LIVE UPDATES | पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून वीस लाखाचे सोने जप्त
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
17 Feb 2020 11:23 PM
बीडमधील सामजिक न्याय विभागाच्या इमारतीतील बोगस कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार, धनंजय मुंडे यांनी दिले चौकशीचे व कारवाईचे आदेश
पुणे : दुबईहून विमानाने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून तब्बल 642 ग्रॅम वजनाचे व तब्बल वीस लाख रुपये किमतीची सोने केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. संबंधीत महिला भुकटीच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. मरिअम मोहम्मद सलीम शेख (रा. मुंबई)असे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध भारतीय सीमाशुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. रविवारी पहाटे चार वाजता लोहगाव विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचे दुबईहून आलेले विमान उतरले. या विमानामध्ये एका महिला प्रवाशाकडे तस्करी केलेले सोने असल्याची खबर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, दुबईहून आलेल्या विमानातून उतरुन एक महिला प्रवासी गडबडीत विमानतळाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंती निमित्त परभणीच्या जिंतुर येथील जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने 390 महिलांनी मशाल फेरी काढून शिवरायांना अभिवादन केले. मोठ्या संख्येने महिलांनी मशाल फेरी काढल्याने जिंतुर शहर उजळून निघाले होते.
मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज कामाटीपुरा परिसराला भेट देऊन या परिसराच्या पुनर्विकासाचा संदर्भातल्या आराखड्यासंदर्भात चर्चा केली. या भेटीदरम्यान सर्वच म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आणि कामाटीपुरा परिसरातील नागरिक उपस्थित होते.
धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे नगरसेवक सुनिल बैसाणे, महिला बालकल्याण सभापतीपदी स्नेहल जाधव, महिला बालकल्याण उपसभापतीपदी रेखा सोनवणे यांची बिनविरोध निवड
कल्याण : केडीएमसीतील जलनि:सारण आणि मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब जाधव एसीबीच्या जाळ्यात, ठेकेदाराकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 20 फेब्रुवारीला आंध्र प्रदेशला जाणार, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे जलद गतीने चालवून या घटनांमधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न
मुंबई : 'मराठी बाणा' कुणाचा?, अशोक हांडेंचा की शेमारूचा? ट्रेडमार्क कायद्यावरून हांडेंचा शेमारूविरोधात 200 कोटींचा दावा. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणार फैसला.
'मराठी बाणा' कुणाचा?, अशोक हांडेंचा की शेमारूचा? ट्रेडमार्क कायद्यावरून हांडेंचा शेमारूविरोधात 200 कोटींचा दावा, मुंबई उच्च न्यायालय मंगळवारी सुनावणार फैसला
अमरावती - महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे बंजारा महिलांसोबत बंजारा नृत्य. आजपासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरीय स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शनीला सुरुवात.
मुंबईतल्या जीएसटी भवनाला लागलेली आग 3 तासांनंतर आटोक्यात आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नांदेड : पोहायला गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू, धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथील घटना, साईचरण आलूरोड आणि लखन राचेवाड( दोघेही वय 14 वर्ष )अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे आदेश. हल्लेखोर वाघावर आतापर्यंत 4 लोकांचा जीव घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दिले आदेश.
३ मार्चला निर्भयाच्या दोषींना फाशी, पटियाला कोर्टाकडून नवं डेथ वॉरंट जाहीर, मात्र अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचा दोषींच्या वकिलाचा दावा
एल्गार प्रकरणाची राज्य सरकार समांतर चौकशी करणार आहे. एनआयएसोबत एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी होणार आहे. राज्य सरकार लवकरच एसआयटीची स्थापना करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एल्गार तपासाबाबत निर्णय झाल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या नवव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार वाय बी सेंटरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोडून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
विरोधात बसण्याचा जनादेश मिळूनही सत्तेत बसले : चंद्रकांत पाटील
25 फेब्रुवारीला भाजप 400 ठिकाणी आंदोलन करणार, तहसील कार्यालयांसमोर शेतकरी, महिला समस्यांबाबत आंदोलन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या सोलापुरातील भाविकांचा तेलंगणात भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे. तर दोन बालकांसह पाच जण किरकोळ जखमी असल्याचे कळते. रविवारी (16 फेब्रुवारी) सांयकाळी तेलंगणातील वनपरती जिल्ह्यातील कोत्ताकोटाजवळ हा अपघात झाला. यामध्ये सपना राजू कुनी (वय 25 वर्ष), शारदा कुनी (वय 50 वर्ष), दत्तात्रय धुळम (वय 45 वर्ष) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कृष्णाहरी कुनी, यल्लप्पा कुनी, शैलेश धुळम, श्रेयश धुळम, कृष्णा कुनी, राजु कुनी, भक्ती कुनी हे जखमी आहेत. साोलापुरातल्या पूर्व भागात राहणाऱ्या धुळम आणि घरकुल परिसरात राहणाऱ्या कुनी परिवाराचे सदस्य तिरुपती इथे बालाजीच्या दर्शनासाठी निघाले होते. जीप चालकाचा ताबा सुटून गाडी महामार्गाच्या सुरक्षा कठड्याला धडकल्याने हा अपघात झाला. अपघातातील जखमींना स्थानिकांनी बाहेर काढून हैदराबाद आणि महेबूबनगर इथे उपचारासाठी पाठवले आहे. या अपघाताची नोंद तेलगंणातील कोत्ताकोटा पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याआधाची तिथलं वातावरण तापलं आहे. रिफायनरी आणि संचयनी घोटाळ्यावरुन कोकणात मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाकरे सरकार संचयनी घोटाळ्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार का? असा प्रश्न विचारणारं बॅनर मालवणात लावलं आहे. कोकणातल्या शेतकऱ्याना पैसै दुप्पट करुन देतो सांगत संचयनी कंपनीने फसवणूक केली होती. फसवणूक करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे सतीश सावंत यांच्यावरही आरोप झाले होते. सतीश सावंत यांनी नुकतीच शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. आता उद्धव ठाकरे यामध्ये लक्ष घालणार का हा प्रश्न आहे
देशातल्या 92 टक्के बड्या करदात्यांनी 2017-18 या आर्थिक वर्षातील वार्षिक रिटर्न्स भरले. जीएसटीअंतर्गत नोंदणीकृत व्यावसायिकांमध्ये सर्वाधिक रिटर्न भरणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात आहे. पाठोपाठ गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा क्रमांक आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींचं नवीन डेथ वॉरंट काढावं यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर पटियाला कोर्टात आज सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या आईवडिलांनी ही याचिका दाखल केली आहे.
सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम वाढल्यामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना आजही ट्रॅफिक ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. सायन पुलाचं बेअरिंग बदलण्याच्या कामासाठी 8 ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यातील पहिला ट्रॅफिक ब्लॉक 14 फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला होता मात्र तांत्रिक अडचणींमुळे हा ट्रॅफिक ब्लॉक आजचा आणखी एक दिवस वाढवण्यात आला आहे.
मुंबईतल्या पाच टोल नाक्यांवर या फेब्रुवारी अखेरपर्यंत फास्टॅगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सुविधा सुरू झाल्यानंतर याचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागेल, अशी योजना MSRDC तयार करत आहे. वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस मार्ग आणि दहिसर अशा 5 ठिकाणी मुंबईच्या एन्ट्री पॉइंटवर टोल नाके आहेत.
शरद पवारांनी नाशिकचा नियोजीत दौरा अचानक रद्द केला असून ते मुंबईत परतले आहेत. आज राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत एल्गारप्रकरणी पवारांच्या राज्य सरकारकडून स्वतंत्र चौकशीच्या मागणी प्रकरणी चर्चा होऊ शकते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. त्यात मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच कोकण दौरा आहे. मुख्यमंत्री दौऱ्याची सुरुवात रायगड जिल्ह्यातील उमरठ गावातून करतील. तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळाच्या नूतनीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर निघतील. दरम्यान नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा https://marathi.abplive.com/
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. एल्गार परिषद, कोरेगाव-भीमाच्या समांतर चौकशीचे शरद पवारांचे संकेत, जळगावमधील बैठकीत सूचना, तर आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची महत्वाची बैठक
2. अयोध्येत नक्की जा, म्हणजे तुम्हाला हिंदुत्वाचं खरं रक्त समजेल, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर सीएए, एल्गार प्रकरणावरुन शरद पवारांवर हल्लाबोल
3. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर, नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष
4. सायन उड्डाण पुलाचं काम अद्याप बाकी, तांत्रिक कारणामुळे वाहतूक आजऐवजी उद्या सुरू होणार
5. प्रियंका गांधींच्या ट्वीटनंतर जामियातील अनेक व्हीडिओ उजेडात, तरुणांच्या हाती दगड असल्याचंही स्पष्ट, पोलिस कारवाईवरुन वातावरण तापण्याची शक्यता
6. कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 765 जणांचा मृत्यू, भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता, अर्थतज्ज्ञांनी वर्तवला अंदाज
एबीपी माझा वेब टीम