LIVE UPDATES | पुण्यात कोरोनाचे दोन रूग्ण पॉझिटिव्ह
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Mar 2020 11:15 PM
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.inराज्यातील आणि देशभरातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा 1. येस बँक गैरव्यवहारप्रकरणी राणा कपूर यांना तीन दिवसांची कोठडी, तर देश सोडणाऱ्या मुलीला मुंबई विमानतळावर रोखलं, येस बँकेमुळे सरकारच्या कर्जमाफी योजनेला फटका 2. आज मनसेचा 14 वा वर्धापन दिन, मनसेच्या शॅडो कॅबिनेटची यादी माझाच्या हाती, राज ठाकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता 3. राज्यातील सरकारी खात्यात 2 लाख 193 पदं रिक्त असल्याची माहिती, गृह, जलसंपदा, कृषी, महसूल विभागात सर्वाधिक पदं रिक्त असल्याचं माहितीच्या अधिकारात समोर 4. राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, भिवंडीत परदेशी मास्क धुवून विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल 5. पुण्यात कात्रजच्या बोगद्याजवळ वणवा, अनेक झाडं जळून खाक, वृक्षप्रेमी सयाजी शिंदेंकडून झाडं वाचवण्याचे प्रयत्न 6. भारतीय महिलांचं पहिल्यावहिल्या विश्वचषकाचं स्वप्न पुन्हा अधुरं; ऑस्ट्रेलियानं भारताला हरवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर कोरलं आपलं नाव
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. सदर रुग्ण नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहे. तर दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आली नाहीत. सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
धुळे : सोलापूर मार्गावरील गरताड बारीजवळ सोमवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान धुळ्याकडून चाळीसगांवकडे जाणाऱ्या मारुती व्हॅनला अचानक आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झालं नसलं तरी मारुती व्हॅन पूर्णपणे जळून खाक झालीय. धुळे महानगर पालिकेच्या दोन अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटनेमुळे धुळे -सोलापूर मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनमाड-नांदगांव मार्गावर हिसवळ जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक. या अपघातात लक्ष्मण गुंजाळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अंकुश मढे, रोहित विंचू, गौतम नवले हे 3 तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने या दोन्ही मोटारसायकल एकमेकांना जोरात धडकला आणि त्यात लक्ष्मण गुंजाळ याचा मृत्यू झाला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद : अट्रोसिटी प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. कार्यालय समोरील टपरी हटवण्यासाठी टपरी चालकाला जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. औरंगाबादेत क्रांती चौक पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शिर्डी : रेल्वेच्या पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या. श्रीरामपूर येथील धक्कादायक घटना. पोलीस उपनिरिक्षक मिनीचंद मिना यांची गळफास लावून आत्महत्या. ते रेल्वेसुरक्षा दलात कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट. मिना हे राजस्थान येथील मुळ रहिवासी आहेत. श्रीरामपूर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अनंत दीक्षितांनी केसरीमधुन बातमीदारीला सुरुवात केली होती. काही वर्षं ते कोल्हापूर सकाळचे आणि त्यानंतर पुणे सकाळचे संपादक होते. त्यानंतर पुण्यात लोकमत वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं. काही वर्षांपूर्वी ते पत्रकारितेतुन निवृत्त झाले. मात्र, त्यानंतर किडणीच्या आजाराने ते त्रस्त होते आणि गेली अडीच ते तीन वर्ष त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज संध्याकाळी त्यांचं पुण्यातील रत्ना रुग्णालयात निधन झाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ओला-उबेर सारख्या मोबाईल अॅपवर आधारीत टॅक्सींबाबत राज्य सरकारचा भाडेनिश्चितीचा फॉर्म्युला अखेर ठरला. मोबाईल अॅपवरील टॅक्सींच्या मनमानी भाडेआकारणीला चाप बसवण्यासाठी खटुआ कमिटीच्या शिफारशींनुसार आराखडा तयार, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
स्वातंत्र्यवीर सावरकर, ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलच्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या अभीनेते शरद पोंक्षे ज्या गाडीत आले ती गाडी अहमदनगर मध्ये काही अज्ञात इसमांनी फोडली. 100 वे अखिल भारतीय नाट्य संमेलन नगर मध्ये येणार आहे. याची माहिती देण्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे, नाट्य परिषदेचे मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी हे अहमदनगर मध्ये आले होते. यावेळी पत्रकार परिषद सुरू असताना हॉटेलच्या बाहेर अध्यक्ष प्रसाद कांबळे यांच्या गाडीत शरद पोंक्षे यांची बॅग होती. याच गाडीच्या ड्राइव्हर च्या बाजूची काच काही अज्ञात इसमांनी फोडली. दरम्यान ही काच फोडण्यामागे पोंक्षे यांच्यावरील रोष होता की बॅग चोरीचा उद्देश होता हे समजू शकल नाही. मात्र शहरात पोंक्षे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची चर्चा होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे रत्ना रुग्णालयात नुकतेच निधन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जोपर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात आहे, तोपर्यंत पुण्याच्या विकासासाठी अजिबात राजकारण करणार नाही : अजित पवार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीड जिल्हा बँकेमध्ये चारशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. शिवसंग्रामच्या राज्यातील कार्यकर्त्यांची कार्यकारणी बैठक आज बीड शहरामध्ये पार पडली यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनायक मेटे यांनी हा आरोप केला आहे. बीड जिल्हा बँकेने सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1000 कोटी रुपये कर्ज दिले आहे. विशेष म्हणजे हे कर्ज शेतकऱ्यांनी सोसायटीच्या मार्फत जिल्हा बँकेत भरले आहे. मात्र हे पैसे सेवा सहकारी सोसायटीचे सचिव आणि जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मिळवून बँकेत भरलेले नाहीत असे जवळपास चारशे कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंगत बसलीय, मी वाढपी आहे. त्यामुळे आधी आमदारांना खुष करून टाकलं. प्रत्येकजण आपल्या जिल्ह्याला झुकतं माप देत असतो. चंद्रकांत पाटील देखील आधी कोल्हापूरला झुकतं माप देत असत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात म्हटलं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अजित पवार भाषणासाठी माईकजवळ पोहचताच माईक आणि डायस खाली पडला. विशेष म्हणजे याच डायसवरून चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांची भाषणं झाली. मात्र, नेमके अजित पवार बोलायला उभे राहिले आणि डायसचा एक एक भाग खाली पडायला लागला. त्यामुळे अजित पवारांना स्टेजवर दुसऱ्या बाजूला असलेल्या डायसवर जाऊन भाषण करावं लागलं. भाषणाला सुरुवात करताच अजित पवारांनी महापौरांनी मुद्दाम तर असं केलं नाही ना असं गमतीनं म्हटलं. पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या एव्हीएशन गॅलरीचे उद्घाटन आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत होतंय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जवळ जवळ हिवाळा संपत आला अन् उन्हाळा सुरू होत आला तरीही अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. परभणीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावलीय. तब्बल 15 मिनिटं शहरात हलक्या सरी बरसल्या. यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून काढणीला आलेला गहू, अन् हरभरा पिकांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच बदलत्या हवामानाचा फळ पिकांना ही चांगलाच फटका बसतोय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोटली, कडता, शॅम्पलच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. त्यामुळे ही अन्यायकारक पद्धत बंद करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केली. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक यांनाच घेराव घातला. शिवाय कार्यालयासमोर आंदोलनही केले. शेतीमालाचा उघड लिलाव पद्धतीने खरेदी-विक्री व्यवहार करावा व सौद्याव्यतीरीक्त खरेदी होणारा शेतीमाल हा मालाच्या दर्जा प्रमाणे सौद्यातील भावाप्रमाणेच खरेदी व्हावा, खरेदी केलेल्या मालातुन कडता, पायली घेऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. बाजार समितीत शेतीमालाची पारदर्शकपणे विक्री करण्याची जबादारी ही बाजार समितीची आहे. मात्र वास्तविक पाहता असे होताना दिसत नाही. बाजार समितीत प्रत्येक घटकांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. त्यामुळेच या सर्व बाबींवर नियंत्रण असणाऱ्या जिल्हा उपनिबंधक यांनाच संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी घेराव घातला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कॅबीनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महत्वाचे अधिकारी उपस्थित आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीड जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी कडक नियम केले. मात्र, त्यांच्या या नियमाला बीडच्या विविध संस्थाचालकांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे, माजलगाव तालुक्यातील वारोळा येथील आश्रमशाळेत आज दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. मात्र, सर्व कायदे धाब्यावर बसवून परिक्षार्थी विध्यार्थ्यांचे नातेवाईक खुलेआम कॉपी पुरवताना दिसत आहे. कॉपी मुक्तीचा नारा जिल्हा प्रशासनाने दिला असला तरी संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी कॉपी सरासपणे सुरू आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलडाणा : जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा शहरासह काही ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मोताळा शहरासह तालुक्यातील डिडोळा, शेंबा या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या शेतातील गहु हरबरा पिकाला फटका बसलाय.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईच्या नायर रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला बाहेरून साहित्य आणायला सांगितलं जातं असून मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याच समोर येतंय. यावर शस्त्रक्रियेच्या साहित्यबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली असता नायर रुग्णलयाकडून टाळाटाळ केली जातीय. आता राज्य माहिती आयोगाने याबाबत 25 मार्चपर्यंत ही माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी साहित्याचा पुरवठा कमी असल्याने कोणत्याही प्रीस्क्रीपशन शिवाय साध्या कागदावर शस्त्रक्रियेसाठी साहित्य बाहेरून आणण्यासाठी काही हजार रुपये रुग्णाला स्वतः खर्च करावे लागताय. बीएमसी, राज्य सरकार जर यासाठी अनुदान देत असेल तर मग ही वेळ का येते? असा सवाल यावेळी उपस्थित होतोय. याबाबत नायर रुग्णालयात विचारलं असता आम्ही याबाबत माहिती लवकरच राज्य माहिती आयोगाला सादर करू असा म्हणणं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पालघर जिल्ह्याच्या किनारपट्ट्या म्हणजे पक्षी प्रेमी व निरीक्षकांसाठी मोठी पर्वणीच निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालघरमधील चिंचणी व वाढवण किनारपट्टी भागात वेगवेगळ्या परदेशी व स्थलांतरित मनमोहक पक्षांचे आगमन होत असून त्यांच्या परतीचा प्रवासही सुरू झालाय. मात्र, पक्षी निरीक्षकांनी या पक्षांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. आत्तापर्यंत गेल्या पंधरा दिवसांत निळी व काळी झाक असलेला नकेर, नारंगी रंगाची हरोळी, डोक्यावर काळी झाक व निळ्या रंगाचे पंख असलेला खंड्या तर आत्ता दुर्मिळ असलेला मनमोहक दिसणारा परदेशी पाहुणा पक्षी म्हणजे पल्लास गल हा पक्षी वाढवण किनारपट्टी भागात पाहायला मिळतो.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
ग्रामीण भागामध्ये आजही लग्न झाल्यानंतर रात्री वरात काढण्याची मोठी परंपरा आहे. मात्र, याच वरातीवर खर्च न करता जिल्हा परिषद शाळेतील 10 मुलींना सायकल घेऊन देण्याचा अभिनव उपक्रम आष्टी तालुक्यातील डोंगरगण जिल्हा परिषद शालेत पार पडला. शिक्षक शिवाजी परसराम कोल्हे यांनी महिला दिनाचं औचित्य साधून आणि आपल्या मुलाच्या लग्नातील खर्च टाळून शाळेतील दहा विद्यार्थिनींना सायकली दिल्या. विशेष म्हणजे नवरदेव-नवरीने शाळेत येऊन या मुलींना या सायकली भेट दिल्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
प्रत्येक गावात असलेल्या रेशन धान्य दुकानाचे विविध उपयोगी वस्तू विक्रीच्या दुकानात रुपांतर, राज्य सरकारच्या माध्यमातून स्वस्त धान्य विकण्याबरोबरच रेशन धान्य दुकानांमधून तांदळाच्या 11 जाती, गव्हाच्या चार जाती, खाद्यतेल, कडधान्ये, भाजीपाला, प्रमाणित बियाणे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, आरे ब्रँडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ, नोगा, खादी ग्रामोद्योग कोल्हापूर यांची उत्पादने, महाफार्म या ब्रँड अंतर्गत उत्पादित होणारी उत्पादने, स्टेशनरी व शालेय उपयोगी साहित्य विक्रीला परवानगी, रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे आणि रास्तभाव दुकानातून लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत होणाऱ्या विविध गृहपयोगी वस्तूंची विक्री वाढ हवी म्हणून हा निर्णय घेण्यात आला

मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडून शॅडो कॅबिनेटची घोषणा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
येत्या एप्रिलमध्ये नवी मुंबईत महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यात उत्तम कामगिरी करुन आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया : बाळा नांदगावकर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गेल्या 14 वर्षात पक्षाला वाढवण्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांने खूप मेहनत घेतली, यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचे मनापासून आभार : बाळा नांदगावकर
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 42 वर, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
येस बँकेच्या दिवळखोरीचा औरंगाबाद महापालिकेला फटका, शहर बस वाहतुकीचे 9 कोटी येस बँकेत अडकले, शहर बस वाहतुकीचे पैसे येस बँकेत जमा व्हायचे, शहर बस वाहतुकीचे पैसे अडकल्याने महापालिका अडचणीत, शहर बस वाहतुकीवर होणार परिणाम
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिकच्या मखमलाबाद परिसरात अज्ञातांकडून गोळीबार, एकजण जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 1200 अंकानी घसरला, निफ्टीही 350 अंकांनी खाली, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोरोना व्हायरसमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ऐतिहासिक घसरण, कच्च्या तेलाच्या किमतीत 20 टक्क्यांची घसरण, भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मध्यरात्री सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतातील कापून टाकलेले गहू, ज्वारी काढणीला आलेला हरभरा कापूस यासह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास वसमत तालुका आणि जिल्ह्यातील काही भागात पाऊस

- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- LIVE UPDATES | पुण्यात कोरोनाचे दोन रूग्ण पॉझिटिव्ह