- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन दिल्लीत आंदोलन पेटलं, विद्यार्थ्यांनी तीन बससह मोटारसायकल पेटवल्या, पोलिस बंदोबस्त तैनात
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन दिल्लीत आंदोलन पेटलं, विद्यार्थ्यांनी तीन बससह मोटारसायकल पेटवल्या, पोलिस बंदोबस्त तैनात
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
15 Dec 2019 09:48 PM
टीम इंडियाचा वेस्ट इंडीजकडून आठ विकेट्सने पराभव, हेटमायर, होपच्या शतकाने विंडीजचा शानदार विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी #INDvWI
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्या 8 मोर्चे येणार आहेत, त्यामध्ये सर्वशिक्षा अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा मोर्चा, शिवाय कोतवाल संघटन, सकल धनगर समाज, इंटक, समाजवादी पक्षाचे मोर्चे
समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन दिल्लीत आज आगडोंब उसळल्याचं पाहायला मिळालं. गेल्या तीन दिवसांपासून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं आंदोनल सुरु आहे. या आंदोलनाला आज हिंसक वळण मिळालं. या विद्यार्थ्यांनी ३ बस आणि काही मोटारसायकल पेटवल्या आहेत. यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळतेय. आप नेते अमानुतुल्ला यांच्यावर हिंसा भडकावण्याच आरोप करण्यात येतोय. मात्र, अमानुतुल्ला यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
बंद पडलेली गाडी ढकल स्टार्ट करताना गाडी थेट चित्री धरणात शिरली,
गाडी धरणात शिरल्याने आप्पासो शिंदे यांचा मृत्यू
,
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार
,
नातेवाईकच गाडी सुरु करण्यासाठी ढकलत होते
छत्रपती शिवाजी स्मारक याबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदार असेल त्यावर कारवाई करू : मुख्यमंत्री
विधानसभेत भाजपतर्फे आशिष शेलार यांची मुख्य प्रतोद आणि देवयानी फरांदे यांची प्रतोद पदी नियुक्ती निश्चित,
तर सुजितसिंह ठाकूर यांचे विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी नाव ठरले, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हिरव्या कंदील दाखवण्याची प्रतिक्षा, अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी
सत्तेसाठीची सौदेबाजी त्यांना लखलाभ, असे म्हणता सावरकरांच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. दरम्यान सावरकरांबद्दल्या वक्तव्यवरुन फडणवीसांनी खासदार राहुल गांधींनाही लक्ष्य केले. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींना भारताचा इतिहास माहीत नाही. त्यांनी भारताचा इतिहास वाचावा. त्यानंतर राहुल गांधींना सावरकरांची महती कळेल.
पुणे : तोरणा गडावर मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला,
सुमारे 20 पर्यटक गडावर अडकले
राज्यात 93 लाख हेक्टर फळबागांचं नुकसान झालंय, सरकारने 23 हजार कोटींच्या मदतीचा शब्द पाळावा : देवेंद्र फडणवीस
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या विषयाची चर्चाच नाही, किमान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची पूर्तता करावी : देवेंद्र फडणवीस
नियमित सरकार येऊनही शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही, सरकार अधिवेशन गांभीर्याने घेत नाही : देवेंद्र फडणवीस
नियमित सरकार येऊनही शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही, सरकार अधिवेशन गांभीर्याने घेत नाही : देवेंद्र फडणवीस
यवतमाळ : एटीएम फोडणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात, आरोपींकडून 5 लाख रुपये रोख तसेच गॅस कटर, कार जप्त, उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना अटक, 11 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ : एटीएम फोडणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात, आरोपींकडून 5 लाख रुपये रोख तसेच गॅस कटर, कार जप्त, उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना अटक, 11 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर भाजपच्या प्रमुख नेत्यांची थोड्याच वेळात बैठक, उद्या सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या रणनीतीवर होणार चर्चा
आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही शंभर दिवसात बलात्कार प्रकरणाचा तपास करुन दोषींना फाशी देण्याचा प्रस्ताव, महाराष्ट्र सरकार लवकरच बलात्काऱ्यांना शंभर दिवसात फाशी देण्याचा प्रस्ताव आणणार, जानेवारीत प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी दोन वेळा काळा पाण्याची शिक्षा भोगली, राहुल गांधी दोन दिवस तरी अशी शिक्षा भोगू शकतील का? सावरकरांचा अपमान देश सहन करणार नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा इशारा, शिवसेनेची प्रतिक्रिया मवाळ असल्याचीही टीका
पालघर : पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरुच, कासा, बोर्डी, धुंदलवाडी, चिंचले भागात पहाटे भूकंपाचे धक्के, पहाटे 4 आणि 6 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के, नागरिकांची माहिती
नागपूर : दिघोरी नाका परिसरात देशी दारुच्या दुकानासमोर एकाची हत्या, इरफान इसराईल उर्फ ईप्पू पठान (30 वर्ष) असं मृत व्यक्तीचं नाव, दारु दुकानात मारहाण झाल्याचा संशय, मारहाणीनंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
राष्ट्रीय महामार्गावर आजपासून फास्टटॅग अत्यावश्यक, विनाफास्टटॅग संबंधित मार्गिकेत शिरल्यास दुप्पट टोल आकारणी होणार
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. राष्ट्रीय महामार्गावर आजपासून फास्टटॅग अत्यावश्यक, विनाफास्टटॅग संबंधित मार्गिकेत शिरल्यास दुप्पट टोल आकारणी
2. उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार, दूध उत्पादक आणि व्यावसायिकांच्या बैठकीत निर्णय, ग्राहकांना भुर्दंड बसणार
3. राहुल गांधींच्या सावरकरांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेना-काँग्रेस आमनेसामने, सावरकरांवर तडजोड होणार नाही, संजय राऊतांचं ट्वीट, उद्धव ठाकरेही नाराज
4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना जोडे मारावेत, रणजित सावरकरांची आक्रमक प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसांकडूनही राहुल गांधींवर हल्लाबोल
5. 80 तासांचं सरकार पाहून हसावं की रडावं कळेना, एबीपी माझाच्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य, पुन्हा शुन्यातून सुरुवात करण्यासाठी कोअर कमिटीतून बाहेर
6. चेन्नईत आज भारत-वेस्ट इंडिज पहिला एकदिवसीय सामना, टी20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज