सोलापूर : सोलापुरात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या आजच्या सोलापूर दौऱ्यावेळी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
काळे झेंडे दाखवणाऱ्या गणेश डोंगरे, निवृत्ती गव्हाणे, शुभम माने, शिवराज बिराजदार आणि सिद्धराम सगरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांच्या दडपशाही धोरणाचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ आकाशात काळे फुगेही सोडण्यात आले.
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही नगरसेवकांनाही पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले होते. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर आणीबाणी सदृश स्थिती निर्माण केल्याचा आरोप केला होता.
पंतप्रधान मोदी हे सभास्थळी जात असताना प्रारंभी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिल्या. काही अंतरावर असलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी या वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखवले. त्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. नंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआय कार्यकर्त्यांना मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jan 2019 05:48 PM (IST)
पंतप्रधान मोदी हे सभास्थळी जात असताना प्रारंभी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिल्या. काही अंतरावर असलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी या वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -