LIVE UPDATES | आयपीएल 2020 स्पर्धा पुढे ढकलली, 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरु होणार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Mar 2020 10:59 PM
नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष सर्वच 111 प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभा करणार आहे. 2015 च्या निवडणुकीतही शेकापने आपले उमेदवार महापालिका निवडणुकीत उतरविले होते, मात्र त्यांना एकही नगरसेवक निवडून आणता आला नव्हता. ही निवडणूक लढविताना आम्ही समविचारी पक्षांना तसेच सामाजिक संस्थांना बरोबर घेऊन ही नेवडणूक लढवणार असल्याचे शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. झोपडपट्टी पुनर्वसन तसेच सीडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतीचा प्रश्न हे मुद्दे निवडणुकी मध्ये प्रमुख्याने असणार आहेत. गेल्या वेळेला आम्हला अपयश आले, मात्र अनेक ठिकाणी आमचे उमेदवार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यंदाचे वातावरण आम्हाला पोषक आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक सभागृहात दिसणार असल्याचा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनामुळं दिशा कायदा लांबणीवर, महिला अत्याचाराला चाप लावण्याच्या दृष्टीनं आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 'दिशा' कायदा आणण्यासाठी महाराष्ट्रात जोरदार तयारी, कोरोनाच्या संकटामुळे या अधिवेशनात विधेयक मांडता येणार नाही, पण सरकार दिशा कायद्याचा अध्यादेश काढण्याच्या तयारीत

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, दहावीचा गणिताचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थिनीने केली आत्महत्या, गायत्री अस्वार असे विद्यार्थिनीचे नाव, राहत्या घरात गळफास घेवून केली आत्महत्या
राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती स्थिर, शाळांसदर्भात लवकरच निर्णय घेऊ : राजेश टोपे
BREAKING NEWS | आयपीएल 2020 स्पर्धा पुढे ढकलली, 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरु होणार
कोराना व्हायरसचा परिणाम आजही शेअर बाजारात दिसत आहे. शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरुच आहे. सेन्सेक्स सुमारे 3100 अंकांनी तर निफ्टी 950 अंकांनी कोसळला आहे. दरम्यान निफ्टीमधे लोअर सर्किट लावण्यात आलं आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये 45 मिनिटांसाठी ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे. सेन्सेक्समध्ये अद्याप सर्किट लावलेलं नाही. मात्र सेन्सेक्स साडे नऊपेक्षा जास्त टक्क्यांनी गडगडल्यास कधीही सर्किट लावलं जाऊ शकतं.
67 वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलले आहे. उद्यापासून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे संत गाडगे महाराज महाविद्यालय परिसरात दोन दिवसांचे 67 वे विदर्भ साहित्य संमेलन होणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विदर्भ साहित्य संघाने हे संमेलन पुढे ढकलण्याचे ठरवले आहे. महिन्याभरानंतर पुन्हा हिंगणा येथे संमेलन घेतले जाण्याची शक्यता आहे.
येत्या रविवारी एमपीएसएसीकडून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा घेण्यात येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी उमेदवारांकडून होतं आहे. या परीक्षेसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती ही परीक्षा केंद्र आहेत. पुण्यातीलच परीक्षा केंद्रांवर 40 हजार उमेदवार परीक्षा देतील असा अंदाज व्यक्त होत आहे. परीक्षा देण्यासाठी परिक्षार्थी त्यांच्या पालकांसह पुण्यात येतील. त्यामुळे गर्दी होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल अशी शंका व्यक्त होत आहे. तसंच परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येईल, यामुळे अजून धोका वाढेल. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
काल प्रतितोळा 44200 असा सोन्याचा दर होता तर आज प्रतितोळा 41600 असा आजचा दर आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर प्रतितोळा 2600 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर केन रिचर्डसनला कोरोनाची लागण, न्यूझीलंडसोबतच्या सामन्याआधी रिचर्डसनला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर केन रिचर्डसनला कोरोनाची लागण, न्यूझीलंडसोबतच्या सामन्याआधी रिचर्डसनला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर
कोरोनाचा फटका हळूहळू विविध व्यवसायांना होतो आहे आणि याचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे तो पर्यटन व्यवसायाला आणि पर्यायाने विमान आणि टूर कंपन्यांना. भारतातली एक अग्रगण्य टूर कंपनी असलेल्या वीणा वर्ल्डनं त्यांच्या पुढील एका महिन्यातील सर्व आंतरराष्ट्रीय टूर्स रद्द करत असल्याची जाहिरात वृत्तपत्रांत दिली आहे. मात्र देशांतर्गत टूर्सबद्दल कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र विकास आघाडीमधील राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठीचा तिढा अखेर सुटला आहे. राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. सध्या राज्यसभेच्या चार जागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. परिणामी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचं पारडं जड झालं आहे. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान हे राज्यसभेचे उमेदवार असतील.
यंदा डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातील नववर्षाच्या स्वागतयात्रांवरही कोरोनाचं सावट आहे. ठाणे जिल्ह्यातील नववर्ष स्वागतयात्रा संयोजकांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक बोलवली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. डोंबिवलीच्या नववर्ष स्वागतयात्रेत दरवर्षी हजारो लोक सहभागी होत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी काय निर्णय देतात, स्वागतयात्रा होते की नाही, याकडे डोंबिवलीकरांचं लक्ष आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई ते ठाणे ही देशातील पहिली रेल्वे सुरू करण्यात नाना शंकरशेठ यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी होत होती. शिवसेनेसाठी तो मराठी अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतरच प्रत्यक्ष नामांतर करता येईल.
दरम्यान, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं मुलांच्या काळजीपोटी पालकांचीही चिंता वाढली आहे. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी राज्यातल्या शाळा-महाविद्यालयांना तातडीनं सुट्टी जाहीर करा, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. कोरोना ज्या प्रकारे पसरत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे पत्र पाठवून पालकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान मुंबईतल्या एका शाळेनं वार्षिक परीक्षा न घेताच उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in


1. जीवघेण्या कोरोनाचा देशात पहिला बळी, कर्नाटकातील कलबुर्गीत सौदीतून आलेल्या वृद्धाचा मृत्यू, मुंबई, ठाणे,पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण, राज्यातील आकडा 14 वर


2. कोरोनामुळं शेअर बाजारात साडे नऊ लाख कोटीचं नुकसान, आयपीएलची तिकीटविक्री न करण्याचा निर्णय, तर अक्षय कुमारनं सूर्यवंशीचं प्रदर्शन पुढे ढकललं


3. कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर करावी, कोरोनाच्या भीतीपोटी पालक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुंबईतल्या एका शाळेकडून वार्षिक परीक्षेआधीच सुट्टी जाहीर


4. कोरोनामुळे इराणमध्ये अडकलेल्या 120 भारतीयांची आज सुटका होणार, लष्कराकडून जैसलमेर आणि जोधपूरमध्ये खास क्वॉरन्टाईन वॉर्ड तयार


5. एनपीआरसाठी कोणतीही कागदपत्र मागितली जाणार नाही, गृहमंत्री अमित शाह यांची राज्यसभेत माहिती, एनपीआरला घाबरण्याची गरज नसल्याचंही आवाहन


6. रावसाहेब दानवेंच्या मुलीची पती आणि सासूविरोधात तक्रार, हर्षवर्धन जाधवांवर मारहाणीचा आरोप तर जाधवांच्या आईकडूनही विरोधात तक्रार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.