LIVE UPDATES | पलंगावरून पडून चिमुकलीचा मृत्यू; दुःख सहन न झाल्याने आईची आत्महत्या
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
08 Mar 2020 11:19 PM
भिवंडी : विदेशातून आणलेले मास्क धुवून विक्री प्रकरणात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कलम 269 संसर्गजन्य रोग पसरविणे या कलमाअंतर्गत इमरान शेख नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, उघड्यावर फेकून देण्यात आलेले सर्व मास्क एकत्र करून ते सर्व मास्क जैव वैद्यकीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पॉल्युशन बोर्डच्या ताब्यात, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट
घरात पलंगावरून पडुन पाच महिन्याच्या चिमुकलीचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याचे दुःख सहन न झालेल्या तीस वर्षीय आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना परभणीच्या पालम तालुक्यातील डिग्रस येथे घडली. या घटनेमुळे अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील फरकंडा येथील दिलेल्या संगीता प्रल्हाद पोळ या आपल्या 5 महिन्याच्या मुलीसह मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या माहेरी डिग्रस येथे राहत होत्या. त्यांची चिमुकली अदविका ही खेळत असताना थेट पलंगावरून खाली पडली आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे धक्का बसलेल्या संगीता पोळ यांनी घरी रात्री सगळे झोपल्यावर गळफास लावून स्वतःला ही संपवले. सकाळी संगीता यांचे वडील उठल्यानंतर त्यांना ही घटना कळली. दरम्यान या घटनेमुळे डिग्रस गावावर शोककळा पसरली असून पालम पोलिसात या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
भिवंडी : विदेशातून आणलेले मास्क धुऊन विक्री करण्यात येणार असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणांमध्ये नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. कलम 269 संसर्गजन्य रोग पसरविणे या कलमा अंतर्गत इमरान शेख नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उघड्यावर फेकून देण्यात आलेले सर्व मास्क एकत्र करून ते सर्व मास्क जैववैद्यकीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पॉल्युशन बोर्डच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नाशिक : आंघोळीसाठी गरम पाणी दिल्याने नवरा बायकोचे भांडण. भांडणाचा राग आल्याने मुलाची वडिलांना लाकडाने मारहाण. वडिलांची नाशिक येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू. शिवाजी जठार, असे मृत वडिलांचे नाव. येवला तालुक्यातील नागरसुल शिवारातील वाईबोथी येथील घटना.
कोल्हापूर ब्रेकींग : उसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू. राधानगरी तालुक्यातील तुरंबे-कासारवाडा येथील घटना. बाळासो बलुगडे असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आग विझवण्याचा प्रयत्न करताना आगीतच सापडले.
राज्यातील विविध भागांमध्ये मागच्या काही दिवसांपासून वातावरणात कायम बदल दिसून येतोय. आजही दिवसभर कडक ऊन पडल्यानंतर परभणीत सायंकाळच्या वेळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे दिवसा गरम आणि रात्री थंड वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे मराठवाड्यामध्ये 10 व 11 मार्च रोजी तुरळक पाऊस पडण्याचा इशारा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे. त्यामुळे ऐन गहू,हरभरा काढणीच्या वेळी हा पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडण्याची शक्यता.
उसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू, राधानगरी तालुक्यातील तुरंबे-कासारवाडा येथील घटना, बाळासो बलुगडे असं मृत शेतकऱ्याचे नाव,
आग विझवण्याचा प्रयत्न करताना आगीतच सापडले
नांदेड : अधिग्रहित जमिनीचा मावेजा मिळवून देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाचेची मागणी करणारा खाजगी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद, पडताळणीत लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने किशोर शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल( पैसे स्वीकारले नाहीत फक्त मागणी केली म्हणून गुन्हा )नांदेड एसीबीची कारवाई.
उसाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू, राधानगरी तालुक्यातील तुरंबे-कासारवाडा येथील घटना, बाळासो बलुगडे असं मृत शेतकऱ्याचे नाव,
आग विझवण्याचा प्रयत्न करताना आगीतच सापडले
जालना येथे स्टील कंपनीमध्ये वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने मयत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 11 लाखांची मदत कंपनी व्यवस्थापनाने जाहीर केली आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसास कायमस्वरूपी नोकरी देण्याचे देखील आश्वासन देण्यात आलय. दुर्घटना झालेल्या ओम साई राम कंपनी व्यवस्थापनाने एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिलीय. दोन दिवसापूर्वी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा बळी गेलाय, तर 3 जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत,
अभिनेते सयाजी शिंदे यांनी रविवारी संध्याकाळी पुण्यातील कात्रजच्या टेकडीवर पेटलेला वनवा यशस्वीपणे विझवला. सयाजी शिंदे त्यांच्या मित्रांसह संध्याकाळी पुण्याहून सातारच्या दिशेने निघाले होते. तिथे त्यांना अजित पवारांसह एका कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. परंतु कात्रजच्या नवीन बोगद्याच्या वरती असलेल्या टेकडीवर मोठा वनवा पेटल्याच त्यांनी पाहिलं. वनवा समोरच्या टेकड्यांच्या दिशेने पुढं सरकत होता. त्यामुळे तो लगेच विझवनं गरजेचं होतं. सयाजी शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी वनवा वाझवण्याच धाडस केलं आणि त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे दोन डोंगर वाचल्याच शिंदे यांनी म्हटलय.
हिंगोली : मागील काही वर्षांपासून महिलांच्या आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. काही केल्या महिलांच्या आत्महत्या थांबता थांबत नाहीयेत. आज जागतिक महिला दिन आणि महिला दिनाच्या दिवशीच हिंगोली मधल्या सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उमा अंकुश लांभाडे(वय 32)वर्ष असं मयत महिलेचं नाव आहे. या महिलेने राहत्या घरामध्ये पंख्याला साडीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. हे प्रकरण आता शेनगाव पोलिसात दाखल झाल आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि नायगाव तालुक्यात अचानक विजेच्या कडकडाटासह 10 मिनिटं जोरदार पावसाची हजेरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या चौदावा वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर आज कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी उद्या होणार्या वर्धापन दिना बरोबरच शॅडो कॅबिनेट संदर्भात काही महत्वाच्या सूचना या वेळी दिल्या आहेत. यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन मुंबईबाहेर म्हणजेच नवी मुंबई इथं पार पडत आहे. यासंदर्भात देखिल चर्चा करण्यात आली. या बैठकीला नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर , अमेय खोपकर, संदीप देशपांडे यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी आणि काही निवडक कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते.
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पुन्हा एक कोरोना संशयित रुग्ण दाखल, न्यूझीलंडहून 29 तारखेला भारतात परतला होता, मूळचा नवी मुंबईच्या वाशीतील रहिवासी, सर्दी आणि घसा दुःखीचा त्रास जाणवत असल्याने रुग्णलायत केले दाखल
मुंबई : मिलिंद एकबोटे राज ठाकरे यांच्या भेटीला, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 24 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमाचं दिलं निमंत्रण, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीतर्फे निमंत्रण
केरळमध्ये कोरोनाचे आणखी पाच रुग्ण आढळले, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 39 वर, बाधित पाच जणांमध्ये एका मुलाचाही समावेश
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टी-20 विश्वचषक फायनल, ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय
मनसेचा उद्या वर्धापन दिन, उद्याच्या नवी मुंबईतील कार्यक्रमात मनसेकडून शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची शक्यता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार कार्यकर्त्यांना संबोधित
तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. सांडपाण्यावर अपेक्षित प्रक्रिया होत नसल्याने २५ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील उखळू-अंबाईवाडा येथे विनापरवाना गौण खनिज उत्खनन सुरू असताना महसूल विभागाची धाड, जेसीबी, पोकलॅन आणि नऊ डंपर अशी सुमारे दीड कोटी रुपयांची वाहने जप्त, शाहूवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली फरारी पथकाची कारवाई
विरारमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या नालासोपारा युनिटच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्या गाडीवर गोळीबार, आरोपी फरार
येस बँक गैरव्यवहार प्रकरणी अखेर राणा कपूर यांना अटक, ईडीकडून 31 तास चौकशी
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. येस बँक गैरव्यवहार प्रकरणी अखेर राणा कपूर यांना अटक, ईडीकडून 31 तास चौकशी, येस बँकेमुळे राज्यातल्या तब्बल 109 बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प
2. भारतातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 34 वर, उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाच्या सूचना
3. परदेशातले वापरलेले मास्क धुवून विक्री, भिवंडीतला व्हायरल व्हीडिओ समोर, चौकशी करण्याचं पोलिसांचं आरोग्य विभागाला पत्र
4. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, अयोध्यावारीत उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण, मंदिरनिर्मितीसाठी एक कोटीच्या मदतीची घोषणा
5. नवी मुंबईत रोहित पवारांची महारॅली, वाशी ते कोपरखैरणेमध्ये बाईक रॅली, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचं शक्तिप्रदर्शन
6. हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाला महिलादिनी नवा इतिहास घडवण्याची संधी, टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आज भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी