= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वर्धा : कर्जमुक्त शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी पैशांची मागणी, शेतकऱ्याकडून 100 रुपयाची मागणी करण्याचा व्हिडीओ व्हायरल, प्रशासनाकडेही पोहोचला व्हायरल व्हिडीओ, प्रकरणाची चौकशी सुरू, अल्लीपूर येथील आपले सरकार केंद्र येथील प्रकार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भावेर्यात अडकलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या विरोधातीव बलात्काराचा गुन्हा रद्द करा अशी विनंती करत त्यांनी ही याचिका दाखल केली असून येत्या 9 मार्चला त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मीराभाईंदरमधून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर गेली अनेक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भाजपच्याच एका नगरसेविकेने केला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
धामणगाव रेल्वे अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरण, दत्तापूरचे ठाणेदार राजेंद्र सोनोने यांना अखेर अटक
-
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे सहा जानेवारीला अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी मुलीच्या आईवडिलांनी थेट ठाणेदाराविरुद्ध पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. या प्रकरणी आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी केली असता यामध्ये ठाणेदार दोषी आढळल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह, पुणे येथील प्रयोगशाळेचा अहवाल, घसा खवखवणे खोकला येणे ही लक्षण दिसू लागल्याने सोमवारी सायंकाळी केले होते जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल, इराणहून परतल्याने खबरदारी म्हणून सुरू होते उपचार, यंत्रणांनी सोडला सुटकेचा निःश्वास
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दहावीचा पेपर फुटला नाही, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत राज पॅलेस इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेत एका 24 वर्षीय तरुणीची आत्महत्या, अंकिता माकोडे असं या तरुणीचं नाव
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानसभेत विरोधकांचा सभात्याग, 'शेतकऱ्यांबाबत ठोस उत्तर नाही, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली' असा आरोप करत सभात्याग
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती, झिरवाळ नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून आमदार, उपाध्यक्षपदी येणार आदिवासी आमदार, मंत्रीपदासाठीही झिरवाळ यांच्या नावाची होती चर्चा, महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला, मागील भाजप सरकारने उपाध्यक्षपद शिवसेनेला न देता रिक्त ठेवलं होतं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंजाब नॅशनल बँकेच्या हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामधील प्रमुख फरार आरोपी नीरव मोदीच्या दुर्मिळ महागड्या पेटिंग्जच्या लिलावाविरोधात त्याच्या मुलाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बुधवारी याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
हिंगोली : हिंगोलीत वाळू माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, पाच ट्रॅक्टर सह, एकूण 31 लाखांचा मुद्देमाल जप्त
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाता धक्का, निवडणूक शपथपत्रातील दोन गुन्हे लपवल्याप्रकरणीची पुनर्विचार याचिका फेटाळली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बीड : आठवीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार, एक महिन्यांपासून मुलगी होती बेपत्ता, जालना जिल्ह्यातील शाहगडमध्ये सापडली मुलगी, तीन आरोपींना अटक, पेठबीड पोलिसांत गुन्हा दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सारथी संस्थेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या समितीच्या अहवालात ताशेरे. किशोर राजे निंबाळकर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांच्या चौकशी समितीमध्ये सारथी समितीच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळून आल्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
LIVE : सीप्झ भागातील प्रकल्पग्रस्त महिला राज ठाकरेंना भेटीला, आरएनए बिल्डर आणि सीप्झमधील कंपन्यांमधील कॉन्फ्लिक्टसंदर्भात कंपन्यांमध्ये काम कऱणाऱ्या महिला राज ठाकरेंच्या भेटीला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दिल्ली हिंसाचारापूर्वीचा उमर खालिदचा व्हिडीओ व्हायरल, अमरावतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य, व्हिडीओ तपासून कारवाई करण्याचं पोलिसांचं आश्वासन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सारथी गैरव्यवहार प्रकरणाचा कुंटे समितीचा अहवाल १० दिवसांत येणार, दोषींवर तातडीनं कारवाई करणार, विजय वडेट्टीवारांची विधानपरिषदेत माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाणांविरोधात सुनेचा छळ केल्याचा आरोप, घरगुती हिंसाचार प्रकरणी विलेपार्ले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, विद्या चव्हाणांनी आरोप फेटाळले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपूर : मद्यपी नातवाने केला आजीचा खून, नागपुरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशनअंतर्गत मानवता नगरमधील काल मध्यरात्री नंतरची घटना, 20 वर्षीय नातू पोलिसांच्या ताब्यात
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईतल्या सरकारी रुग्णालयात 19 दिवसांपासून औषध पुरवठा बंद, थकबाकी राहिल्यानं औषध कंपन्यांचा निर्णय, रुग्णांचे हाल होण्याची भीती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान मोदींच्या ट्विटनंतर अमृता फडणवीस यांनीदेखील ट्वीट करुन सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत. नरेंद्र मोदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणार असल्याचे संकेत अमृता फडणवीस यांनी दिले आहेत. एखाद्या छोट्याशा निर्णयानं आपलं जीवन कायमचं बदलू शकतं असंही त्या म्हणाल्या आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाला रामराम ठोकणार असल्याचं दिसत आहे. तसं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारखे सोशल मीडियावरचे अकाऊटंस बंद करण्याचा विचार करतोय, असं मोदी यांनी ट्वीट केलं आहे. लवकरच तुम्हाला यासंदर्भात कळवेन असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान मोदींच्या ट्विटला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन उत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदीजी द्वेष सोडा, सोशल मीडिया नको, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या मनात द्वेष आहे, अशी टीका अनेक वेळा राहुल गांधी यांनी केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यभरातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा...!!! कारण आजपासून दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले आबेत. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी आहेत, तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थिनी आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रात किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणं आवश्यक असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं आहे. परीक्षा काळातल्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी राज्यात 273 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.