खासदार संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी, शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं
मानवतेचे तुकडे तुकडे होत असल्याने तुकडोजींना त्यांच्या गुरूंनी समाजाला एक करायचं काम दिलं. त्यावरुनच त्यांचं नाव तुकडोजी महाराज झाले, असं मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपूर येथे केलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीला..
यवतमाळ-नागपूर-तुळजापूर चौपदरीकरण होत असलेल्या रस्त्यावर कोसदनी घाटात दरड कोसळली आहे. त्यात भलामोठा मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळली, ढिगाऱा कोसळताना रस्त्यावरुन जाणारी कार एका दिशेला फेकली गेली, सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही
कर्नाटक सरकारविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरातील अंबाबाई चरणी, मिलिंद नार्वेकर, खासदार धैर्यशील माने उपस्थित..
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन शिर्डीकर आक्रमक, शिर्डी परिसरातील 25 गावांचा बंदला पाठींबा, आमदार राधाकृष्ण विखे पाटील आज घेणार ग्रामस्थांची बैठक, उद्या पासून शिर्डीतील व्यवसाय राहणार ठप्प, साईदर्शन, भक्तनिवास आणि प्रसादालय मात्र राहणार सुरु

पश्चिम रेल्वे रेल्वे मार्गावर माटुंगा-माहीमदरम्यान रेल्वे रुळाला तडे,
डाऊन दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत
नाशिक जिल्ह्यात गोठवणारी थंडी, निफाडचे आजचे तापमान 5 अंश सेल्सियस; धुळेही गारठले तापमानाचा पारा 5 अंशावर..
मुंबईतील वांद्रे आणि धारावीत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद आहे. धारावी इथे 1500 मिमी व्यासाची जलवाहिनी 1450 मिमी व्यासाची अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनी यांच्या जलजोडणीचे काम 18 जानेवारी रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या धारावी आणि वांद्रे येथील काही भागातील पाणीपुरवठा 18 आणि 19 जानेवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.

पार्श्वभूमी

महत्त्वाच्या हेडलाईन्स एक नजर...

1. महाराष्ट्राचे सरकार लेचेपेचे नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला इशारा, मदतीसाठी दुजाभाव करत असल्याचाही आरोप

2. मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पहिल्यांदाच कबुली, पक्षाचे निष्ठावान दुरावल्याचीही खंत

3. 26 जानेवारीपासून मुंबईत 24 तास हॉटेल्स, मॉल्स सुरु, आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफ संकल्पनेला तत्वतः मंजुरी, भाजपकडून टीकेचा सूर

4. इतिहासात पहिल्यांदाच शिर्डी बेमुदत बंदची हाक, पाथरीला साईबाबांच्या जन्मभूमीचा दर्जा देण्याला विरोध, उद्यापासून भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता

5. कर्नाटक सरकारची बंदी झुगारत संजय राऊत आज बेळगावात धडकणार, अटक करुन दाखवण्याचं आव्हान, हुतात्म्यांच्या अभिवादनासाठी गेलेल्या राजेंद्र पाटील यड्रावरकरांची धरपकड

6. राजकोटमधील दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव, मालिकेत 1-1 अशी बरोबरी, तिसऱ्या आणि अंतिम सामन्याकडे सर्वांचं लक्ष

एबीपी माझा वेब टीम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.