अंंधेरी एमआयडीसीतील आग पुन्हा भडकली, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
13 Feb 2020 11:31 PM
चंद्रपूर : प्रवासी वाहतूक करणारी सुमो उलटली, चिमूर तालुक्यातील खैरी जवळ अपघात, 11 प्रवासी जखमी. नागपूर जिल्ह्यातील कांपा येथे जात होते. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात, शंकरपूर येथील टाटा सुमो वाहन चालक राझिक शेख देखील गंभीर, जखमी शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल, काही जखमींना चिमूर, चंद्रपूर व नागपूरला पुढील उपचारासाठी केले रवाना.
शिर्डी : निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना बजावली नोटीस, संगमनेर येथील वैद्यकीय कार्यालय विभागाने बजावली नोटीस, दुपारी घरी जाऊन वैद्यकीय विभागाने नोटीस दिली असल्याची माहिती
प्रियकर आणि त्याची प्रेयसी यांच्यात वाद झाल्यामुळे प्रियकर तरुणाने गळफास घेऊन प्रेयसी समोरच केली आत्महत्या, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत चौदा मैल परिसरातील घटना
अंंधेरी एमआयडीसीतील आग पुन्हा भडकली, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
काँग्रेस शिदोरी मासिक परत घेऊन माफी मागावी. तसंच सरकारने मासिकावर कारवाई करावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी
राजस्थानच्या सीकरमध्ये इमारतीत सिलेंडरचा भीषण स्फोट, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
महाविकास आघाडीचा पुन्हा फडवणीस सरकारला धक्का, भाजपाचे मुंबईतील नेते आणि देवेंद्र फडवणीस यांचे निकटवर्तीय संजय उपाध्याय यांची म्हाडाच्या उपाध्यक्षपदावरील नियुक्ती रद्द
शिवसेनेला काँग्रेसचा लेख मान्य आहे का? सत्तेसाठी किती लाचार राहणार? फडणवीस यांचा शिवसेनेला सवाल
पालघर - कासा-विक्रमगड महामार्गावर तलवाडा येथे भीषण अपघात. अपघातात दोन बाईक स्वारांचा जागीच मृत्यू. अज्ञात वाहनाची बाईकला धडक. धडक देऊन अज्ञात वाहन फरार. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
काँग्रेसच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर गलिच्छ लिखाण चुकीचं, शिदोरी मासिकातील लेखावरुन देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
वसई : वसईत खदाणीच्या पाण्यात बुडालेल्या 2 मुलींचा अद्यापही शोध सुरूच. मित्रांसोबत फिरायला आलेल्या दोन शाळकरी मुली काल 10 च्या सुमारास खदाणीच्या पाण्यात बुडाले. वसई पूर्व राजीवली परिसरातील खदाणीत वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांची शोध मोहीम अद्यापही सुरू आहे. शाळा बुडवून सातवीत शिकणाऱ्या या मुली आपल्या दोन मित्रांसोबत वसईत फिरायला आल्या होत्या. दीप्ती सिंग आणि खुशबू शेख असे बुडालेल्या मुलींचे नाव आहेत.
काँग्रेसकडून महापुरुषांच्या अवमानाची मालिका सुरुच, मध्य प्रदेश सरकारने माफी मागून छिंदवाड्यात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करावा: देवेंद्र फडणवीस
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची/उमेदवारांची माहिती वेबसाईट, स्थानिक-राष्ट्रीय वृत्तपत्र आणि फेसबुकवर द्या, सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना आदेश
मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोळता टेक्नॉलॉजी पार्क इमारतीत भीषण आग,अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
खेड-शिवापूरचा टोलनाका बंद करण्यासाठी आता आर या पारची लढाई, पुणे-सातारा रोडवर खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितर्फे येत्या 16 फेब्रुवारीला सर्वपक्षीय आंदोलन करणार
भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांना संधी, तर मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती
चीनमधील करोना व्हायरसचा मोबाईल व्यापाराला फटका, सुट्या पार्ट आवक घटल्यानं मोबाईल दुरुस्ती महागली
सार्वजनिकरित्या पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणणारी वादग्रस्त वक्तव्ये टाळा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बुधवारी (12 फेब्रुवारी) बैठक झाली. या बैठकीत बोलघेवड्या नेत्यांवर चर्चा झाली. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र विकास आघाडीतील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले होते. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्ये टाळा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
अमरावती : धामणगाव रेल्वे हत्याप्रकरणात दत्तापूरचे पोलीस ठाणेदार रवींद्र सोनोनेंची उचलबांगडी, अल्पवयीन मुलीच्या हत्येचा तपास आता मोर्शीच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे, आरोपीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणीला मदत करण्याऐवजी पोलिसांकडूनच छळ झाल्याचा आरोप, पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर कारवाई
पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती खबरदारी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू झाला. बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी ही घटना घडली. अविनाश मजली (वय 64 वर्ष) आणि अपर्णा मजली (वय 54 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. येत्या 29 फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा, अत्यावश्यक सेवांना वगळलं, निर्णयावर बच्चू कडूंची सडकून टीका
2. सरकारी तिजोरीत खटखटाड असताना मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल 15 कोटींचा खर्च, निविदा मंजूर न करताच नुतनीकरण सुरु केल्याचा आरोप
3. मुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणाला मनसेचा विरोध, आज राजगड ते जी वॉर्डवर मोर्चा, तर आजपासून राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर
4. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर राज्य सरकारचा निर्णय
5. कोस्टल रोडचं काम इकोफ्रेण्डली विटांनी होणार, पर्यावरणप्रेमी, कोळी बांधवांच्या विरोधावर महापालिकेचा उतारा, इस्रायलच्या कंपनीला कंत्राट
6. बिस्किटचा पुडा आणि भुईमुगाच्या शेंगांमधून 45 लाखांच्या परदेशी चलनाची तस्करी, दिल्ली विमानतळावर तस्कराचा पर्दाफाश, तपास यंत्रणा अवाक्
एबीपी माझा वेब टीम