LIVE UPDATES | अहमदनगर : उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीच्या कारला भीषण अपघात, एकाचा मृत्यू

दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jan 2020 11:44 PM
अहमदनगर : उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीच्या कारला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, उद्धव ठाकरे यांची मेहुणी जखमी, सिन्नर तालुक्यातील पांगरी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
मुंबई : विद्याविहारच्या सोमय्या कॉलेजमध्ये फुटबॉल खेळल्यानंतर एमबीएच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू, निर्भय मिश्रा असं 26 वर्षीय तरुणाचं नाव
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर, अमेय खोपकर यांची संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा नेमणूक, कार्याध्यक्षपदी शालिनी ठाकरे, सल्लागारपदी महेश मांजरेकर, अतुल परचुरे, अनंत जोग, उपाध्यक्षपदी विजय पाटकर, संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री, सायली संजीव, स्मिता तांबे, शर्वणी पिल्लई, विशाखा सुभेदार, उमा सरदेशमुख, रमेश परदेशी यांची नेमणूक
दहा रुपये थाळी योजनेचा शुभारंभ 26 जानेवारीला, प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ होणार, गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक व पदार्थाची गुणवत्ता राखून ताजे भोजन दिले जाणार
मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत वाडिया प्रकरणावर तोडगा निघाल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा, वाडिया व्यवस्थापनाला 46 कोटी रूपये देण्याला संमती शर्मिला ठाकरे यांची माध्यमांना माहिती
फास्टॅग नसल्यास चालकाला दुप्पट टोल आकारणार, मनी कंट्रोल वेबसाईटचं वृत्त...
आनंदराज आंबेडकर 'वंचित'मधून बाहेर, पत्रकार परिषदेत दिली माहिती
दिल्लीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फाशी होणार
अभिनेते राज कपूर यांच्या कन्या रितु नंदा यांचं कॅन्सरने निधन, दिल्लीत वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास
जेपी नडड्डा भाजपचे नवे अध्यक्ष बनणार, 20 जानेवारी रोजी औपचारिक घोषणा होणार, जेपी नड्डा सध्या भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत
तुम्ही सर्वजण महाराजांचे वारसच आहात : : उदयनराजे भोसले
राज्याचा खेळखंडोबा केलाय, हे दिवस बघण्यापेक्षा मेललं बरं : उदयनराजे भोसले
गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करा, थेट महाराज बनू नका : उदयनराजे भोसले
सत्तेच्या मागे आम्ही कुत्र्यासारखो धावलो नाही : उदयनराजे भोसले
महाशिवआघाडीतून शिव नाव का काढलं? : उदयनराजे भोसले
शिवसेनेला जेव्हा नाव दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का? : उदयनराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराज जगातले आदर्श व्यक्ती
नागपुरात म्हाळगीनगर चौकात बोलेरो आणि ट्रकचा अपघात झाला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. ही बोलेरो मजुरांना घेऊन जात होती. आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
विधानपरिषदेतील धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेसाठी काँग्रेसच्या संजय दौंड यांना संधी...
कोल्हापुरातील मटणाच्या दरावर अखेर तोडगा निघाला आहे. 520 रुपये प्रतिकिलो मटण विकण्यावर एकमत झालं आहे. मटण विक्रेते आणि कृती समिती यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापुरातील मटण विक्री बंद होती.
यवतमाळ विधानपरिषदेसाठी आज शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी दाखल करताना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित राहणार आहे. दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत. विधानसभा निवडणुकीपुर्वीच चतुर्वेदी यांनी कुटुंबासह शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता.
मोटर व्हेईकल अॅक्टमधील दंडासंदर्भातील केंद्र सरकारच्या अल्टिमेटमसंदर्भात राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. कायद्यातील जाचक तरतुदींवर लवकरच तोडगा काढण्यासाठी ही भेट होणार आहे. मोटर व्हेईकल अॅक्टच्या तरतुदी राज्यात जशाच्या तशा लागू न केल्यास राज्यात कलम 356 लावण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अखेर मागे घेण्यात आलं आहे. केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकांनी यासंदर्भात माहिती दिली. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितल्याचंही जावडेकर म्हणाले आहेत. दरम्यान 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करायला ते विसरले नाही. दरम्यान गोयल यांनी पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं वादंग उठलं होतं. महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत पुस्तकाविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली. राजकीय पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. अखेर या सगळ्या वादंगासाठी कारणीभूत ठरलेलं ते पुस्तक मागे घेण्यात आलं आहे.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in



महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' पुस्तक अखेर मागे, प्रकाश जावडेकरांची माहिती, लेखक जयभगवान गोयलांची माफी

2. वादग्रस्त पुस्तकावरुन सामनातून भाजप नेत्यांना टोला, पण पंतप्रधान मोदींचा कर्तबगार आणि लोकप्रिय नेते म्हणून उल्लेख

3. महागाईनं 5 वर्षांतला उच्चांक गाठला, भाज्यांसह जीवनावश्यक वस्तू महागल्यानं महागाईच्या दराची 7.35 टक्क्यांवर उसळी, सरकारची कसोटी

4. वाडिया रुग्णालय प्रकरणात बड्या नेत्यांची एन्ट्री, राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा, तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही बैठक

5. राजकीय प्रचारासाठी विद्यार्थ्यांचा वापर होता कामा नये, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांच्या शाळांना नोटीसा, भाजपच्या सीएए प्रचार मोहिमेला धक्का

6. भाडं स्वीकारू शकतात की नाही हे दर्शवण्यासाठी मुंबईतल्या टॅक्सी, रिक्षांवर लवकरच तीन दिवे, प्रवासी आणि चालकांमधला वाद टाळण्यासाठी निर्णय

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.