LIVE UPDATE | वर्धा : भरधाव दुचाकी शिवशाही बसवर आढळून तीन जण ठार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Mar 2020 08:33 PM
वर्धा : भरधाव दुचाकी शिवशाही बसवर आढळून तीन जण ठार, दोघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूर-हैदराबाद महामार्गावर बरबडी शिवारातील अपघात, तिघेही मृतक समुद्रपूर तालुक्यातील चिखली येथील रहिवासी
नागपूर : मेयो रुग्णालयात शुक्रवारी रात्री दोन संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र, इतर रुग्णांचे रिपोर्ट आले नसताना ते रुग्णालयातून न सांगता निघून गेले. ते निघून जाणे अपेक्षित नव्हते. त्यांनी तिथे थांबायला पाहिजे होते. प्रत्येक वेळेला पोलिसांची मदत घेऊन संशयित रुग्णाला थांबणे अपेक्षित नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आष्टी येथील केंद्र क्रमांक 3410, या जिल्हा परिषद शाळेतून दहावीचा भूमिती विषयाचा पेपर फुटला आहे. परीक्षा केंद्राबाहेर अनेकांच्या मोबाईलवर हा पेपर परीक्षा सुरू झाल्यापासून अवघ्या काही मिनिटात व्हायरल झाला. जिल्हा परिषदेच्या या केंद्राबाहेर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत असून, शिक्षण विभागाच्या भरारी पथकाचा फोलपणा देखील यामुळे उघड झालाय.
मुंबई : विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहविभागावर चर्चा; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधारी मंत्र्यांवर आरोप. सीएए, एनआरसी आणि एनपीआर विषयी सरकारमधील मंत्री अफवा पसरवत असल्याचा आरोप.
अलिबागजवळ प्रवासी बोट उलटली; बोटीतील सर्व 78 प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे डबागाईला आला आहे. सोशल मीडियावर चिकनमुळे कोरोना व्हायरस होत असल्याच्या अफवांमुळे माणगावं पंचक्रोशीतील दोनशे ते तीनशे पोल्ट्री व्यवसायिकांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला असल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. गेली 20 वर्षे पोल्ट्री व्यवसाय माणगावं खोऱ्यात सुरु आहेत. ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायातून करत होते. आता पोल्ट्री व्यवसाय डबगाईला आल्याने त्याच्या जवळ कुकुटपालनासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकित झालेत. मार्च अखेर येत असल्याने बँका कर्ज परतफेड करण्यासाठी तगादा लावत आहेत. अफवांमुळे बॉयरल कोंबड्या फुकट वाटायची वेळ आली. कोणी त्या सुध्दा घ्यायला बघत नाहीत. कोरोना व्हायरसमुळे डबगाईला आलेल्या पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. कुकुटपालनासाठी घेतलेले कर्ज डोक्यावर असल्याने ते फेडायच कस की आत्महत्या करावी असा प्रश्न या पोल्ट्री व्यावसायिकासमोर उभा आहे.
शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास वरळी दूध डेरी रस्त्याजवळ बीएमडब्ल्यू कारचा मोठा अपघात झाला. या अपघातात गाडीत बसलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका सहा महिन्याच्या मुलीचा सुद्धा समावेश आहे. बीएमडब्ल्यू गाडी भरधाव वेगाने येत असताना गाडी चालवत असलेल्या महिलेचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डीवायडरला धडकली. गाडी डीवायडरला धडकल्यानंतर जखमींना जवळच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील गाडी चालणारी महिला सोडून इतर तिघांना मृत घोषित करण्यात आलं. चालक महिला मूळ पुण्याची असून वरळीला आईच्या घरी आली होती. गाडीमध्ये या महिलेसोबत आपली सहा महिन्याची मुलगी, आई आणि एक नातेवाईक असे चार जण होते. गाडी चालवणारी महिला गंभीर जखमी असून तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वसमत शहरातील जयनगर भागात राहणारा दीपक नरोटे हा तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. परंतु, आज सकाळी वसमत-परभणी रोडवर असलेल्या कॅनॉलमध्ये दीपकचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने वसमत परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. दीपक हा शिरडशहापूरचा मूळ रहिवाशी आहे.
चंद्रपूर : धानाचा ट्रक, कारवर पलटल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील जनकापूर-ओव्हाळा येथे घडली. अपघातात तळोधी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य गुलाबराव कामडी व सहाय्यक शिक्षक दादा फटाळे यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि वादळामुळे ट्रक कारवर पलटला असल्याची शक्यता आहे.
पालघर : गंजाड येथून लग्न कार्यक्रम आटोपून विक्रमगड सातखोर येथे जाणारा पिकअप टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. चालकांच पिकअप वरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. अपघातात एकाचा मृत्यू तर 24 जण गंभीर जखमी झालेत. पिकअपमध्ये जवळपास 40 वऱ्हाडी होते. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णायलात उपचार सुरू आहेत. तर गंभीर पैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील एकाला गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं आहे.

पार्श्वभूमी

1. भारतात कोरोनाचा दुसरा बळी, दिल्लीत महिलेचा मृत्यू, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ८२ वर

2. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तू, केंद्र सरकारकडून घोषणा, काळाबाजार करणाऱ्यांना 7 वर्षांची शिक्षा

3. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरातल्या व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि सिनेमा-नाट्यगृह बंद राहणार, मख्यमंत्र्यांचे आदेश, राज्यात 1९ कोरोनाग्रस्त

4. घरी बसूनच काम करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, वर्क फ्रॉम होमसाठी हायकोर्टातही याचिका, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये शाळा-कॉलेजसना सुट्टी

5. येस बँकेच्या धसक्यानंतर सरकारी निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याचं राज्याचं धोरण, वेतन, पेन्शनसह सर्व योजनांची खाती 1 एप्रिलपासून राष्ट्रीय बँकेत

6. अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून ५० अब्ज डॉलरची तरतूद

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.