पुण्यातील एमबीएचे तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले
एबीपी माझा वेब टीम | 02 May 2019 11:01 AM (IST)
पुण्यातील भारती विद्यापीठात एमबीएचं शिक्षण घेणारे दहा विद्यार्थी-विद्यार्थिनी मुळशी धरण परिसरात पिकनिकला आले होते. त्यावेळी तिघे जण पाण्यात बुडाले
पुणे : पुण्यातील तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यापैकी तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अन्य दोन तरुणांचा शोध सुरु आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी सुट्टी असल्यामुळे पुण्यातील काही विद्यार्थी वळणे गावात सहलीसाठी आले होते. भारती विद्यापीठात एमबीएचं शिक्षण घेणारे दहा विद्यार्थी-विद्यार्थिनी मुळशी धरण परिसरात पिकनिकला आले होते. VIDEO | बारवी धरण परिसरात फिरायला गेलेल्या तरुणांचा अपघात, दोघांचा मृत्यू | बदलापूर रात्रभर नाईट आऊट केल्यानंतर आज (गुरुवार) सकाळी त्यातील काही जण मुळशी धरणात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिव कुमार पाण्यात बुडाले. हे सर्व जण 22 वर्षांचे होते. धरणाजवळ दाखल झालेल्या नागरिकांनी संगीताचा मृतदेह बाहेर काढला असून दोघा तरुणांचा शोध सुरु आहे. पौड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.