मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार?

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Dec 2019 11:42 PM
निळजे आणि दातीवली स्टेशनच्या दरम्यान रोड ब्रिज वरून कार खाली रेल्वे रुळांवर कोसळली, दिवा आणि पनवेल दरम्यानची सेवा ठप्प, ओव्हरहेड वायर मधील विद्युत पुरवठा केला खंडित
परभणीत 12 वर्षीय मुलीचा विनयभंग, 2 जणांवर गुन्हा दाखल
स्नेहभोजनासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी दाखल
मध्य आणि हार्बर मार्ग विस्कळीत. कुर्लाजवळ क्रॉस ओव्हर पॉईंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाड्या थांबल्या, सीएसएमटी कडे जाणारा आणि तिकडून येणारा मध्य रेल्वेचा जलद मार्ग बंद, तर हार्बर लाईनचे दोन्ही मार्ग बंद, बिघाड दुरुस्तीचे काम सुरू
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार?, विधान सभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत ही महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता
LIVE UPDATE : मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोहचले
प्रसिद्ध कवियित्री अनुराधा पाटील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, 'कदाचित अजूनही' काव्यसंग्रहासाठी अनुराधा यांचा सन्मान
वाई-महाबळेश्वर रोडवरील पसरणी घाटात शिवशाही एसटीला अपघात,
स्टेअरिंग रॉड तुटल्याने गाडी घाटाच्या कठड्याला धडकली,
एसटी घाटात जाता जाता वाचली,
गाडी चढाला असल्यामुळे मोठा अनर्थ टळला
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 'सामना' रंगणार,
राऊतांचे थेट प्रश्न आणि पवारांची पॉवरफुल उत्तरं,
29 डिसेंबर रोजी पुण्यात संजय राऊत शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार
निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी अक्षय सिंगची फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली

निर्भया प्रकरण सुनावणी, दोषी अक्षयच्या पुनर्विचार याचिकेला महाधिवक्ते तुषार मेहतांचा विरोध, अशा राक्षसांना जन्म देऊन देवालाही लाज वाटत असेल, अक्षयवर दया नाही दाखवली पाहिजे, तुषार मेहतांचा युक्तीवाद, दोषी अक्षयच्या याचिकेवर दुपारी 1 वाजता येणार निर्णय
सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलेल्या खोट्या व्हिडीओवर काँग्रेसची टीका, माजी मुख्यमंत्र्यांनी खोटे व्हिडीओ टाकू नये, असं वागणं राज्याच्या हिताचं नाही, पृथ्वीराज चव्हाण,राजीव सातव यांचं आवाहन
लोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता उल्हासनगरमध्ये लोकलमधून पडून तरुण जखमी झाला आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी (17 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दिनेश गायकवाड असं या तरुणाचं नाव असून तो लोकलच्या दरवाजात उभा होता. लोकल उल्हासनगर स्थानकात येत असतानाच अचानक दिनेशचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. यात दिनेशच्या डोक्याला इजा झाली असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
लोकलमधून पडून डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता उल्हासनगरमध्ये लोकलमधून पडून तरुण जखमी झाला आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी (17 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दिनेश गायकवाड असं या तरुणाचं नाव असून तो लोकलच्या दरवाजात उभा होता. लोकल उल्हासनगर स्थानकात येत असतानाच अचानक दिनेशचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. यात दिनेशच्या डोक्याला इजा झाली असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन काळात ही भेट झाल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा सवाल विचारला जात आहे. एकनाथ खडसे भाजपवर नाराज आहेत. पण त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय अद्याप झाला नसल्याची माहितीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मुख्यालयात बौद्धिक, देवेंद्र फडणवीसांसह राधाकृष्ण विखे पाटलांची हजेरी
नागपूरमध्ये आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काल मध्यरात्री दोन-तीन तरुण दारुच्या नशेत आमदार निवासात घुसले. तिथे त्यांनी मोठा गोंधळ घातला. तसेच पैशांची मागणीदेखील केली.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्स




    1. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागूं यांच वयाच्या 92 व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा, उद्या पुण्यात अंत्यसंस्कार

    2. मार्च आणि एप्रिल अशा दोन टप्प्यात शेतकरी कर्जमाफी, सूत्रांची माहिती, कर्जमाफीच्या आढाव्यासाठी सरकारकडून पथकाची नियुक्ती, बँकांकडूनही माहिती मागवली

    3. भाजपवर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची नागपुरात पवारांसोबत गुफ्तगू, राजकीय चर्चांना उधाण, खडसे-पवार भेट वैयक्तिक असल्याचा नवाब मलिक यांचा दावा

    4. नागपूरचे महापौर संदीप जोशींवर गोळीबार, महापौर थोडक्यात बचावले, पोलिसांचा तपास सुरु

    5. नागरिकता दुरुस्ती कायद्याविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, तर कायदा मागे घेण्याची विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी, अमित शाहांचा मात्र नकार

    6. विशाखापट्टणममध्ये आज भारत-वेस्ट इंडिज दुसरा एकदिवसीय सामना, मालिकेत कमबॅक करण्यासाठी टीम इंडिया सज्ज



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.