यवतमाळ : यवताळमध्ये अवैधरित्या गर्भपात करत असल्याच्या माहितीवरुन एका रुग्णालयावर धाड टाकण्यात आली. या रुग्णालयातून प्रेगा किटसह मोठा औषधसाठा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभाग आणि सीएस ऑफिसच्या पथकाने ही कारवाई केलीय.


सांगली जिल्ह्यातील म्हैशाळमधील अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य विभागाने राज्यातील विविध रुग्णालयांवर धाड टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार यवतमाळमधील डॉक्टर मनोज बडोदेकर यांच्या रुग्णालयावर आरोग्य विभागानं धाड टाकली. यावेळी या ठिकाणाहून प्रेगा किटसह मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, कारवाईची कुणकुण लागताच पत्नी डॉ. सुरेखासह डॉ.मनोज बडोदेकर फरार झालेत. त्यांच्यासह एका मेडिकल चालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या

सांगली स्त्री-भ्रूण हत्येप्रकरणी बेळगावातून 3 डॉक्टरांना अटक

स्त्री भ्रूण हत्या करणारा बोगस डॉक्टर खिद्रापुरेला पोलीस कोठडी

सांगलीत स्त्री भ्रूण हत्या करणारा बोगस डॉक्टर खिद्रापुरेला बेड्या

सांगलीत स्त्री भ्रूण हत्या करणारा नराधम डॉ. खिद्रापुरेचा शोध सुरु