यवतमाळ : नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून आता तीन नवीन नावं सुचवली आहेत.
प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ या तिघांची नावं यवतमाळ आयोजन समितीनं सुचवली आहेत. मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजन समितीला पत्र पाठवून नवीन उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचं आहे, अशी विचारणा केली होती. त्यावर आयोजन समितीने संमेलनाचे उद्घाटक म्हणून तीन नावं सुचवली आहे.
यवतमाळ मराठी साहित्य संमेलन बाबत निमंत्रण संस्थांमधील अनेकांनी न येण्याचा निर्णय घेण्याची चळवळ सुरू झाली आहे. त्या परिस्थितीतमध्ये निमंत्रक संस्थाची भूमिका काय आहे ते तातडीने कळवावे तसेच उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे ते सुद्धा तातडीने सुचवावे, असं पत्र साहित्य महामंडळाने यवतमाळ आयोजन समितीला पत्र पाठवलं होतं.
आयोजकांकडून नयनतार सहगल यांचं निमंत्रण रद्द
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका, असं साहित्य संमेलनाच्या आयोजकांनीच लेखिका नयनतारा सहगल यांना पत्र लिहून कळवलं होतं. संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी सहगल यांना पत्र लिहून आपली असमर्थता दर्शवली. संमेलनाचे उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांच्या नावाला मनसेसह शेतकरी न्याय हक्क समितीने विरोध केला होता. त्यानंतर आता मनसेने आपली भूमिका बदलली.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटक पदासाठी या तीन नावांची शिफारस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jan 2019 05:49 PM (IST)
यवतमाळ मराठी साहित्य संमेलन बाबत निमंत्रण संस्थांमधील अनेकांनी न येण्याचा निर्णय घेण्याची चळवळ सुरू झाली आहे. त्या परिस्थितीतमध्ये निमंत्रक संस्थाची भूमिका काय आहे ते तातडीने कळवावे तसेच उद्घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे ते सुद्धा तातडीने सुचवावे, असं पत्र साहित्य महामंडळाने यवतमाळ आयोजन समितीला पत्र पाठवलं होतं.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -