LIVE UPDATE | भारतात कोरोनाचा पहिला बळी

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Mar 2020 11:49 PM
भारतात कोरोनाचा पहिला बळी; कर्नाटकात कलबुर्गी जिल्ह्यातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्ताला केंद्राचा दुजोरा
सातारा : एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी बावधनमध्ये, बावधनचे बगाड सकाळी लवकर संपवणार, बगाड नदीवरुन लवकर हलवून यात्रा लवकर संपवणार, जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर यात्रा कमिटीचा निर्णय, बाहेरून येणाऱ्या यात्रेकरुना रोखण्यासाठी यात्रा कमिटीकडून प्रयत्न
अहमदनगर : कोरोनाचा धसका राळेगणसिद्धीपर्यंत, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटीसाठी येणाऱ्या लोकांना आता त्यांना भेटता येणार नाही, अण्णा हजारे यांच्या भ्रष्टचार निर्मूलन कार्यालयाने घेतला निर्णय

बीड : पतीने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या अंत्यविधी आटोपल्यावर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलंबा इथे घडली आहे. औरंगाबादमध्ये काल पतीने आत्महत्या केली होती. पत्नीने पतीच्या विरहाने आत्महत्या केली आहे. दरम्यान एक वर्षापूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्यांनी आत्महत्या केल्याने मोठी शोककळा पसरली आहे.

गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील रणजित जाधव (22) व मिनाक्षी जाधव (20) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. रणजित जाधव हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. तो विवाहानंतर पत्नी मिनाक्षी सह औरंगाबाद येथे किरायाच्या रुममध्ये राहत होते. दरम्यान बुधवारी रणजित जाधव याने औरंगाबाद याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली.

शवविच्छेदन करुन रणजित जाधव याचे पार्थिव रात्री उशिरा चकलांबा या गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईक दुख:त असतानाच सकाळी 8 वाजेच्या सुमारास घरालगत असलेल्या शौचालयातील आडूला दोरी बांधून मिनाक्षी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा महसुली कर माफ होणार, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, जवळपास अडीच लाख सैनिकांना होणार फायदा, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 50 हजार कोटींचा भार पडण्याची शक्यता
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील काही शाळांनी सुट्टी दिली आहे. विद्यार्थ्यांना आठवडा ते दहा दिवसांची सुट्टी दिलीय. सुट्टीनंतर वार्षिक परिक्षाही लवकर आटोपणार.
विधानसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, उद्या अर्ज भरण्याची शेवटची मुदत, शनिवारी निवडणूक, महाविकास आघाडीकडून नरहरी झिरवाळ यांचे नाव
बीड : पतीने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या अंत्यविधी आटोपल्यावर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलंबा इथे घडलीय. काल औरंगाबादमध्ये पतीने आत्महत्या केली होती. पत्नीने पतीच्या विरहाने आत्महत्या केलीय. दरम्यान एक वर्षापूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्यांनी आत्महत्या केल्याने मोठी शोककळा पसरली आहे.
बेळगावात होसुर येथील एका वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असून त्याला जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा वृद्ध केरळला जावून आल्याचे समजते. सायंकाळी हा 65 वर्षाचा वृद्ध सर्दी आणि ताप असल्याचे सांगत जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. 65 वर्षाच्या या वृद्धाची लक्षणे कोरोना सारखी दिसून आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील काही शाळांनी दिली विद्यार्थ्यांना आठवडा ते दहा दिवसांची सुट्टी. सुट्टीनंतर वार्षिक परिक्षाही लवकर आटोपणार.
कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत एकाची भर, पुण्यात कोरोनाचे एकूण 9 रूग्ण, मुंबईत 2 तर नागपुरात एक, राज्यात एकूण 12 रुग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण 9 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
अमेरिकेहून 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 9 वर गेली
उस्मानाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना व्हायरस पळविण्यासाठी जाळल्या शेणाच्या गोवऱ्या व धूप, आयुर्वेदाचा हवाला देत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर दिलं धूप जाळण्याचे प्रात्यक्षिक, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक केल्याचा आयुर्वेदिक महाविद्यालयाचा दावा, कोरोना आजाराबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील प्रकार
नाशिक : आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या ईगतपुरी विपश्यना केंद्रातील सर्व शिबिरे रद्द करण्यात आली आहेत. याला कारण ठरलय ते म्हणजे कोरोना. देशभरातूनच नाही तर जगभरातून या केंद्रात साधक येत असतात आणि यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे शिबिरे रद्द करण्यात आली असून प्रशासनाचा आदेश येईपर्यंत हे बंदच राहणार आहेत. तर दुसरीकडे उद्याच्या रंगपंचमीच्या उत्सवावरही कोरोनाचे सावट बघायला मिळत असून गर्दी टाळा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर रहाडींच्या आयोजकांकडूही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत.
कोरोना आजाराने देश-विदेशात धुमाकूळ घातल्याने त्या संधीचा फायदा घेऊन जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगाव येथे कोरूना व्हायरस लहान मुलांना लस पाजल्याने कोरूना बरा होतो. असे म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना लुबाडणाऱ्या महिलांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे सरकारनं भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घातले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं परदेशी नागरिकांच्या व्हिसा नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आयपीएलसाठी 15 एप्रिलपर्यंत कोणतेही परदेशी खेळाडू उपलब्ध होणार नाहीत असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
दिवसाच्या सुरवातीलाचं सेन्सेक्स कोसळला, सेन्सेक्स 1200 तर निफ्टीत 500 अंकांची घसरण, कोरोना आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा फटका
सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा मिळाला आहे. जातपडताळणी समितीकडून शिवाचार्य यांचं जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार आहे.
कल्याण स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद लोकल आणि एक्सप्रेस 20 मिनिटे उशिराने, बिघाड दुरुस्त मात्र गाड्यांच्या वेळापत्रकवर त्याचा परिणाम
देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने केंद्र सरकारने आणखी खबरदारीची पावलं उचलली आहेत. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून 15 फेब्रुवारीनंतर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस स्वतंत्र कशात ठेवण्यात येणार आहे. तसंच 15 एप्रिलपर्यंत पर्यटन व्हिसाही सरकारने बंद केला आहे. हा निर्णय 13 मार्चपासून लागू होणार आहे. एअर इंडियाने दक्षिण कोरियाला जाणारी उड्डाणं 25 मार्चपर्यंत तर आणि इटलीची उड्डाणं 28 मार्चपर्यंत रद्द केली आहे.
सोशल मीडियात खोट्या बातम्या तसेच भडकावू विधाने व्हायरल करण्याच्या प्रकाराची बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. फेसबुक, ट्विटर, गुगलवरील खोट्या बातम्या तसेच भडकावू संदेश हटवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकारसह फेसबुक, ट्विटर, गुगललाही नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे के. एन. गोविंदाचार्य यांच्या वतीने अॅड. विराग गुप्ता यांनी याचिका दाखल केली. सोशल मीडियातील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याबाबत केंद्रीय मंत्रालयांना निर्देश देण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यावर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सभांनी गाजलेले, महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असणारे आणि ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू घडवणारे दादरचे ऐतिहासिक शिवाजी पार्क आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ म्हणून ओळखले जाणार आहे. शिवसेनेने पालिकेच्या महासभेत मांडलेला नामविस्ताराचा प्रस्ताव बुधवारी मंजूर करण्यात आला.

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1. जगभरात कोरोनाने चार हजारांवर लोकांचे जीव घेतल्यानंतर, डब्ल्यूएचओकडून महामारी म्हणून घोषित, तर भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द

2. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर, मुंबईतही दोघांना लागण, तर पुण्यात तब्बल 8 कोरोनाग्रस्त, नागपुरातही एक रूग्ण पॉझिटिव्ह

3. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं शनिवारपर्यंत अधिवेशन आटोपणार, आजपासून विधीमंडळात सामान्यांना प्रवेशबंदी, आयपीएल रद्द करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

4. राज्यसभेसाठी भाजपकडून उदयनराजे, आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब, खडसेंच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम, तर राष्ट्रवादीकडून पवारांचा अर्ज, चौथ्या जागेवरुन कुरबुर कायम

5. दिल्ली दंगलीवर बोलताना शाहांकडून काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणावर बोट, काँग्रेस नेत्यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा गृहमंत्र्यांचा आरोप

6. भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेला सुरुवात, 3 सामन्यांच्या मालिकेतला आज पहिला सामना धरमशालामध्ये

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.