शिवसेनेवरुन सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Dec 2019 09:10 PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे.

हे बदल पुढीलप्रमाणे आहेत. जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांना देण्यात आले असून अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेतील आणखीन एका नगरसेविकेचं पद धोक्यात? काँग्रेसच्या पुष्पा कोळी यांना जातप्रमाणपत्राची कागदपत्र करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. वॉर्ड 181 मधून पराभूत शिनसेना आणि अपक्ष उमेदवाराची कोळींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेसोबत अन्याय केला आहे, असे म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. तसेच काही दिवसानंतर सगळं काही सुरळीत होईल, असेही स्वामी म्हणाले.
वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत, इथे तडजोड नाही : संजय राऊत
वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत, इथे तडजोड नाही : संजय राऊत
शिवसेना अन्याय सहन करणारा पक्ष नाही : पंकजा मुंडे
आधी राष्ट्र, मग पक्ष, त्यामुळे आधी राष्ट्रासाठी काम करणार : पंकजा मुंडे
माझ्या ट्विटर हॅन्डलवर कधीही कमळ नव्हतं : पंकजा मुंडे
बंड करण्यासाठी मला काहीही कारण नाही : पंकजा मुंडे
बंड करण्यासाठी मला काहीही कारण नाही : पंकजा मुंडे
माझ्या मनात खदखद नव्हती : पंकजा मुंडे
मी अजिबात तणावाखाली नाही पण अस्वस्थ आहे : पंकजा मुंडे
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रता मेळावा सुरू, अजित पवारांची फटकेबाजी...
मुंबईच्या भाजप कार्यालयात भाजपच्या ओबीसी मोर्चाची बैठक सुरू. बैठकीला ओबीसी समाजाचे नेते विकास रासकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार विजय गिरकर उपस्थित आहेत. बैठकीला माजी आमदार राम शिंदे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे गैरहजर. बैठकीत ओबीसी समाजासाठी केंद्रात ज्या योजना आहेत. त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठीची चर्चा करण्यात येणार आहे.
मुंबईच्या भाजप कार्यालयात भाजपच्या ओबीसी मोर्चाची बैठक सुरू. बैठकीला ओबीसी समाजाचे नेते विकास रासकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार विजय गिरकर उपस्थित आहेत. बैठकीला माजी आमदार राम शिंदे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे गैरहजर. बैठकीत ओबीसी समाजासाठी केंद्रात ज्या योजना आहेत. त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठीची चर्चा करण्यात येणार आहे.
गोवा : कुंडई येथे प्रवासी बस आणि चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये जोरदार धडक, तिघे जखमी, जखमींवर फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
कोल्हापूर : प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे गेलेल्या महाविकास आघाडीचा पहिला विजय, दत्तावड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत प्रवीण माने विजयी, भाजपच्या प्रमोद पाटील यांचा पराभव, निकालानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
उस्मानाबाद : परंडाचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्यावर वाळू माफियांचा हल्ला, पहाटे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर अंगावर घातला, गंभीर जखमी झालेल्या तहसीलदारांवर बार्शीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
डहाणू, तलासरी तालुक्यांमध्ये भूकंपांच्या धक्क्यांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी पहाटे परिसरात भूकंपांचे सलग पाच धक्के बसले. तर आज पहाटे 5.24 च्या दरम्यान पुन्हा मोठा धक्का बसला आहे. आजच्या भूकंपाने तलासरी, दापचरी, धुंदलवाडी, आंबोली, आंबेसरी, कासा, धानीवरी, उर्से, वानगाव, बोर्डी, घोलवड भाग हादरला आहे. काल दुपारी पावणे चारच्या दरम्यान भूकंपाचे एकूण पाच धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल दुपारी 3.56 वाजता 3.2 रिष्टर स्केल आणि रात्री 9.55 ला 3.4 रिष्टर स्केलचे धक्के बसले.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in




    1. शिवसेनेनं साद द्यावी, भाजपची दारं खुलीच, एबीपी माझाच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात जनादेशाचा अनादर केल्याचाही आरोप



 




    1. एकनाथ खडसेंचं तिकीट केंद्रातून कापलं गेलं, माझाच्या मुलाखतीत फडणवीसांचा गौप्यस्फोट, तर गोपीनाथ गडावरील नाराजीनाट्यानंतरही पंकजांच्या पाठीशी



 




    1. पवार बोलतात ते सत्य, पण पूर्ण सत्य नाही, पवार-मोदी भेटीवर फडणवीसांचा दावा, तर अजित पवारांमुळेच गनिमी कावा फसल्याचीही खंत



 




    1. मतदारसंघ सांभाळता न आलेल्या व्यक्तीमुळे फरक पडणार नाही, पंकजा मुंडेंच्या नाराजीवर खासदार संजय काकडेंचा टोला, भाजप आमदारांकडून काकडेंच्या वक्तव्याचा निषेध



 




    1. नागरिकत्व सुधारणा कायद्याला महाराष्ट्रातूनही विरोध, काँग्रेस नेत्यांकडून अंमलबजावणीस नकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष्य



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.