आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला : देवेंद्र फडणवीस
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
13 Dec 2019 10:56 PM
अजित पवार आमच्या फेल गनिमी काव्याचे नायक, आणि मी सहनायक : फडणवीस
बुडणाऱ्या भाचीला वाचवताना मामाही बुडाला, मामाचा मृतदेह सापडला भाचीचा शोध सुरु, निकिता पुनदीर ही बुडताना पाहून मामाकडून वाचवण्याचा प्रयत्न, मामा उदय पवारही बुडाला, निकिताचा मृतदेह शोधण्याचे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु
साताऱ्यातील सागवड येथे महिलेची स्वत:च्या दोन चिमुकल्यांसह कृष्णा नदीत मारली उडी, नऊ महिन्याच्या बाळाचा मृतदेह सापडला, महिला आणि तीन वर्षाचा मुलगा अद्याप बेपत्ता
महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार हे रिक्षा सरकार आहे, याची तीन चाक तीन दिशेला जातील. हे सरकार फार काही काळ चालणार नाही : देवेंद्र फडणवीस
पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू परिसरात भूकंपाचे एका पाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के,
2.8 रिश्टर स्केल, 3.1 रिश्टर स्केल, 2.9 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाची नोंद
भाजप हा ओबीसांचा पक्ष : देवेंद्र फडणवीस
नागरिकत्व विधयेकाच्या विरोधात सोलापुरात मुस्लिम समुदाय रस्त्यावर
,
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मुस्लिम संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन
Live TV | गोपीनाथ मुंडेच्या स्मारकासाठी निधी देऊन वर्क ऑर्डरही निघाली आहे, खडसेंचा आरोप खोटा : देवेंद्र फडणवीस
मंत्रालयात एका युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, जाळीवर घेतली उडी, मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सदर तरुणीला ताब्यात घेतलं
मंत्रालयात एका युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, जाळीवर घेतली उडी, मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सदर तरुणीला ताब्यात घेतलं
काही शक्तींकडून भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न - आमदार मिसाळ
Live TV | शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार गुंडाळून ठेवले : देवेंद्र फडणवीस
तरुणींची छेडछाड करणाऱ्या तरुणाला बेदम चोप :- बेळगाव शहरातील गणपत गल्लीत गेल्या काही दिवसांपासून एक फळ विक्रेता महिला आणि तरुणींची छेडछाड करून अश्लील शेरेबाजी करत होता. तरुणींच्याकडे फोन नंबर मागण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. फिरोज नामक या फळ विक्रेत्याच्या छेडछाडीमुळे तरुणी, महिला त्रस्त झाल्या होत्या. काही तरुणींनी या बाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर काल काही तरुणांनी त्याला छेडछाड करताना रंगेहाथ पकडून त्याला चांगला चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
शिवसेना काँग्रेससोबत जाईल असं वाटलचं नव्हत : देवेंद्र फडणवीस
दिल्लीतील निर्भयाप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाची आजची सुनावणी टळली, 18 तारखेला दुपारी दोन वाजता सुनावणी होणार, व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चारही आरोपी कोर्टात हजर करणार
अजित पवार काकांशी बोललो, असं म्हणाले : फडणवीस
पाणी पुरवठा योग्य व्हावा या मागणीसाठी पिंपरी चिंचवड मनसे महिला अध्यक्षांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. अश्विनी बांगर थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. शहराची तहान भागवणाऱ्या धरणात 92 टक्के पाणी असताना ही शहरात दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. अधिक दाबाने पाणी देण्याचं कारण पुढं करत पाणी कपात लागू करण्यात आली, मात्र तरीही परिस्थिती जैसे थेच आहे. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा हा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय. म्हणूनच बांगर या थेट पाण्याच्या टाकीवर चढल्या. घशाला पाणी मिळालंच पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका आहे. तासभर सुरू असलेलं पाणी नाट्य चिंचवड पोलिसांनी हाणून पाडलं आणि त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं.
पंतप्रधान मोदी पवारांना काय बोलले, हे योग्य वेळी बाहेर येईल : फडणवीस
पुढील तीन दिवसांत राज्यात काही ठिकाणी पवसाची शक्यता : - बदलत्या हवामानामुळे येत्या तीन दिवसांत कोल्हापूर, महाबळेश्वर, सातारा, नागपूर, अमरावती भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसा अंदाज अकोला ग्रामीण हवामान विभाग आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
पंतप्रधान पवारांना काय म्हणाले हे योग्यवेळी बाहेर येईल : फडणवीस
पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते, म्हणून पतीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. सुजाता जाधव असं या महिलेचं नाव असून ती तिचा पती सुधीर जाधव याच्यासोबत डोंबिवलीच्या कोपर परिसरात वास्तव्याला आहे. सुजाता कामावर जाताना जीन्स आणि टी शर्ट घालते या कारणावरून तिचे आणि पती सुधीरचे नेहमी वाद व्हायचे. सुजाताने तिच्या मित्रांशी चॅटिंग करण्यालाही सुधीरचा विरोध होता. याच कारणावरून मंगळवारी रात्री त्यांच्यात वाद झाल्यानंतर सुधीर याने सुजाताला बेदम मारहाण करत तिचा गळा दाबला. यावेळी सुजाता बेशुद्ध पडल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं समजून सुधीर हा स्वतःच रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सुजाता जिवंत असल्याचं आढळल्यानं तिला आधी डोंबिवलीत आणि तिथून मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. याप्रकरणी सुधीर याला हत्येच्या प्रयत्नात पोलिसांनी अटक केली आहे.
आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला - फडणवीस
आम्हाला मिळालेल्या जनादेशाचा मित्रपक्षाने विश्वासघात केला - फडणवीस
निवडणुकीत आमचा पराभव नाही, लढलेल्या 67 ते 70 टक्के जागा जिंकल्या - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
निवडणुकीत आमचा पराभव नाहीच : देवेंद्र फडणवीस
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, शिवसेनेला 18 तर, काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येक 15 खाती, 23 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता
2. बहुजनांचा पक्ष पुन्हा मूठभर लोकांचा करु नका, गोपीनाथगडावरुन पंकजा मुंडेंची उघड नाराजी, पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट, भाजप कोअर कमिटीतून मात्र बाहेर
3. गोपीनाथ मुंडेंच्या आदेशानं ज्यांना मोठं केलं, त्यांनीच छळ केला, एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा, पंकजा मुंडेंचा पराभव घडवून आणल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार
4. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, लोकसभेत-राज्यसभेत मंजूर झालेलं विधेयकाचं कायद्यात रुपांतर, मोदी सरकारचा मोठा संकल्प मार्गी
5. निर्भयाच्या दोषींना तातडीने फाशी देण्याच्या याचिकेवर आज सुनावणी, निर्भयाच्या आईकडून पटियाला हाऊस कोर्टात याचिका
6. अयोध्या प्रकरणातील सर्व 18 पुनर्विचार याचिका फेटाळल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय