LIVE BLOG | काँग्रेसच्या आमदारांना जयपूरला हलवण्यात येण्याची शक्यता
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
आज दुपारपर्यंत युतीचा तिढा सुटण्याची शक्यता, मातोश्रीवरील बैठकीत अंतिम निर्णय होणार, शिवसेना आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये व्यवस्था
मुख्यमंत्र्यांच्या वतीने चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आज राज्यपालांना भेटणार, भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, पक्षसंघटनेत मोठे बदल करण्याचेही संकेत
काँग्रेस नेते आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चेची शक्यता, काल हुसेन दलवाईंकडून संजय राऊतांची भेट
बिगर भाजप सरकार ही काँग्रेसजनांची इच्छा, अशोक चव्हाणांचं मोठं विधान, काँग्रेसचा एक गट सेनेला पाठींबा देण्याच्या तयारीत
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास शिवसेना जबाबदार नाही, भाजपला इशारा, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याची मुनगंटीवार गोड बातमी देतील, राऊतांचं खोचक विधान
अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात हायअलर्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शांतता राखण्याचं आवाहन, कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करण्याचीही विनंती
रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लावण्यासाठी 25 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा, बांधकाम क्षेत्राला आलेली मरगळ झटकण्यासाठी केंद्राचं पाऊल
अरबी समुद्रातील माहा चक्रीवादळाचा कोकणसह, पालघर, वसई-विरारला सतर्कतेचा इशारा, रत्नागिरीतल्या बंदरावर बोटींना आश्रय, समुद्र किनाऱ्यांवर यंत्रणा सज्ज
चंद्रपूर जिल्ह्यातील नदीत अडकलेल्या वाघाचा मृत्यू, बचावकार्य अर्धवट थांबवल्यानं जायबंदी वाघ दगावला, वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
भारत-बांगलादेशदरम्यान आज राजकोटमध्ये दुसरा ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना, मालिकेत आव्हान राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक, सामन्यावर माहा चक्रीवादळाचं सावट
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -