5 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी नराधमास फाशीची शिक्षा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
18 Feb 2020 09:22 PM
ओशिवरा परिसरात 19 वर्षीय तरुणी नाल्यात पडली, तरुणीचं शोधकार्य सुरु, अग्निशामक दल आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल
शिवभोजन थाळीच्या संख्येत रोज दुप्पटीने वाढ होणार, सध्या राज्यात 14180 थाळी देणारी 120 शिव भोजन केंद्र सुरु,
आता या शिवभोजन केंद्रामध्ये रोज 36 हजार थाळी दिल्या जाणार, येत्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करून पुढे आणखी थाळीची संख्या वाढवण्याचा सरकारचा विचार
5 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी नराधमास फाशीची शिक्षा , परभणीच्या गंगाखेड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
नागपूर : भाजपचे 108 नगरसेवक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेटीला, 108 नगरसेवकांना भेटण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी दिली 15 मिनिट वेळ, मंजूर विकास कामांना स्थगिती दिल्यामुळे नगरसेवक तुकाराम मुंढे यांच्यावर नाराज, तसेच भेटीसाठी एक तास वेळ द्यावी अशी मागणी
पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचं वर्चस्व, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांची तर उपाध्यक्षपदी निलेश सांबरे यांची बनविरोध निवड
डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु
मराठी बाणावरुन लोककलाकार अशोक हांडे यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. शेमारुने आपल्या नव्या वाहिनीच्या नावात मराठी बाणा वापरण्यास हरकत नाही, असंही हायकोर्टाने नमूद केलं आहे. ट्रेडमार्क कायद्यावरून अशोक हांडे यांनी शेमारुविरोधात 200 कोटी रुपयांचा दावा केला होता
माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी, समाज माध्यमांमध्ये माझ्या वक्तव्याचा विपर्यास होतोय, माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही अपेक्षा; पत्रकारद्वारे इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी
भीमा - कोरेगावला जाणाऱ्यांची संख्या वाढली, भीमा- कोरेगावमध्ये संभाजी भिडे यांनी वेगळं वातावरण तयार केलं : शरद पवार
कोकणात शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका बदलली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते रिफायनरीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. याआधी शिवसेनेने रिफायनरीविरोधात कोकणात रान उठवलं होतं. रिफायनरीचे फायदे आमच्या लक्षात आले आहे त्यामुळे आम्ही समर्थन करत आहोत, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, 'सामना'तल्या जाहिरातीनंतर शिवसेनेची भूमिका बदललेली नाही असं उद्धव ठाकरेंनी स्षष्ट केलं, शिवसेनेची निर्णय आणि धोरण मी ठरवतो, जाहिरातदार नाही, असंही ते म्हणाले.
एल्गारमध्ये हजर नसलेल्यांवर गुन्हा दाखल झाला, एल्गार परिषद, भीमा- कोरेगाव यांचा संबंध नाही : शरद पवार
सुधीर ढवळेंनी नामदेव ढसाळांची कविता एल्गार परिषदेत वाचली म्हणून त्यांच्यावर खटला : शरद पवार
सोनं खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी. सोन्याचे दर 233 रुपयांनी कमी झाले आहेत. हे दर 41 हजार 565 रुपये प्रतितोळा झालेत. तर चांदीचेही दर 157 रुपये घसरुन 47,170 रु. प्रतिकिलो आहेत.
अडकलेली कामं मार्गी लावण्यासाठी आढावा बैठका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आरोग्य, रस्ते, शेती, स्थानिक शेतकऱ्यांचे मुद्दे समोर आले; शक्य तेवढ्या मुद्द्यांवर तात्काळ मदतीचे आदेश दिले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोणताही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही. शिवसेनेची भूमिका मी ठरतो, जाहिरातदार नाही, 'सामना'च्या कोकण आवृत्तीमधील रिफायनरी जाहिरातीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाष्य
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मंडळाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. शिवाय 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. 'शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचं वास्तव' या पुस्तकावर बंदी घालण्याची भाजपची मागणी, महाराजांवर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
2. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल झाल्यास रस्त्यावर उतरू, अखिल भारतीय वारकरी मंडळाचा इशारा, तर महाराजांविरोधात अंनिसची पोलिसांत तक्रार
3. एनआयएबरोबरच एल्गारच्या समांतर तपासासाठी राज्य सरकार एसआयटी नेमणार, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय, एनपीआरच्या प्रश्नावलीवरही आक्षेप
4. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीसाठी नवीन तारीख, 3 मार्चच्या शिक्षेसाठी पटियाला न्यायालयाचं डेथ वॉरंट, तर दोषींना वाचवण्यासाठी वकिलांचा खटाटोप सुरुच
5. आजपासून बारावीची परीक्षा, सुमारे 15 लाख विद्यार्थी भविष्य आजमावणार, कॉपी रोखण्यासाठी विशेष पथकांची नजर
6. सचिन तेंडुलकरला क्रिडाविश्लातला सर्वोच्च लॉरियस पुरस्काराचा मान, भारताच्या विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनमधला क्षण वीस वर्षात सर्वोत्तम
एबीपी माझा वेब टीम