LIVE UPDATES | माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड

देश विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Mar 2020 09:21 PM
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड, राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून गोगोई यांची निवड
उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच बीड शहरामध्ये आणि बीड तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
येस बँक घोटाळा प्रकरणी राणा कपूर यांच्या कोठडीत वाढ, 20 मार्चपर्यंत तपासयंत्रणेच्या कस्टडीत ठेवण्याचे मुंबईतील पीएमएलए कोर्टाकडून निर्देश
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य 31 मार्चपर्यंत बंद राहणार, वनविभागाचा निर्णय
2 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात,खानदेशातील लाखो भाविक या उत्सवात सहभागी होतात. साडेतीन शक्तीपीठांपैकी आध्यापिठ म्हणून सप्तश्रृंगी देवी भाविकांची श्रद्धा आहे.

औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यान बंद करण्याचा निर्णय, महापौर आणि महापालिका आयुक्तांचा तडकाफडकी निर्णय, सिद्धार्थ उद्यान आज दुपारपासूनच बंद करण्याचा घेतला निर्णय
मध्य प्रदेशची विधानसभा 26 मार्चपर्यंत स्थगित, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभा स्थगित करण्याचा निर्णय
शेअर बाजारामध्ये आज पुन्हा घसरण, बाजार सुरु होताच सेंसेक्समध्ये 1500 अंकांची घसरण तर निफ्टीमध्ये 460 अंकांची घसरण
नागपूर येथे एका तरुणीचा मृतदेह मंगळवारी बाजार परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 21 ते 24 वर्षीय तरुणी मृत अवस्थेत सकाळी मंगळवारी कॉम्प्लेक्स परिरात आढळून आली या प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहे.
कोल्हापूर : पादचाऱ्याला चुकवताना एसटी बस झाडावर आदळली, अपघातात एक जण ठार तर 27 जण जखमी, कळंबा पेट्रोल पंपाजवळील घटना, जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं
कोल्हापूरात शिरोळ तालुक्यात दोन गटांत हाणामारी
कोल्हापूरात शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. सुमारे 100 घरांवर जोरदार दगडफेक तर दोन्ही बाजूच्या 80 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दगडफेकीत 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुती केली आहे. जातिभेद नष्ट करण्यासाठी सावरकरांनी मोठं कार्य केल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. सावरकरांनी सामाजिक क्रांती केल्याचंही शिंदे म्हणाले.
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून चर्चा केली आहे. कोरोनाच्या राज्यातील स्थितीबाबत आणि उपाययोजनांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

पार्श्वभूमी

देश विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा... 

1. राज्यात 33 कोरोनाग्रस्त, पुण्यातल्या रुग्णांची संख्या 16 वर, गरज असेल तरच घराबाहेर पडा, विभागीय आयुक्तांचं पुणेकरांना आवाहन
2. राज्यभरातली चित्रपटगृहं, व्यायामशाळा, स्विमिंग पूल 31 मार्चपर्यंत बंद, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी, मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू
3. कोरोनाच्या भीतीनं शहराबाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली, मुंबईकडे येणाऱ्या गाड्या मात्र रिकाम्याच
4. कस्तुरबापाठोपाठ KEMमध्येही बुधवारनंतर चाचण्या, लवकरच 250 तपासणी करणारी यंत्रणा आणणार, सेव्हन हिल्समधल्या बेड्सचीही संख्या वाढवणार
5. प्रशासनाचा आदेश धुडकावून शिर्डीत साई परिक्रमा यात्रा, आयोजकांवर गुन्हा दाखल, मंत्री छगन भुजबळांचाही पुण्यात जाहीर कार्यक्रम, तर चंद्रकांत पाटलांकडूनही पदाधिकाऱ्यांची बैठक


एबीपी माझा वेब टीम 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.