= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासाविषयी मोठं भाष्य केलं आहे. सध्या एनआयएकडे तपास गेला असला तरी राज्य सरकार एसआयटी नेमून समांतरपणे चौकशी करु शकते असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. याबाबत अॅटर्नी जनरल यांचं मत मागवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान ड्रोन हल्ल्याचा संभाव्य धोका लक्षात घेता 500 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील आदिवासी प्रश्नचिन्ह शाळेत एका विद्यार्थीनीचा भिंतीचा पिल्लर कोसळून मृत्यू झाला. यात दोन मुली किरकोळ जखमी सुद्धा झाल्यात. भारती बेलसरे (वय 10 वर्ष रा. घटांग ता. चिखलदरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती आंघोळीसाठी गेली असता वाऱ्याने लगतचा विटांचा पिल्लर कोसळला यात एक वीट तिच्या डोक्याला लागल्याने यात ती गंभीर जखमी झाली होती. मात्र, उपचारा दरम्यान तिचा अमरावतीत रुग्णालयात दुपारी 3 वाजता मृत्यू झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेवर पेट्रोल फेकून काही अज्ञात हल्लेखोरांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या युवकासोबत अनैतिक संबंध होते, त्या युवकाचा साखरपुडा मोडण्यासाठी त्या महिलेने प्रयत्न केल्याने त्याचा राग मनात धरून त्या युवकाने आज पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मिळत आहे. पीडित महिला विधवा असल्याचे समजते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर : शहराच्या पाणीपट्टीत 30 टक्क्यांनी वाढ होणार, स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर, तब्बल पाच वर्षांतर पाणी दरवाढीचा प्रस्ताव, नागरिकांचा दरवाढीला विरोध,आंदोलनाचा इशारा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नारायण राणेंचा यू टर्न, नाणारबाबत भाजपची जी भूमिका तीच माझी भूमिका असल्याचा नारायण राणेंचा खुलासा, तर नाणारबाबत शिवसेनेची भूमिका बदलती असल्याचा राणेंचा आरोप
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चिंतन ग्रुपचे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात(वय 65)यांचे आज पुणे येथे आजारपणामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव उद्या दिनांक 16 फेब्रुवारीला सकाळी 8 ते 10 या वेळेत त्यांच्या राहत्या घरी(शिवश्रुष्टी अपार्टमेंट, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे)येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यविधी सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे होईल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांची बदनामी केल्याबद्दल एका वकीलाने स्वतःहुन पुण्यातील सायबर पोलिसांकडून तक्रार दाखल केलीय. इंदुरीकर महाराजांचे 8-7-2018 रोजी पुण्याच्या हडपसर भागात किर्तन आयोजित करण्यात आले होते. त्या किर्तनाचे युट्यूबचे व्हिडिओ वापरून औरंगाबादच्या तीन तरुणांनी इंदुरीकर महाराजांची बदनामी केल्यां या तक्रारीत म्हटलय. पांडुरंग शिवलीकर या वकिलांनी ही तक्रार दिलीय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नवी मुंबई : देशांतील प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या डिझेल बस बंद करीत इलेक्ट्रीक बसची संख्या वाढविण्यासाठी देशात 1000 पर्यावरण पुरक बस देणार असल्याची घोषणा केद्रींय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत सद्या 30 इलेक्ट्रीक बस केंद्र सरकारने दिले आहेत. अजून 200 बस देण्यात याव्यात अशी मागणी महापौरांनी प्रकाश जावडेकर यांना केली आहे. यावर लवकरच निर्णय घेणार असून 200 इलेक्ट्रीक देणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. मनपा ताब्यात दाखल झालेल्या बसची पाहणी यावेळी प्रकाश जावडेकर यांनी केली. इलेक्ट्रीक बसमुळे धूर निघत नसल्याने हवा प्रदूषण थांबणार आहे. कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने वायू प्रदूषण होणार नाही. बसमध्ये एसी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
25 वर्ष ज्यांच्यासोबत संघर्ष करत आलो त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
स्वार्थासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आली. भाजप प्रखर विरोधक म्हणून काम करणार : विनोद तावडे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ठाणे : बाळकूम जवळच्या लेक सिटी मॉलमध्ये आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनमाड पालिकेच्या बजेट आणि सर्व साधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांसह सर्व पक्षीय नगरसेवकांचा गोंधळ, साफसफाई आणि भाजी मार्केटच्या अर्धवट असलेल्या कामाबाबत नगरसेवकांचं खुर्च्या सोडून वेलमध्ये उतरुन ठिय्या आंदोलन, संतप्त नगरसेवकाने अधिकाऱ्यांच्या टेबलावर घाण टाकून संताप व्यक्त केला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद महसूल वसुलीचं टार्गेट पूर्ण न केल्याने वैजापूरच्या तहसीलदारांचं निलंबन, शासकीय कामात कामचुकारपणा केल्याप्रकरणी वैजापूरचे तहसीलदार विनोद गुंडमवार निलंबित, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची कारवाई
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद महसूल वसुलीचं टार्गेट साध्य न केल्याने वैजापूरच्या तहसीलदारांचं निलंबन, शासकीय कामात कामचुकारपणा केल्याप्रकरणी वैजापूरचे तहसीलदार विनोद गुंडमवार निलंबित, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची कारवाई
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोकणात पुन्हा रिफायनरी प्रकरण गाजण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या कोकण आवृत्तीत रिफायनरीची जाहिरात देण्यात आली आहे. 'सामना'तल्या या जाहिरातीमुळे कोकणात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेनेने सत्तेत असताना रिफायनरीला विरोध केला होता. शिवाय भाजपकडून नाणार रद्द करण्याचं आश्वासन घेऊनच भाजपसोबत युती करण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा जाहिरात प्रसिद्ध झाल्याने शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर : विवाहित महिलेला अश्लील मेसेज आणि शिवगाळप्रकरणी पोलीस उपअधीक्षकावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल, उपअधीक्षक जितेंद्र जाधव यांना अटक आणि जामिनावर सुटका, जाधव जातपडताळणी विभागात कार्यरत
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी आज निवडणूक
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपूर : नागपूर-भंडारा रोडवर लग्नाची वरात घेऊन चाललेल्या बसची ट्रकला धडक, चौघांचा मृत्यू तर 5 ते 6 जण जखमी, मौदा पोलीस स्टेशनअंतर्गत शिंगोरी गावाजवळची घटना
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपकडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले राज्यसभेसाठी इच्छुक, राज्यातील भाजप नेत्यांची अमित शहांसोबत दोन तास खलबते
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अकोला : गजानन महाराज प्रगटदिनासाठी शेगावला जाणाऱ्या पायदळ वारीतील दोन भक्तांना टिप्परने चिरडले, बाळापूर तालूक्यातील लोहारा गावातील मदरशाजवळची घटना, चार जण जखमी, विशाल पाटेकर, श्याम निवाणे अशी मृतांची नावं