LIVE UPDATES | तर, एक स्वयंसेवक संपूर्ण संघसृष्टी पुन्हा निर्माण करेल : मोहन भागवत
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
07 Mar 2020 11:02 PM
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामनगर उच्चभ्रू वस्तीत हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली. दारूबंदीनंतर पहिल्यांदाच हुक्का पार्लरवर धडक कारवाई करण्यात आलीय. यात बड्या घरची 14 मुलं पोलिसांनी ताब्यात घेतलीय. डझनभर हुक्का पॉट, प्रतिबंधित तंबाखू, फ्लेवर्स आदी मोठी सामुग्री जप्त करण्यात आलीय. दाताळा मार्गावरील गोल्डन रेस्टॉरंटचा मालक देखील ताब्यात घेण्यात आलाय. दारूबंदी आधी हे हॉटेल बार होते. रामनगर पोलिसांनी ही कारवाई केलीय.
उद्या जर काही कारणाने संघाचा फक्त एकच स्वयंसेवक उरला आणि इतर सर्व स्वयंसेवक अदृश्य झाले, नाहीसे झाले. तरी तोच एक स्वयंसेवक संपूर्ण संघसृष्टी पुन्हा निर्माण करेल. कारण तुम्ही संघ आणि त्याच्या स्वयंसेवकाला एकमेकांपासून वेगळे करू शकत नसल्याचे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. ते आज नागपुरात संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या शतक शुभेच्छा समारंभात बोलत होते.
धुळे : अर्ध्या तासापासून वाजणारा बँकेचा सायरन पोलिसाने शटरला लाथ मारताच बंद झाला. नेहमीच वेळीअवेळी हा सायरन वाजत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. धुळे शहरातील जे बी रोडवरील विजया बँक शाखेतील घटना.
शिर्डी : दोन शाळकरी मुलींचा पाझरतलावात बुडून मृत्यू. अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील दुर्देवी घटना. शेळ्या चारण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. सुवर्णा शेंगाळ( वय 13 )आणि कोमल अस्वले(वय 15 )असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. तर तिसरी शाळकरी मुलगी शुभांगी शेंगाळ वाचली. शुभांगीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली.
अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे असे विधान मी कधीच केलं नाही. पण ज्यांना ब्रेकिंग न्यूज द्यायच्या आहेत ते जाणीवपूर्वक आपल्या आणि ब्राह्मण समाजाविरुद्ध द्वेष वाढेल अशा पद्धतीने बातम्या देतात. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर लोक मला दुसरी बाजू न विचारताच त्यावर रिअॅक्शनही देतात हे अधिक क्लेशकारक आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते हे शरद पोंक्षे यांनी केलंय.
अकोल्यातील बाभूळगावच्या शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज चर्चा होतीय ती 'इंद्रो'ची. आज या 'इंद्रो'ला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होतीय. हा 'इंद्रो' म्हणजे भारताचा पहिला 'हुमोनॉइड रोबोट'. म्हणजेच माणसासारखा कृतीशील यंत्रमानव. मुंबईतील मराठमोळ्या संतोष हूलावले या तरूणानं तब्बल सतरा वर्षांच्या मेहनतीनंतर 'इंद्रो'ची निर्मिती केलीय. आज शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्नॉब्लिट्झ 2020 अंतर्गत 'इंद्रो'ला आणण्यात आलं होतंय. या रोबोटला पाहण्यासाठी आणि त्याच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होतीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अयोध्या दौऱ्यावर काँग्रेसचे मंत्री सुनील केदारे हे देखील गेले आहेत. या बाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना विचारले असता तो त्यांचा श्रद्धेचा भाग आहे, केदार यांची रामावर श्रद्धा असेल माझी संविधांवर, देशावर आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
औरंगाबाद जालना रोडवर धूत हॉस्पिटल समोर अपघात. भरधाव ट्रकने तीन महिलांना उडवलं. दोन महिला जागीच ठार, तर एक गंभीर जखमी. लग्नसमारंभासाठी या महिला रस्त्याने जात असताना हा अपघात घडला.
नागपूर : दिघोरी पुलाजवळ इम्रान सिद्दकी नावाच्या तरुणावर एक्टीव्हाने आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार. इम्रानला दोन गोळ्या लागल्या असून त्याला गंभीररित्या जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे. रफिक नावाच्या गुंडाने गोळ्या चालवल्याची प्राथमिक माहिती. गुन्हेगारांमधील संपत्तीच्या वादातून हल्ला झाल्याची शक्यता.
माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नासाठी सर्व वरिष्ठ आधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची खासदार रणजीत निंबाळकर यांनी बैठक घेतली. पंढरपूर फलटण मार्गाला बारामतीकरांकडे लक्ष न देता निधी देण्याचे आवाहन खासदार निंबाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलंय.
नाशिक : मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे पिकांना पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाने मारले होते. आता तर या महावितरणाच्या गलथान कारभारामुळे पाणी असून देखील पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने गेल्या महिन्याभरापासून अनेक निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होताना दिसत नसल्याने तोंडाशी आलेल्या घासाला मुकावे लागत असल्याने वैतागून मुंगसे येथील शेतकऱ्यांनी शेवटी हतबल होऊन येथील कार्यालयालयातील कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. अखेर मालेगाव येथून वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर टाळे उघडण्यात आले.
कोरोनामुळं आयपीएल पुढे ढकलण्यासंदर्भात चाचपणी सुरू, आरोग्यमंत्र्यांची माहिती, तर उपाययोजनांसह नियोजित वेळेनुसार आयपीएल खेळवण्यावर गांगुली ठाम
वर्धा : स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्याचा उपक्रम सावंगी इथल्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं राबविण्यात आला. यावेळी 75 महिलांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला. डम्पिंग यार्डमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला गेला. त्यांना आरोग्यविषयक काळजी घेण्याबाबत प्रशिक्षणही देण्यात आलं. या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची संकल्प रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला.
सिंधुदुर्ग : महिला व मुले यांच्यावर होणारे अत्याचार व शोषणाच्या विरोधात सीटू संलग्नित आशा वर्कर्स युनियनने ओरोस येथे जेलभरो आंदोलन केले. अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन करण्याची मागणी करीत त्या महामार्गावर उतरल्या. पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सने केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाला आक्षेप घेतला आहे. महिलांना सन्मान अधिकार, समान वेतन, किमान वेतन, यासह महिलांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. असा आरोप करीत या विरोधात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय सीटूच्या 16 व्या अखिल भारतीय अधिवेशनात घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्य़ात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सीटू संलग्नित आशा वर्कर्स युनियनने ओरोस येथील रवळनाथ मंदिरसमोरील मुंबई-गोवा महामार्गावर जेलभरो आंदोलन केले.
नाशिक : दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या ऑडिटरने येस बँकेतले पैसे काढावे अशी सूचना केली होती. मात्र, ऑडिटरच्या सूचना डावलून तत्कालीन आयुक्तांनी पैसे काढले नाहीत. महापालिकेचे 300 कोटींपेक्षा जास्त पैसे येस बँकेत अडकलेत. तत्कालीन अधिकारी आणि आयुक्तांच्या चौकशीची मागणी.
उस्मानाबाद : हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी यांचा 715 वा वार्षिक उरुस रद्द. धार्मिक कार्यक्रम होणार, मात्र सांस्कृतिक व जत्रा होणार नाही - जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ. वक्फ बोर्ड, जिल्हाधिकारी व मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधी बैठकीत निर्णय
नाशिक महापालिकेने येस बँकेतले पैसे काढावे अशी सूचना दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या ऑडिटरने केली होती, ऑडिटरच्या सूचना डावलून तत्कालीन आयुक्तांनी ठेवले येस बँकेत पैसे, महापालिकेचे 300 कोटींपेक्षा जास्त पैसे अडकलेत येस बँकेत, तत्कालीन अधिकारी आणि आयुक्तांच्या चौकशीची मागणी
पुण्यात एक वर्षात मुलींचा जन्मदर घसरला, जन्मदारात दर हजारी 23 ने घसरणं, विवेक वेलणकर यांना माहिती अधिकारात मिळाली माहिती, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2016 ते 2019 या कालावधीत जन्मदर घटल्याचं स्पष्ट, वर्ष 2016 मध्ये हजारी 932 असणारा मुलींचा जन्मदर 2017 मध्ये 926 होता. जन्मदर 2018 मधे 927 पर्यंत आला, हाच दर वर्ष 2019 या एकाच वर्षात 904 पर्यंत खाली घसरला आहे.
मुंबई : येस बँकचे माजी सीईओ राणा कपूर यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचनालयाच्या कार्यालयात नेलं, 12 तास घरी चौकशीनंतर राणा कपूर यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं
कोरोना भितीने पाचगणीतील अनेक शाळा भयभित, काही शाळांना आज पासून सुट्टी तर काहींनी शाळांना लवकर जाहीर केली सुट्टी, सुट्टीवरून परतताना विद्यार्थी कसे असतील याची शिक्षकांना भिती, बहुतांशी विद्यार्थ्यांचे पालक नोकरीसाठी परदेशात, सुट्टीसाठी अनेक विद्यार्थी जाणार परदेशात, परदेशातून परतल्यावर विद्यार्थ्यांची तपासणी नेमकी कशी करायची या बद्दल शाळा प्रशासन टेंशनमध्ये आहे.
राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील, मुकुल वासनिक, राजीव सातव यांची नावं चर्चेत, 9 मार्च रोजी बाळासाहेब थोरात दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार, त्यानंतर राज्यसभेसाठी नाव अंतिम होणार
नवी दिल्ली : भाजपचे राज्यातील नेते आज अमित शाहांना भेटणार, राज्यसभेच्या जागांसंदर्भात भाजपचं चित्र स्पष्ट होणार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार घेणार अमित शाहांची भेट, उदयनराजे, रामदास आठवले यांच्यासह एकनाथ खडसे यांच्या नावाचीही चर्चा
रत्नागिरी : 9 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत जिल्हा परिषद शिक्षकाचे अश्लील चाळे, गुहागर पोलीस स्टेशनमध्ये शिक्षक उदय वेल्हाळवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल, गुहागरमधील जानवळे येथील जिल्हा परिषदच्या शाळेतला धक्कादायक प्रकार, नराधम शिक्षकाला युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शोधून चोपलं आणि पोलिसांच्या हवाली दिलं
अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना पुण्याचा यशवंतराव चव्हाण कला गौरव पुरस्कार जाहीर
वर्धा : कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता महावितरण कार्यालयात बायोमेट्रिक बंद, पुढील आदेशापर्यंत बायोमेट्रिक हजेरी बंद ठेवण्याचे आदेश, अधिकारी-कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून महावितरणची खबरदारी
येस बँकेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे 3 कोटी अडकले, पाच दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेने 19 कोटी केडीसीसी बँकेत वर्ग केले होते, अन्यथा ही रक्कम 22 कोटी असती
येस बँकेंचे संचालक राणा कपूर यांच्या घरावर ईडीची धाड, राणा कपूर यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी, कपूर देश सोडून जाऊ शकत नाहीत
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्याला हिंदू महासभेचा विरोध, तर मंदिर निर्मितीत हातभार लावण्यासाठी शिवसेनेचं काँग्रेस, राष्ट्रवादीला आवाहन
2. YES बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्यावर गुन्हा दाखल, तर कपूर यांच्या वरळीतल्या घरी ईडीचे अधिकारी दाखल, नागपूर विद्यापीठ आणि पिंपरी महापालिकेचे पैसेही बँकेत अडकले
3. राज्यसभेसाठी राज्य भाजप कार्यकारिणीकडून एकनाथ खडसे यांच्या नावाचा आग्रह, उदयनराजे भोसले, रामदास आठवलेंसह खडसेही राज्यसभेवर जाण्याची शक्यता
4. जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनच होणार, अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचा निर्णय, शिक्षकांना दिलासा
5. सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक, प्रतितोळा सोन्याचा दर 45 हजारांच्या पार, कोरोना व्हायरस आणि लग्नसराईमुळे सोन्याचे दर वाढले