लातूर : जांब ते शिरुर मार्गावरील चेरा पाटीजवळ कडब्याने भरलेला टेम्पो आणि लग्नाहून परतणाऱ्या अॅपे मॅजिकची समोरासमोर टक्कर होऊन त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तर सहा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जळकोटच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करुन रूग्णांना उदगीर येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


हा अपघात रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडला. मृतांमध्ये ज्ञानोबा सोनकांबळे (40), अरविंद सोनकांबळे (30), पुष्पा सोनकांबळे (45), कांताबाई सोनकांबळे (55), छकुली सोनकांबळे (6) यांचा समावेश आहे तर आरुशी सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, बळीराम सोनकांबळे, सुनिता सोनकांबळे, रितेष सोनकांबळे, प्राचीन सोनकांबळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात एक वर्षाची प्राची अरविंद सोनकांबळे ही मॅजिकमधून बाहेर पडल्याने सुदैवाने बचावली आहे.  धामनगाव येथील सोनकांबळे परिवार विळेगाव ता. अहमदपूर येथून लग्ण आटोपून गावाकडे येत असताना जांबकडून शिरुर ताजबंदकडे जाणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला.

हे वृत कळताच जि.प.सदस्य संतोष तिडके, कॉंग्रेस तालुकाअध्यक्ष मन्मथ किडे, पीआय गणेश सोंडारे यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवून दिल्या. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक ओमप्रकाश कदम यांनी जखमींवर प्रथमोपचार करुन उदगीरला पाठवून दिले. या घटनेनंतर धामनगाववर शोककळा पसरली आहे.