Today's 11 December Top Headlines: नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याशिवाय आज हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सुखविंदर सिंह सुक्खू मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज जळगाव दूध संघाचा निकाल लागणार आहे, यासह आज दिवसभरात घडणाऱ्या विविध घडामोडीवर आमचं लक्ष असणार आहेत, याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ....


समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, नागपुरात मोदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम -
नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करतील. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल प्लाजा सुंदर फुलांनी सजवण्यात आला आहे... अवघ्या काही तासांनी पंतप्रधानांच्या हस्ते 55 हजार कोटी चा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे... समृद्धी महामार्गावर पंतप्रधानांच्या आगमन आणि उपस्थितीच्या वेळी या ठिकाणी काही वेळासाठी सर्वांनाच प्रवेश बंद राहणार आहे. लोकार्पणापूर्वी समृद्धी महामार्गावर खास लेजर शो...समृद्धीचा आरंभबिंदू म्हणजेच झिरो माईल्स 120 शारपी लाईट्स आणि 12 लेझर लाईट ने उजळून निघाला... नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावाजवळ समृद्धी महामार्गाचा आरंभबिंदू असून या ठिकाणी 18 एकरात प्रशस्त चौक उभारण्यात आला आहे... या चौकाची एक किलोमीटरची परिक्रमा असून याच ठिकाणी शनिवारी रात्री खास लेझर शो आयोजित करण्यात आला होता...प्रचंड विस्ताराच्या या चौकात लेझर लाइट्स मुळे समृद्धीचा सौंदर्य आणखीच वाढलं. 


पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील रु. 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. नागपुरातील नागरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी, नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण आणि नागपूर मेट्रो टप्पा II ची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांनीच जुलै 2017 मध्ये पायाभरणी केलेले एम्स नागपूर पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करणार आहेत. नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय वन हेल्थ संस्था , नागपूर आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान करणार  आहेत.       



पंतप्रधानांची गोवा भेट
पंतप्रधान गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज उद्घाटन करणार आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या विमानतळाच्या उभारणीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आला असून त्यात सौर उर्जा संयंत्रे, पर्यावरण स्नेही इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेच्या व्यवस्थेसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह अशा इतर अनेक सुविधांचा समावेश आहे. या विमानतळाच्या उभारणी कामात, त्रिमित मोनोलिथिक प्रीकास्ट इमारत, स्टॅबिलरॉड, रोबोमॅटिक हॉलो प्रीकास्ट भिंती, 5 जी तंत्रज्ञानाशी अनुरूप माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा अशा सर्वोत्तम दर्जाच्या विशेष तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. विमानतळाच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये, जगातील सर्वात मोठ्या विमानांच्या परिचालनाची क्षमता असणारी धावपट्टी, रात्रीच्या वेळी विमाने उभी करून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थेसह 14 पार्किंग बेज, सेल्फ-बॅगेज ड्रॉप सुविधा, अत्याधुनिक आणि स्वायत्त हवाई दिशादर्शन सुविधा इत्यादींसह अनेक सोयींचा समावेश आहे. त्याशिवाय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्घाटन देखील होणार आहे. तसेच ते 9 व्या जागतिक आयुर्वेद संमेलनाच्या समारोप प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील.



आज जळगाव जिल्हा दूध संघाचा निकाल- 
आज जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे, सकाळी आठ वाजता. शहरातील रिंग रोड वरील सत्यवलभ हॉल या ठिकाणी ही मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  


 गुरव समाज महाअधिवेशन -
सोलापूर- राष्ट्रीय गुरव समाजातर्फे गुरव समाज महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत इत्यादी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत, सकाळी ११ वाजता कार्यक्रम सुरु होईल. मुख्यमंत्री दुपारी ४ वाजता सहभागी होतील. 


मराठवाडा  संमेलनाचा दुसरा दिवस - 


जालना- मराठवाडा  संमेलनाचा दुसरा दिवस आहे. मराठवाड्यातील ‘राजकीय चित्र दशा आणि दिशा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजप नेत्या पंकजा मुंडे, अंबादास दानवे, राजेश टोपे यांच्या उपस्थितीत हा परिसंवाद होईल, दुपारी २ वाजता. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा होणार आहे, संध्याकाळी ६ वाजता


मेंदौस वादळाचा परिणाम-
 राज्यात येत्या 3,4 दिवसात काही ठिकाणी गडगडाटासह मध्यम ते हलका पाउस पडण्याची शक्यता आहे. तामीळनाडूला धडकलेल्या मेंदौसचक्रीवादळाच्या नंतरच्या प्रभावामुळे राज्याच्या काही भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आज सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे.


आज हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी- 
हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुक्खू आज शपथ घेणार आहेत. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अशोक गहलोत उपस्थित राहणार आहेत, दुपारी १२ वाजता.


शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा
मुंबई- यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान सोहळा या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असतील. या कार्यक्रमात कृषी, साहित्य, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना स्कॉलरशिप वितरण होईल, दुपारी १.३० वाजता 


 डे नाईट अश्व क्रीडा स्पर्धांचा थरार -


नंदूरबार- देशात पहिल्यांदाच डे नाईट अश्व क्रीडा स्पर्धांचा थरार रंगणार अजून चेतक फेस्टिवल समितीच्या वतीने यासाठी विशेष क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली आहे. या क्रीडांगणात हे सामने होणार असल्याने त्यासाठी देशभरातील  अश्व क्रीडा खेळणारे संघ सहभागी होणार आहे. १२ डिसेंबर पासून या स्पर्धांना सुरुवात होणार आहे.


नंदूरबार- सारंगखेडा येथील घोडेबाजार ज्याप्रमाणे घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे घोड्यांसाठी लागणाऱ्या साहित्यासाठीही सारंखेडा बाजाराची ओळख आहे. सारंखेडा घोड्यांच्या साज पासून घोड्यासाठी लागणारा लगाम  व इतर साहित्य मिळते. ते खरेदी करण्यासाठी राज्यासह पर राज्यातील घोडे मालक दाखल होतात.


अहमदनगर-  आज जागतिक पर्वत दिन आहे. या निमित्ताने अहमदनगरच्या ट्रेकयात्री ग्रुपच्या वतीने मांजरसुंभा गड येथे लहान मुलांसाठी ट्रेकचे आयोजन करण्यात आलंय, सकाळी ६ वाजता