LIVE UPDATES | नोटाबंदीनंतर राज्यात 317 कारखान्यांना टाळे ; तर 14, 787 कामगारांना फटका

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Mar 2020 11:32 PM

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More

चौथ्या अखिल भारतीय प्रगणनेनुसार राज्यात 2017-18 या कालावधीत 317 कारखाने बंद झाले असून यामुळे 14 हजार 787 कामगार बाधित झाल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत एक तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. राज्यातील कारखाने बंद पडल्यामुळे लाखो कामगार बेरोजगार झाल्याबाबत काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 2017-18 या कालावधीत 50 पेक्षा अधिक कामगार असलेल्या 12 आस्थापनांमध्ये कामगारांनी संप केला. त्यापैकी 10 संपामध्ये तडजोड घडवून आणण्यात संबंधित यंत्रणेला यश आलं अशी माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली आहे. राज्यात उद्योगांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीनं बंद पडलेल्या औद्योगिक उपक्रमांच्या जमिनी मुक्त करण्याचं सरकारचं धोरण आहे, असं देसाई यांनी म्हटलं आहे.