माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे : जयंत पाटील

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Dec 2019 11:48 PM

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More

पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते, म्हणून पतीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. सुजाता जाधव असं या महिलेचं नाव असून ती तिचा पती सुधीर जाधव याच्यासोबत डोंबिवलीच्या कोपर परिसरात वास्तव्याला आहे. सुजाता कामावर जाताना जीन्स आणि टी शर्ट घालते या कारणावरून तिचे आणि पती सुधीरचे नेहमी वाद व्हायचे. सुजाताने तिच्या मित्रांशी चॅटिंग करण्यालाही सुधीरचा विरोध होता. याच कारणावरून मंगळवारी रात्री त्यांच्यात वाद झाल्यानंतर सुधीर याने सुजाताला बेदम मारहाण करत तिचा गळा दाबला. यावेळी सुजाता बेशुद्ध पडल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं समजून सुधीर हा स्वतःच रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सुजाता जिवंत असल्याचं आढळल्यानं तिला आधी डोंबिवलीत आणि तिथून मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. याप्रकरणी सुधीर याला हत्येच्या प्रयत्नात पोलिसांनी अटक केली आहे.