LIVE UPDATES | अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरतीत उद्धव ठाकरे सहभागी होणार नाही : सूत्र
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
06 Mar 2020 01:59 PM
एबीपी माझा इम्पॅक्ट, एबीपी माझाने एन 95 मास्कचा काळाबाजार उघडकीस आणल्यानंतर
राज्याच्या अन्न व प्रशासन आयुक्त यांनी परिपत्रक काढून राज्यातील एन 95 मास्क जादा किंमतीने विकणाऱ्या, एन 95 मास्क विक्रीसाठी काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे
सेन्सेक्समधे 1300 अंकांची घसऱण, निफ्टीमधेही 400 पेक्षा जास्त अंकांनी पडला, डॉलरच्या तुलनेत रुपयामधे घसरण, एका डॉलरची किंमत 74 रुपयांवर, येस बँकेचा शेअर 25 टक्क्यांनी पडला तर एसबीआयच्या शेअर्सचा भाव 10 टक्क्यांनी पडला
अयोध्या दौऱ्यात शरयुच्या आरतीमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उत्तर प्रदेश सरकारचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन
पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा घाटात अपघात झालाय. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झालाय, तर 10 जण जखमी झाले आहेत. खंडाळा घाटातील एस आकाराच्या वळणावर उलटल्याने ट्रकचा अपघात झालाय. या अपघातात तमिळनाडूतील तीन मजुरांचा मृत्यू झालाय, तर 10 जण जखमी झालेत. अपघातस्थळी पोहचून पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णालयात स्थलांतरित केलंय.
मुंबईत सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम सुरु असल्याने 5 मार्च ते 9 मार्च रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक ठेवण्यात आले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे महत्त्व लक्षात घेता, आठवड्यातील केवळ चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येईल. एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे, वाहनचालकांची गैरसोय होणार नाही यासाठी एप्रिलअखेर पर्यंत काम पूर्ण होईल.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी दुर्घटना टळली, अपघातग्रस्त खाजगी बस आणि बचाव कार्यातील अॅवम्ब्युलन्सला ट्रकची धडक, प्रवाश्यांना सुरक्षित स्थळी उपस्थित केल्याने मोठी दुर्घटना टळली. पहाटे सहा वाजता एका खाजगी बसने अज्ञात वाहनाला धडक दिली होती. या अपघाताचं बचावकार्य सुरु असतानाच मागून आलेल्या ट्रकने अपघातग्रस्त बस आणि अॅहम्ब्युलन्सला जोराची धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी दुर्घटना टळली, अपघातग्रस्त खाजगी बस आणि बचाव कार्यातील अॅवम्ब्युलन्सला ट्रकची धडक, प्रवाश्यांना सुरक्षित स्थळी उपस्थित केल्याने मोठी दुर्घटना टळली. पहाटे सहा वाजता एका खाजगी बसने अज्ञात वाहनाला धडक दिली होती. या अपघाताचं बचावकार्य सुरु असतानाच मागून आलेल्या ट्रकने अपघातग्रस्त बस आणि अॅहम्ब्युलन्सला जोराची धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. विधीमंडळात सकाळी 11 वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान काल (5 मार्च) राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. यानुसार राज्याचा जीडीपी 5.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मार्च महिन्याची 5 तारीख उलटूनही ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे पगार झाले नव्हते. या संदर्भात 'एबीपी माझा'ने बातमी दाखवली. त्या बातमीनंतर लगेच दुपारपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात आले. त्यामुळे महानगरपालिकेत आनंदाचे वातावरणात होते. ठाणे महानगरपालिकेत एकूण 7 हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. मात्र दर महिन्याला 1 तारखेला होणारा पगार 5 तारीख उलटली तरी झाला नव्हता, म्हणून सर्व कर्मचारी चिंतेत होते. अनेकांचे तर कर्जाचे हफ्ते देखील चुकले. तर अनेकांची देणी रखडली. त्यामुळे सर्व कर्मचारी वर्ग चिंतेत होता. मात्र एबीपी माझाने दाखवलेल्या बातमी नंतर प्रशासनाला जाग आली. आणि लागलीच सर्व पगार त्यांनी दिले. महानगरपालिकेने मार्च महिना असल्याने आयकर कपातीचे कारण यासाठी दिले. त्यामुळे पगार देण्यास उशीर झाल्याचे मान्य केले आहे.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प, सकाळी 11 वाजता अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार
2. आरबीआयच्या परवानगीशिवाय येस बँकेतून 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर निर्बंध, बँकेला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी केंद्राचं एसबीआय आणि एलआयसीला साकडं
3. नाशकात कोरोनाचा चौथा संशयित रुग्ण, देशभरात 30 जणांना कोरोनाची लागण, खबरदारी म्हणून त्र्यंबकेश्वर, अंबाबाई मंदिरात उपाययोजन
4. मिशन मुंबईच्या पहिल्याच रणनितीत भाजप फसली, विरोधी पक्षनेते पदाचा दावा महापौरांनी फेटाळला, भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत
5. सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिक बँकेत वळवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना हायकोर्टाची नोटीस, उत्तरासाठी आठ आठवड्यांचा अवधी
6. वारंवार गोळीबार करुन शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैनिकांनी धडा शिकवला, कुपवाड्याजवळच्या चौक्या उद्ध्वस्त