LIVE UPDATES | मुलुंड येथील स्विमिंग पूल ची क्लोरीन वहिनी फुटून सात जण अस्वस्थ

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Dec 2019 09:45 PM

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More

मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह परिसरात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील तरुण तलावाला जोडलेली क्लोरीन वायू ची गळती होऊन 7 जणांना त्रास होऊन उलट्या, खोकल्याच्या त्रास झाल्याची घटना समोर आली आहे.यात एक महिला अग्निशमन कर्मचारी, 2 सुरक्षा रक्षक आणि 3 महिला सफाई कामगार यांचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान येथील कर्मचाऱ्यांना तलावाला जोडलेली क्लोरीन ची पाईप लाईन मधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने खोकला आणि उलट्या चा त्रास होऊ लागला.त्यांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली.अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले परंतु त्यांच्या देखील महिला कर्मचाऱ्याला याचा त्रास झाला.त्या सर्वांना पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुदैवाने या वेळी या ठिकाणी पोहण्यास कोणीही आलेले नव्हते नाहीतर हा आकडा वाढला असता.सध्या या सात ही जणांची प्रकृती स्थिर असून हा स्विमिंग पूल गॅस वाहिनी दुरुस्त होई पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.