Live Updates | डोंबिवलीत पार्किंगच्या वादातून दोन गटात हाणामारी

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Feb 2020 11:20 PM
डोंबिवलीत पार्किंगच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. डोंबिवलीच्या पाथर्ली परिसरात ही घटना घडली. याच भागात राहणारे रिक्षाचालक नितेश चाफळे हे मित्रांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायला चालले होते. हॉटेलसमोर रिक्षा लावताना एका बाईकस्वाराशी त्यांचा वाद झाला. या वादातून बाईकस्वाराने त्याच्या मित्रांना बोलावून घेत रिक्षाचालक नितेश चाफळे याला बेदम मारहाण करत त्याच्या मांडीवर चाकूने वार केले. त्याच्या हॉटेल कर्मचारी आणि पोलीस असलेल्या दोन मित्रांनाही यावेळी मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.
पुणे : पुण्यातील खटकणाऱ्या गोष्टींचे लोण कोल्हापूरपर्यंत येऊ लागलंय, असं परखड मत मांडत राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसलेंनी गोल्डमॅनचे कान टोचले. पिंपरी चिंचवडमधील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते. गळ्यात दागिने, गोल्ड जॅकेट मग पॅन्ट ही सोन्याची का घालत नाहीत, असे शालजोडे ही राजेंनी लगावले.
सांगली : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंजनी गावामधील आर. आर. पाटील यांच्या समाधीस्थळी इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम थोड्याच वेळात पार पडणार आहे. अंजनी गावामध्ये इंदोरीकर महाराजाचे आगमन.
यवतमाळ : जोडमोहा येथे टाटा मॅजिक वाहन झाडावर आदळून खोल नाल्यात उलटले, अपघातात सहा जणांचा मृत्यू तर 15 जखमी, अंत्यविधीसाठी कोटेश्वर येथून परतताना अपघात
नाशिक : कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवार यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करताच केंद्रातील भाजप सरकारने राज्य सरकार कुरघोडी करण्यासाठी एनआयएमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, सरकारमध्ये सुसूत्रता नाही. केवळ सत्तेसाठी तिघे पक्ष एकत्र आल्याचा संदेश यानिमित्ताने जात आहे. अश्या शब्दात रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या कोरेगाव भीमा प्रकारणाच्या पुर्नचौकशी करण्याच्या मागणीचा समाचार घेतला. आंबेडकर एका खासगी समारंभासाठी मनमाडला असता ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारमधील तिन्ही घटक पक्षाची समन्वय समिती स्थापन करून महत्वाच्या निर्णयावर चर्चा करण्याची गरज असल्याचा सल्लाही आनंदराज आंबेडकरांनी  दिला.
परभणी : सेलु शहरातुन परभणी येथे जाताना खासगी लक्झरीचं स्टेअरींग रॉड तुटून अपघात. एकाचा मृत्यू तर, आठ ते दहा प्रवासी जखमी.
सोलापूर : सध्या टिकटॉकच्या व्हिडीओची बरीच क्रेझ दिसून येतंय. या व्हिडीओसाठी कोणत्याही थरला जाऊन तरुण विडिओ शूट करताना पाहायला मिळतं. जेसीबीच्यावर चढत डान्स करणाऱ्या तरुणांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच वायरल होतोय. क्षणार्धाचा व्हिडीओसाठी जीव धोक्यात घालून हे तरुण डान्स करताना दिसतायेत. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय. आपल्या मित्राच्या लग्नात तरुणांनी अशा पद्धतीने डान्स केल्याची माहिती मिळतेय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे फक्त पर्यटन, नितेश राणेंची टीका
नवी मुंबई : भाजपच्या महाअधिवेषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे लाईव्ह भाषण सुरू
रत्नाकर गुट्टे यांच्यावर 25 लाख रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा, गंगाखेड साखर कारखान्याला करारासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत ऊसतोड मुकादामाच्या नावावर परस्पर 12 लाख 80 हजारांचं कर्ज उचलले, ऊसतोड मुकादमाने कारखानासोबत केलेल्या करारामुळे बॉण्ड दिले होते, या बॉण्डचा गैरवापर करत कारखान्याने या दोन मुकादमाच्या नावाने कर्ज उचलल्याचे पुढे आल्यानंतर मुकादमाची पोलिसात धाव

अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची शरद पवारांनी बैठक बोलावली, सांगलीतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
अंबरनाथमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 10 टन प्लॅस्टिक पकडलं, उल्हासनगरहून कोल्हापूरला नेलं जात होतं प्लॅस्टिक, अंबरनाथ नगरपालिका आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांनी केली कारवाई
पुणे : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खेड-शिवापूर टोलनाक्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त, खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ आंदोलकांची गर्दी व्हायला सुरुवात, खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांच्या भेटीला
मनमाड : मालगाडीचे 4-5 डबे रुळावरुन घसरले, लासलगाव रेल्वे स्टेशन जवळील घटना, डबे लूप लाईनवरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही
वर्धा : नगरपालिकेच्या इंझापूर शिवारातील डंपिंग यार्डला आग, आगीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मितीच्या मशीन जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

नाशिक : इंदोरहून शिर्डीकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी बसची ट्रकला पाठीमागून धडक, अपघातात 34 प्रवाशी जखमी, मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवीजवळील घटना, जखमींवर शिरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु

पार्श्वभूमी

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in



महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान, तर महाविकास आघाडीविरोधात भाजप जनआंदोलन छेडणार

2. सामनामध्ये चक्क कोकणातील रिफानयरीची जाहिरात, प्रकल्पाला विरोध कायम असल्याचं शिवसेना नेत्यांकडून स्पष्ट, प्रकल्पविरोधकांची सामना कार्यालयात धडक

3. पक्षातील गद्दारांची 2 दिवसांत हकालपट्टी, राज ठाकरेंची तंबी, तर भाजपाने युतीसाठी नकार दिल्याने औरंगाबादेत मनसेची कसोटी

4. मेगाभरतीसाठी महापोर्टलऐवजी खातेनिहाय ऑफलाईन परीक्षा होण्याची शक्यता, एप्रिलपासून प्रक्रिया सुरु होणार, आरक्षणाची पडताळणीही सुरु

5. मुंबईत सीएए, एनआरसीविरोधात एल्गार, 65 संघटनांची मोट आझाद मैदानात धडकली, दिलेला शब्द पाळण्याचं अबू आझमींचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

6. कीर्तन सोडून शेती करेन, इंदोरीकर महाराजांची उद्विग्नता, मात्र संततीप्राप्तीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर महाराज ठाम

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.