अतिमद्य सेवनाने नगरमध्ये तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2017 11:21 PM (IST)
अहमदनगर : अतिमद्य सेवनाने तिघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण अत्यवस्थ आहेत. अहमदनगर तालुक्यातील जेऊर गावातील ही घटना आहे. प्रचारादरम्यानच्या पार्टीनंतर ही दुर्घटना घडली. आदिनाथ आव्हाड, राजेंद्र आव्हाड आणि रावसाहेब आव्हाड हे तिघे जण अती मद्य सेवनाने अत्यवस्थ आहेत. बनावट दारु प्यायल्याने मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. जेऊर गटाच्या उमेदवाराने पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यानंतर तिघांचा मृत्यू झाला, तर तिघे अत्यवस्थ आहेत. मात्र गावातील आणखी काही नागरिकांना त्रास होऊ लागल्याने अत्यवस्थांची संख्या वाढण्याची भीती आहे. दरम्यान जेऊरमध्ये भाजप आणि शिवसेना दोन्हीही पक्षाच्या उमेदवारांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यामुळे कोणत्या उमेदवाराच्या पार्टीनंतर ही घटना घडली, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.