LIVE UPDATES | औरंगाबादचे दोन वाघ निघाले मुंबईला

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Feb 2020 11:49 PM

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More

औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील दोन वाघ मुंबईला निघाले आहेत. मुंबईच्या वीर माता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयात पाठविण्यात येणार आहेत. दोन वाघा च्या बदल्यात सिद्धार्थ उद्यानात चार चितळ स्पॉटेड डियर व चार पेंटेड स्टॉर्क पक्षी आणली आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना औरंगाबादचे वाघ दिसणार आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने पालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात वाघ ठेवण्याची क्षमता ठरवून दिली आहे. प्राणिसंग्रहालयात नऊ वाघ ठेवण्यास मान्यता आहे. एप्रिल महिन्यात समृद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिल्याने वाघांची संख्यात वाढ झाल्याने दोन वाघ मुंबईच्या जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयात देण्यात आले आहेत.