Container car accident : मालेगाव जवळ मुबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Malegaon Highway ) आज सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात कार (Car) मधील तीन जण ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात होताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातग्रस्त कारमधूल बाहेर काढून जखमीला जवळच्या रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. मुबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Malegaon Highway ) आज सायंकाळी कार आणि कॅटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

मुबई-आग्रा महामार्गावरील मुंगसे गावाजवळ हा भीषण अपघात झाला. पाठीमागून येणाऱ्या कॅटेनरने कारला जोराची धडक दिली.  ही धडक एवढी जोरात होती की, कारचा चक्काचूरच झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची आणि जखमींची नावे मिळू शकली नाहीत. परंतु, अपघातात ठार झालेले तीघेही मालेगाव मधील रहिवासी असल्याची माहिती मिळत असून मृतांची ओळख पटली आहे.   दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अपघातस्थळी पोहोचेपर्यंत स्थानिकांनी जखमींना रूग्णलयात दाखल केले. महामार्गावरच अपघात झाल्याने काळी काळ वाहतूक ठप्प होती. परंतु, स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्वाच्या बातम्या