मुख्यमंत्री ठाकरे यांचा ड्रायव्हर दिनकर साळवे निलंबित, विनयभंग प्रकरणी धमकावल्याचा आरोप
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
09 Jan 2020 06:07 PM
पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंग प्रकरणात नवी तक्रार पुढे आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी गाडीवर चालक असलेले कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांनी धमकी दिल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी केलीय. आता साळवेला निलंबितही करण्यात आलंय.दरम्यान, विनयभंगाची तक्रार कऱणारी मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी असलेल्या गडचांदूर नगरपरिषदेसाठी आज मतदान शांततेत पार पडले. नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक पदांसाठी सुमारे 50 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी 7.30 वाजेपासून शहरातील 31 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. मात्र मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. राज्यातील राजकीय बदलानंतर ही नगरपरिषद निवडणूक होत आहे. त्यामुळे याचे वेगळे महत्त्व आहे.
सारथी संस्थेसाठी, मराठा तरुणांसाठी आता स्वतः खासदार संभाजीराजे उपोषणाला बसणार,
ट्विट करून संभाजीराजे यांनी दिली माहिती
,
11 तारखेला पुणे येथील कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्ते उपोषणाला बसणार
डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टानं फेटाळला, हायकोर्टात अपील करण्यासाठी कोणताही दिलासा नाही
डीआयजी निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण, पनवेल कोर्ट थोड्याच वेळात सुनावणार फैसला, पुढील तपासासाठी डिआयजी मोरेंची अटक आवश्यक असल्याची तपास अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती, परिचयातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा मोरेंवर आरोप
महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका नाशिकच्या सिडको परिसरातील तीनशेहून अधिक नागरिकांना बसला आहे. अचानक विजेचा दाब वाढल्याने सिडकोच्या उत्तमनगर परिसरातील तीनशेहून अधिक लोकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, सेट ऑप बॉक्स, मिक्सरसह अनेक उपकरणे जळाली आहेत. सकाळी अचानक या उपकरणांमध्ये स्फोट होऊन धूर निघू लागलाच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि त्यांनी घराबाहेर पळ काढला. एक एक करता जवळपास या परिसरातील सगळ्यांचेच नुकसान झाल्याचे लक्षात येताच या संतप्त नागरिकांनी थेट सिडको विभागाच्या महावितरण कार्यालयावर धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी येथे झाली नसून आम्हाला महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
मंदी आली म्हणून रडत बसलो तर लढू शकणार नाही : उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांना कर्जमुक्त नाही तर चिंतामुक्तही करायचं आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
गँगस्टर एजाज लकडावाला अटकेत, मुंबई पोलिसांची कारवाई, न्यायालयाकडून लकडावालाला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
औरंगाबाद-पैठण रोडवर इसारवाडीजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर धडक, अपघातात 3 जणांचा मृत्यू
Live Update | माजी भाजपनेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गांधी शांतता मार्च यात्रेचं आयोजन, यात्रेला शरद पवार, प्रकाश आंबेडकर, नवाब मलिक, पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती
महात्मा गांधी यांच्या विचारावर चालण्याची गरज, नव्या कायद्यांमुळे देशाच्या एकतेला धोका : शरद पवार
संघ विचारांच्या कुलगुरु आणि प्र कुलगरुंच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांची मागणी, जेएनयूमध्ये संघाच्या विचाराचे कुलगुरु असल्याने तिथे काय झालं हे पाहिलंय, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून मागणी करणार असल्याचं आशिष देशमुखांची माहिती
मध्य रेल्वेची कसारा-कल्याण वाहतूक ठप्प झाली आहे. टिटवाळा-खडवली दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने अनेक लोकल वासिंद, खडवली, आसनगाव स्थानकात रखडल्या आहेत. सकाळी गर्दीच्या वेळीच प्रवाशांचा झाला खोळंबा झाला आहे.
अमेरिका-इराण यांच्यातील तणावामुळे मुंबईहून युरोप व अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांना 30 ते 40 मिनिटांचा फेरा वाढणार, टोरोन्टो, न्यूयॉर्क, झुरीच (स्वित्झर्लंड), म्युनिक, पॅरिस, लंडन, अॅमस्टरडॅम, कैरो, फ्रॅन्फफर्ट, सेशेल्स, इस्तंबुल व नैरोबी या शहरांसाठीच्या सुमारे 20 उड्डाणांचा समावेश
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर
1. नागपूर झेडपी निवडणुकीत भाजपचं पानीपत, फडणवीस, गडकरींना मोठा धक्का, तर धुळ्यात भाजपकडून काँग्रेसचा सुपडा साफ, कार्यकर्त्यांची जेसीबीतून गुलालाची उधळण
2. नंदुरबारमध्ये भाजप शिवसेना युती होणार, स्थानिक शिवसेना नेत्यांचे संकेत, तर वाशिम, पालघर झेडपीत त्रिशंकू स्थिती, अकोल्यात आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष
3. राज ठाकरे आणि भाजपच्या संभाव्य युतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मध्यस्थी असल्याची चर्चा, पुण्यात राज यांनी संघ पदाधिकाऱ्यांशी भेट घेतल्याची माहिती
4. चार दिवसांपासून मंत्री विजय वडेट्टीवार नॉट रिचेबल, काँग्रेस नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडून खात्यात बदलाचे आश्वासन, अजितदादांची माहिती
5. चंद्रपूर आणि यवतमाळच्या काही भागात पुन्हा गारपीट, रब्बी पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
6. इराणवर आर्थिक निर्बंध आणणार, इराणविरोधात चीन, जर्मनी, रशियाला एकत्र येण्याचं डॉनल्ड ट्रम्प यांचं आवाहन, इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ न देण्याचाही इशारा