पनवेल : पनवेलमधील काळूंदे गावात ड्रेनेज साफ करण्यासाठी गेलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काळूंदे गावातील ड्रेनेजची साफसफाई करण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ड्रेनेज साफसफाईसाठी उतरलेले दोन कामगार वर न आल्याने तीसरा कामगार पाहणीसाठी गेला असता त्याचाही गुदमरुन मृत्यू झाला. गावातील लोकांना या घटनेबद्दल कळाले असता त्यांना तात्काळ कळंबोली अग्निशमंन दलाला बोलवले. अग्निशमंन दलाला घटनास्थळी धाव घेत या तीनही कामगारांना मृत्यू अवस्थेत बाहेर काढण्यात आले.
डोंबिवलीनंतर आता पनवेलमध्ये एकाच वेळी तीन कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान ठेकेदार साफसफाई कामगारांना योग्य रित्या सुरक्षा साहित्य पुरवत नसल्यानेच असे प्रकार घडत आहे.
पनवेलमध्ये सिडकोच्या तीन कामगारांचा ड्रेनेज साफ करताना मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jan 2019 08:54 PM (IST)
डोंबिवलीनंतर आता पनवेलमध्ये एकाच वेळी तीन कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान ठेकेदार साफसफाई कामगारांना योग्य रित्या सुरक्षा साहित्य पुरवत नसल्यानेच असे प्रकार घडत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -